कोकण

दक्षिण कोकणातील वातावरणातील बदल टिपणार आता 'रडार'

राजेश कळंबटे/

रत्नागिरी : अरबी समुद्रासह (Arabian Sea)कोकण किनारपट्टीमधील हवामात होणार्‍या तिव्र बदलांच्या नोंदींसाठी रत्नागिरीत रडार यंत्रणा (Radar system)बसविण्यात येणार आहे. या प्रकल्पाला मंजूरी मिळाली असून रत्नागिरीपासून 250 ते 300 किलोमीटर परिसरात होणार्‍या बदलांची नोंद घेतली जाईल. त्यामुळे चक्रीवादळ,(cyclone) कमी दाबाची क्षेत्र याची माहिती कोकणवासीयांना अचुकतेने मिळणार आहे.

इंडियन मेट्रोलॉजिकल सोसायटीतर्फे (आयएमएस) ’हवामान शास्त्र आणि हवामान सेवांमधील अलीकडील प्रगती’ या विषयावर तीनदिवसीय ऑनलाईन कार्यशाळेत मार्गदर्शन करताना भारतीय हवामान खात्याचे महासंघालक डॉ. मृत्यूंजय मोहापात्रा रत्नागिरीतील रडार यंत्रणा बसविण्यात येणार असल्याचे सांगितले. या कार्यशाळेचे गुरूवारी (17 जून) उद्घाटन झाले. यावेळी पुणे वेधशाळेचे डॉ. के. एस. होसाळीकर आणि डॉ. जे. आर. कुलकर्णी आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. मोहापात्रा यांनी सांगितले की, वादळ आणि पावसाची नोंद करण्यासाठी विविध प्रकारचे अत्याधुनिक तंत्र विकसित करण्यात आले आहे.

जगभरातील सॅटेलाईटच्या माध्यमातून माहिती गोळा करून त्याचे एकत्रिकरण केले जाते. त्यानंतर ती प्रसारीत केली जाते. सध्या मुंबई, वेरावल आणि गोवा येथे रडार कार्यान्वित आहेत. याच धर्तीवर रत्नागिरीतही रडार यंत्रणा बसविण्यात येणार आहे. हे रडार सी-बॅण्डचे असेल. सध्याच्या हवामानातील बदलांच्या पार्श्‍वभुमीवर प्रत्येक जिल्ह्यात रडार कार्यान्वित करण्याचा प्रयत्न आहे.रडार यंत्रणा चोविस तास कार्यान्वित राहते. प्रत्येक तीन ते चार तासातील अंदाज नोंदविता येतात. याचा फायदा संपूर्ण दक्षिण कोकणला होऊ शकतो. सर्वसाधारण रडारची क्षमता 250 ते 300 किलोमीटरच्या परिघातील क्षेत्र मर्यादीत आहे. मागील काही वर्षात हवामानामध्ये तिव्र बदल होते आहे.

अरबी समुद्रात वादळं निर्माण होत आहे. गतवर्षी निसर्गने ते दाखवून दिले आहे. चक्रीवादळं, कमी दाबाची क्षेत्र, जमिनीवर अवतरणारे ढग, तिव्र पाऊस या संदर्भातील निरीक्षणे रडारमुळे त्वरीत नोंदवता येतात. भारतीय हवामान खात्याकडून देशभरात काही जागांवर रडार बसविण्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. रत्नागिरीतील प्रकल्पाला मंत्रालयाकडून समंती मिळाली असून तो निविदास्तरावर असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.

साळवी स्टॉपच्या जागेत केंद्र

रत्नागिरी शहराजवळील साळवी स्टॉप येथे भारतीय हवामान विभागाचे स्वतःचे कार्यालय आहे. तिथे रडारसाठी आवश्यक जागा उपलब्ध आहे. सध्या चोविस तास कर्मचारी नियुक्त असून निवास व्यवस्थाही आहे. किनारपट्टीजवळच हे कार्यालय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: सरकार कुणी पाडलं, राज ठाकरेंबरोबर जाणार का? उद्धव ठाकरे काय म्हणाले?

Latest Maharashtra News Updates live : येवल्यात मनोज जरांगेंचं जंगी स्वागत

Gold ETF: नवा विक्रम! गोल्ड ईटीएफवरील गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला; काय आहे कारण?

Maharashtra Board Time Table : विद्यार्थ्यांनो! अभ्यासाला लागा! दहावी-बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; तीन महिने तयारीचे

'छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्म समभाव जपला, बटेंगे तो कटेंगे ही इंग्रजांची नीती'; काँग्रेस नेत्याचा भाजपवर हल्ला

SCROLL FOR NEXT