रत्नागिरी : शहरातील अवैध व्यवसायांबद्दल माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केल्यानंतर झालेल्या कारवाईत नवीन भाजीमार्केट येथे बेकायदेशीर आणि बिगरपरवाना सुरू असलेल्या क्लबवर पोलिसांनी रात्री धाड टाकली. रोख रकमेसह विविध साहित्य आणि संशयितांच्या मोबाईलसह १ लाख ४४ हजार ९८० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी १५ जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. यामध्ये मच्छीमार, व्यावसायिक, व्यापारी आदींचा समावेश आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ मोहित कुमार गर्ग यांनी लोकांना व्हॉट्सअॅप नंबर देऊन अवैध व्यवसायांबद्दल माहिती देण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार पोलिसांना ही माहिती देण्यात आल्याचे समजते. उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून शहर पोलिसांनी काल रात्री९ वाजता या क्लबवर धाड टाकली. संशय़ित गैरकायदा, विनापरवाना जुगार अड्डा चावलवून फायद्यासाठी रमी जुगार खेळत असल्याचे आढळून आले. त्यावरून पोलिसांनी महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४,५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या या धाडीमध्ये अभिजित चव्हाण, किशोर भाटकर, किशोर तुकाराम मोरे, वैभव शिवलकर, ऋषिकेश शिवलकल, राजेश चव्हाण, इमतियाज पिलपिले, अब्रार फकिर, रमेश दळी, संजय सुर्वे, दिलीप मोरे, सचिन कुलकर्णी, जगन्नाथ यादव, नागनाथ करडे, राजेशकुमार रमेश, हे संशयित सापडले असून, या पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या धाडीमध्ये पोलिसांकडून टेबल, बॉक्स, अॅल्युमिनियमची पेटी, लॅण्डलाईन फोन, मोबाईल, काही रोकड, खुर्ची, असे एकूण १ लाख ४४ हजारांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. शहर पोलिसांनी यासंदर्भात पहाटे गुन्हा दाखल केला असून, संशय़ितांवर कारवाई सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.