Raigad Sakal
कोकण

Raigad : माथेरानच्या गारबटवाडीतील डोंगर खचला,जमिनीला भेगा; नगरपरिषदेच्या कम्‍युनिटी सेंटरमध्ये नागरिकांचे स्‍थलांतर

गारबटवाडीलगतच्या शेतात ५० ते १०० फूट लांब व ७ ते ८ फूट खोल मोठमोठे चर व खड्डे पडल्याने दोन दिवसांपूर्वीच प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केले

सकाळ वृत्तसेवा

माथेरान, नेरळ - खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीतील दरड कोसळण्याची घटना ताजी असतानाच माथेरान डोंगरकुशीत वसलेल्‍या गारबटवाडी गावात बुधवारी भूस्खलन होऊन डोंगराचा काही भाग खचला तसेच जमिनीला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्‍याने ग्रामस्‍थ भयभीत झाले.

याबाबत माहिती मिळताच तहसीलदार व आपत्ती व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्‍थळी धाव घेत नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले.

गारबटवाडी गावातील लोकसंख्या ३०० ते ३५० च्या जवळपास आले. गावात जाण्यासाठी माथेरानच्या दस्तुरी पॉइंटवरून जावे लागते. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले गावातील डोंगरावरील माती अतिवृष्‍टीमुळे मोठ्‌या प्रमाणात वाहून जात असल्‍याने दरडीचा धोका निर्माण झाला आहे. त्‍यात बुधवारी डोंगरासह जमिनीला तडे गेल्‍याने ग्रामस्‍थांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

1 ) गारबटवाडीलगतच्या शेतात ५० ते १०० फूट लांब व ७ ते ८ फूट खोल मोठमोठे चर व खड्डे पडल्याने दोन दिवसांपूर्वीच प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केले होते मात्र गावात पारंपरिक दुधाचा व्यवसाय असल्याने मोठ्या प्रमाणात गायी, म्हशी, मेंढ्या पालन होत असल्याने नागरिकांनी गाव सोडून जाण्यास नकार दिला.

2) भूस्‍खलनानंतर ३० ते ४० नागरिकांना त्‍वरित माथेरानमध्ये आणले असून कम्युनिटी सेंटर हॉलमध्ये व्यवस्था केली आहे. तर काहीजण नातेवाईकांकडे राहण्यास गेल्‍याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

प्रशासन सज्‍ज

खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी व आपत्ती व्यवस्थापन प्रशासन माथेरानचे अधिक्षक दिशांत देशपांडे मार्गदर्शनाखाली तुप गावचे तलाठी पामपट्टवार, माथेरान पोलिस ठाण्याचे दामोदर खतेले तसेच सह्याद्री आपत्कालीन संस्था, आपता मित्र पथकाच्या सदस्‍यांनी गावातील नागरिकांना त्वरित स्‍थलांतरित केले.

नोटिशीनंतरही ग्रामस्‍थांचा नकार

माथेरानच्या दुसऱ्या टोकाला असणाऱ्या पनवेल तालुक्यातील धोदाणी गावातही डोंगराचा भाग खचल्‍याने गावाला धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्‍टीने काही गावांना स्थलांतर करण्यासाठी नोटिसा दिल्या आहेत, मात्र ग्रामस्‍थ नकार देत असल्याचे समोर येत आहे.

गारबटवाडीत भूस्खलन झाल्याचे समजताच आम्ही सर्व साहित्यासह गावात पोहोचलो. ग्रामस्थांना गाव खाली करण्याची विनंती केली, मात्र अनेकांचा व्यवसाय असल्‍याने ते स्‍थलांतरित होण्यास तयार नव्हते. विश्‍वासात घेऊन समजूत काढल्‍यावर त्‍यांनी गाव सोडण्याची तयारी दर्शवली. यामध्ये एक दिव्यांग आणि ज्‍येष्ठ नागरिकाला रुग्णवाहिकेतून कम्युनिटी सेंटरमध्ये नेण्यात आले.

- दिनेश सुतार, आपदा मित्र

माथेरानमध्ये अधिकारी अलर्ट मोडवर

माथेरान (बातमीदार) : घाटमाथ्‍यावर दरड कोसळण्याच्या घटना, मालडुंगा पॉइंट तसेच गारबट गावात झालेल्‍या भूस्‍खलनानंतर माथेरानमधील प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.

मुख्याधिकाऱ्यांनी डोंगरालगतच्या भागाची पाहणी करून नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्याचे आवाहन केले आहे. माथेरानमध्ये जुलै महिन्यात ३,००० मिमीपेक्षा जास्‍त पाऊस झाला आहे.

इंदिरा गांधीनगर, छत्रपती शिवाजी महाराजनगर, हुतात्मा भाई कोतवालनगर, तसेच कपाडिया मार्केट येथील रहिवाशांना सुरक्षित स्थळी किंवा नगरपालिकेने व्यवस्‍था केलेल्‍या तात्‍पुरत्‍या निवारा केंद्रात स्‍थलांतरित होण्याचे आवाहन केले. रात्रीच्या वेळेस कोणीही घरात न थांबता सुरक्षित स्थळी जावे, अशी विनंती गारवे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT