Petrol 
कोकण

नोटाबंदी वर्षपूर्ती: अाॅनलाईन व्यवहार ठप्प, अफवांना उधान

अमित गवळे

पाली ; मोदी सरकारच्या नोटा बंदीच्या एैतिहासिक निर्णयास बुधवारी (ता.८) वर्ष पुर्ण होत आहे.काळा पैसा बाहेर काढण्यासाठी सुरु केलेली हि मोहिम,अखेर कॅशलेस अाणि डिजिटल व्यवहारासाठी केली असल्याची सारवासारव करण्यात आली. वर्षभरात या संदर्भात कोणकोणते बदल झाले ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला अाहे सकाळने

शहरी भागाबरोबरच ग्रामिण भागातील जनतेला या डिमाॅनिटायझेशनचा फटका व त्रास विवीध प्रकारे सहन करावा लागला. गोरगरीब जनतेला नोटा बदलण्यासाठी तासनतास रांगेत उभे रहावे लागले. तर ग्रामिण भागात अज्ञान, अपुर्या सोयी सुविधा व स्लो नेटवर्कमुळे अाॅनलाईन बॅंकिग, कॅशलेश व्यवहाराचा फज्जा झाला होता अनेकांचे व्यवहार डबघाईला अाले व्यापार बुडाले.तर हातावर पोट भरणार्यांचे व अादिवासींची मोठी तारांबळ उडाली होती. वर्षभरापुर्वी सकाळने या सर्व व्यथा अाणि अडचणी मांडल्या होत्या. अाता बरोबर वर्षभरानंतर या सर्व संदर्भात असलेले वास्तव समोर ठेवण्याचा हा प्रयत्न डिजटलायझेशन व अाॅनलाईन व्यवहाराला टाटा, सुरवातीस काही दिवस अनेकांनी अाॅनलाईन बॅंकिग,विज व फोन बिल भरणा अादी व्यवहार करण्यास सुरुवात केली. परंतू नेटवर्क कंजेशन व अपुर्या सेवेमुळे अनेकांनी या व्यवहारापासून पाठ फिरविली आहे. डेबिट कार्डचा उपयोग पैसे काढून रोख व्यवहार करण्यासाठीच अधिक होत आहे. कॅशलेस पेक्षा कॅशचाच वापर अधिक होतांना दिसत आहे. बँकामध्ये नेटवर्क वारंवार गेल्याने ग्राहकांना तासनतास थांबावे लागत अाहे.

बँकांच्या पैसे भरणा स्लिपवर दोन हजार व दोनशेच्या नोटांना अजुन स्थान नाही 
ग्रामिण व निमशहरी भागातील अनेक बँकांच्या पैसे भरणा स्लिपवर वर्ष उलटूनही दोन हजार व दोनशेच्या नोटांची नोंद केलेली नाही. तर हजारच्या नोटांची नोंद अजुनही तशीच आहे. त्यामुळे पैसे भरतेवेळी दोन हजार व दोनशेच्या नोटांची संख्या मांडण्यासाठी भरणा पावतीवर खाडाखोड करावी लागत आहे. या संदर्भात एका बँक अधिकार्याला विचारले असता त्यांनी सांगितले की, हि सर्व स्टेशनरी एकदाच छापली जाते. जो पर्यंत जुनी स्टेशनरी संपत नाही तोपर्यंत या भरणा पावत्या वापराव्याच लागणार अाहेत.

अफवांना उधान
हजार व पाचशेच्या नोटा एका रात्रीत बंद झाल्या त्यामुळे अनेकांनी याबाबत धसका घेतला आहे. सध्या बाजारात दहा रुपयाचे काॅईन (डाॅलर) व पाचच्या नोटा बंद झाल्याची अफवा मोठ्या प्रमाणा पसरली आहे. त्यामुळे दहाची नाणी व पाचच्या नोटा ग्राहक व काही दुकानदार स्विकारत नाहीत. त्यामुळे दहा व पाचच्या नोटा मुबलक असलेल्यांची मोठी गैरसोय होत आहे. सकाळने काही दिवसांपुर्वी दहाची नाणी बंद झाल्याच्या अफवेवरील पडदा उठविला होता.

एटिएममध्ये शंभरच्या नोटांची वाणवा, दोनशेच्या नोटांसाठी थोडे थांबा
दोन हजार व पाचशेच्या नोटा अाता सर्वत्र मुबलक प्रमाणात अाल्या अाहेत. एटिएम मधुन देखिल या नोटा उपलब्ध होत आहेत. परंतू शंभरच्या नोटा मात्र फार कमी प्रमाणात मिळतात. त्यामुळे सुट्यांचे वांदे होत आहेत. तर दोनशेच्या नोटा काही बँकांमध्ये उपलब्ध अाहेत. परंतू एटिएम मध्ये अजुन दोनशेच्या नोटांची सेटिंग बाकी असल्याने थोडे थांबावे लागणार आहे.

पेट्रोल पंपावर डेबिट कार्ड चालेनात
अजुनही अनेक पेट्रोल पंपावर डेबिट कार्ड चालत नाहीत.तर काही पेट्रोल पंपांवर नेटवर्क नसल्याने डेबिट कार्डची सुविधा मिळत नाही. अाणि काही पेट्रोल पंपावर रुपे चे एटिएम कार्ड चालत नाही. काही बँकाच्या डेबिट कार्डने पेट्रोल खरेदी केल्यास अधिकची रक्कम वळती होत आहे. अशा अडचणींमुळे पेट्रोल पंपावर अनेक जण कॅशचाच अाधार घेत आहेत.

स्वाईप व पाॅस मशिनचा वापर घटला
कॅसलेश व्यवहार करण्यासाठी शासनाने विविध व्यापारी व व्यवसायिकांना स्वाईप व पाॅस मशिनचा वापर करण्याचे अावाहन केले होते. शासन स्तरावरुन यासंदर्भातील प्रशिक्षणे देखिल दिली गेली. परंतू सध्या बहुतांश दुकानात किंवा खरेदी विक्री करण्यासाठी स्वाईप मशिन वापरल्या जातांना दिसत नाहीत. या स्वाईप मशीन अडगळीत पडल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT