रत्नागिरी : हवामानावर आधारित असलेल्या फळपीक विमा योजनेंतर्गत ७८ कोटी ८५ लाख १९ हजार ५९० रुपयांचा विमा परतावा जाहीर झाला आहे. जिल्ह्यातील ३२ हजार ४४९ शेतकरी फळ पिकविम्याच्या परताव्यासाठी पात्र ठरले आहेत. परतावा जाहीर झाला असला तरी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर परताव्याची रक्कम कधी जमा होणार याबाबत मात्र प्रतीक्षा आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे पीक उत्पादनावर परिणाम होत असल्याने हवामानावर आधारित फळ पिकविमा योजना शासनाने जाहीर केली. आंबा, काजू पिकाचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. परतावा जाहीर करण्यासही उशीर झाला आहे. जिल्ह्यातील सहभागी ३० हजार ४ आंबा बागायतदारांपैकी २६ हजार ९६९ शेतकरी पात्र ठरले आहेत. या बागायतदारांना ७० कोटी ४ लाख २३ हजार ७०८ रुपये परतावा रक्कम जाहीर झाली आहे. हे प्रमाण ६९.०६ टक्के आहे.
काजूसाठी प्रथमच भरघोस परतावा जाहीर झाला आहे. सहभागी ६ हजार ८१४ शेतकऱ्यांपैकी ५ हजार ४८० शेतकरी पात्र ठरले. ८ कोटी ८० लाख ९५ हजार ८८२ रुपये परतावा रक्कम असून, टक्केवारी १२६ टक्के आहे.
गतवर्षीच्या तुलनेत पात्र शेतकऱ्यांची संख्या वाढली असली तरी परताव्याची रक्कम घटली आहे. जिल्ह्यात ७ हजार ८३६ लाभार्थी वाढले; परंतु तुलनेने दोन कोटी ३९ लाख ८ हजार ४४४ रुपये परतावा रक्कम कमी झाली आहे.
हवामानातील बदलामुळे पिकांचे नुकसान होते. त्यामुळे शेतकरी फळ पिकविमा योजनेत सहभागी होतात. परतावा जाहीर करण्यासाठी विलंब झाला. शासनाकडून विमा हप्त्याचे पैसे जमा झाल्यानंतरच प्रत्यक्ष पैसे मिळणार आहेत.
हवामानातील बदलाचा पिकाच्या उत्पादकतेवर परिणाम होतो. काही महसूल मंडळांतील ट्रीगर अॅक्टिव्हेट होत नसल्यामुळे बागायतदारांचे नुकसान होते. यावर उपाययोजना व्हावी.
- राजन कदम, बागायतदार
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.