Raigad Sakal
कोकण

Raigad: धोकादायक छताखाली धडे हाळखुर्दच्या उर्दू शाळेची दुरवस्‍था; पालक आक्रमक

शाळेलगतच अंगणवाडी भरत असून याठिकाणी ५८ विद्यार्थी आहेत. शाळेची इमारत शंभर वर्षांपेक्षा जुनी असून दुरवस्था झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

खालापूर - रायगड जिल्‍हा परिषदेच्या हाळखुर्द येथील उर्दू शाळेची इमारत धोकादायक झाली आहे. छताला गळती लागली असून भिंती कोसळण्याच्या स्‍थितीत आहेत. त्‍यामुळे दुर्घटना घडल्‍यावरच प्रशासनाला जाग येईल का, असा प्रश्‍न हाळखुर्दमधील पालक विचारत आहेत.

तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांमागे लागलेले समस्येचे ग्रहण सुटण्याची कोणतीच चिन्हे दिसत नाही. हाळखुर्द येथील उर्दू शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत वर्ग भरत असून सुमारे १२८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

शाळेलगतच अंगणवाडी भरत असून याठिकाणी ५८ विद्यार्थी आहेत. शाळेची इमारत शंभर वर्षांपेक्षा जुनी असून दुरवस्था झाली आहे. हाळखुर्दचे उपसरपंच अजीम मांडलेकर यांनी तीन वर्षांपासून खालापूर पंचायत समितीकडे धोकादायक इमारतींच्या डागडुजीबाबत पत्रव्यवहार केला होता.

तत्कालीन गटविकास अधिकारी बालाजी पुरी यांना पत्र देत, काही दुर्घटना घडल्यास प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही दिला होता.

अतिवृष्‍टीमुळे शाळेची इमारत अधिक धोकादायक झाली असून भिंतीला ओल आली असून काही ठिकाणी तडे गेले आहेत.

कौले फुटली असून गळती होत असल्‍याने विद्यार्‍थ्‍यांची गैरसोय होते. अशाच मोडकळीस आलेल्‍या शाळेत विद्यार्थी जीव मुठीत धरून शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. त्‍यामुळे पालक आक्रमण झाले असून आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

उर्दू शाळेच्या दुरवस्थेबाबत वारंवार पत्रव्यवहार केला आहे. तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्‍याने आता नव्याने आलेले गटविकास अधिकारी लक्ष देतील, अशी अपेक्षा आहे.

- अजीम मांडलेकर, उपसरपंच, हाळखुर्द

शाळेच्या दुरुस्तीसाठी १५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. पंचायत समितीने अभियंत्‍यांनी शाळेच्या इमारतीची पाहणी करण्यासाठी पाठवले आहे. त्‍यांनी अहवालानुसार, नवीन इमारतीची आवश्यकता असल्यास तसा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात येईल.

- कैलास चोरामाळे, गटशिक्षणाधिकारी, खालापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT