Raigad  Sakal
कोकण

Raigad: तीन हजार नागरिक मृत्यूच्या दाढेत; खोपोली पालिका प्रशासनाकडून स्‍थलांतरित होण्याचे आवाहन

आठवडाभरापासून खोपोली व परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे.

सकाळ वृत्तसेवा

खोपोली - इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर प्रशासकीय स्तरावर दरडग्रस्त रहिवासी भागांचे नव्याने सर्वेक्षण करण्यात येत आहे. खोपोली नगरपालिका क्षेत्रातील तीन रहिवासी भाग दरडप्रवण म्‍हणून घोषित करण्यात आले आहेत.

येथील जवळपास ३००० रहिवाशांना तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आवाहन नगरपालिका व तालुका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नगरपालिका क्षेत्रातील काजूवाडी, सुभाषनगर व यशवंतनगरचा काही भाग दरडप्रवण, राहण्यास धोकादायक म्‍हणून जाहीर करण्यात आला असून तिन्ही वस्तीत जवळपास ६५० ते ७०० घरे आहेत.

आठवडाभरापासून खोपोली व परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पार्श्वभूमीवर दरडप्रवण क्षेत्रातील रहिवाशांना जागृत करण्यात येत असून दरड साक्षरता निर्माण होण्यासाठी मोहीम सुरू आहे.

दरडप्रवण क्षेत्रातील रहिवाशांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे. ज्यांच्याकडे पर्यायी व्यवस्था नाही, अशांना जवळच्या नगरपालिका शाळा किंवा समाजकेंद्रात राहण्याची व्यवस्था केली जात आहे. दरम्यान धोका असूनही काही नागरिक घरे सोडण्याच्या मानसिकतेत नसल्‍याने पालिका प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे.

गतवर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यात वर्धापननगर परिसरातील कमला रेसिडनशी या रहिवासी संकुलात दरड कोसळले. सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही. याच दरम्यान मोगलवाडी भागात डोंगरावरील माती व दगड घरावर आल्याने नुकसान झाले होते.

ठोस उपाययोजनांचा अभाव

खोपोलीतील दरडप्रवण क्षेत्राचे सहा वर्षांपूर्वी भूगर्भ सर्वेक्षण व तांत्रिक विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आले आहे.

त्‍यांच्या अहवालानुसार काजूवाडी, सुभाष नगर, यशवंतनगर, वर्धमाननगर, सहकारनगर आदी रहिवासी भागाला दरडीचा धोका वर्तवण्यात आला आहे. तसेच काही उपाययोजनाही सुचवण्यात आल्या आहेत.

यात अति धोकादायक घरांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन, वस्ती व डोंगरामध्ये मजबूत संरक्षक भिंत उभारणे, जाळी बसविणे, परिसरात माती उत्‍खनन बंद करणे, नवीन बांधकामास परवानगी देतांना पूर्ण सर्वेक्षण करून व उपयुक्त अटी व शर्तीनुसारच परवाना देणे आदींचा समावेश आहे.

सहा वर्षात अहवालातील कोणत्याही उपाययोजना पालिका व महसूल विभागाने पूर्ण केलेल्या नाहीत. माती उत्‍खनन, बांधकामे सुरूच आहेत. संरक्षक भिंत बांधण्यासाठी पालिकाने पुढाकार घेतला असला तरी काही कामे अपूर्ण आहेत.

मुसळधार पावसामुळे डोंगर माथ्यावरील जमीन ठिसूळ झाली आहे. कोणत्याही प्रकारची जोखीम न घेता रहिवाशांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याची गरज आहे.

धोकादायक स्थितीतील रहिवाशांना स्‍थलांतरित होण्याचे आवाहन केले आहे. तसेच पर्यायी व्यवस्थाही करण्यात आली आहे.

- अनुप दुरे पाटील, मुख्याधिकारी, खोपोली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

SCROLL FOR NEXT