election esakal
कोकण

Raigad : निवडणुकांच्या हालचालींना वेग; घरोघरी प्रत्‍यक्ष भेटीतून मतदारांची पडताळणी

२०२४ मध्ये विधानसभा, लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याच्या हालचाली सरकारी स्‍तरावर सुरू झाल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Raigad - अलिबाग निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, एक जानेवारी २०२४ पर्यंत छायाचित्रांसह मतदारयादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत २१ जुलै ते २१ ऑगस्ट या कालावधीत मतदाराची घरोघरी पडताळणी होणार आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत घरोघरी प्रत्यक्ष

भेट देऊन पडताळणी करण्यात येणार आहे.

२०२४ मध्ये विधानसभा, लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याच्या हालचाली सरकारी स्‍तरावर सुरू झाल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात मतदारयादी विशेष पुनरिक्षण कार्यक्रम होणार आहे.

नवीन मतदार नोंदणी करणे, मतदार यादीतील नाव, वय, पत्ता दुरुस्ती करणे, मयत नावे वगळणे, स्थलांतरित मतदारांचे नाव वगळणे,

मतदारयादीतील वय वर्षे ८० वरील मतदारांची पडताळणी करणे, मतदारयादीतील अस्पष्ट फोटोबाबत कार्यवाही करणे, युवा मतदारांची विशेषतः १ ऑक्टोबर २०२३ व १ जानेवारी २०२४ या महिन्याच्या १ तारखेला अथवा त्याआधी १८ वर्ष पूर्ण होणाऱ्या मतदारांची नोंदणी केली जाणार आहे.

विशेष शिबिरांचे आयोजन

महिला, अपंग, तृतीयपंथी यांच्या मतदार नोंदणीमध्ये वाढ होण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी करण्यासाठी अधिकाधिक जनजागृती केली जाणार आहे.

दर शनिवार, रविवारी मतदान केंद्रामध्ये शिबिर घेऊन ८० पेक्षा अधिक वयोगट असलेले मतदार, मतदान कार्डमध्ये ठळक न दिसणारे छायाचित्र, युवा तरुणांची नोंदणी केली जाणार आहे.

दहा हजार मशिन दाखल

जिल्ह्यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दहा हजार ५४० बॅलेट व कंट्रोल युनिट मशिन दाखल झाल्या आहेत. त्यात सहा हजार ७०० बॅलेट युनिट व तीन हजार ७५० कंट्रोल युनिट मशिनचा समावेश आहे.

बंगळूरमधील बेल कंपनीच्या या मशिन मागविल्या आहेत. बॅलेट युनिट सहा हजार ७०० व कंट्रोल युनिटच्या तीन हजार ७५० मशिन उपलब्ध झाल्‍याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी स्नेहा उबाळे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT