raigad unseasonal rain update mango cashew hit climate change health  Sakal
कोकण

Raigad Rain Update : अवकाळी पावसाचा दणका; आंबा, काजू बागायतदार आर्थिक अडचणीत, पोलादपूर तालुक्‍यात नागरिकांची तारांबळ

आंबा, काजू पिकाच्या मोहोर गळून पडल्‍याने बागायतदार चिंतेत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Poladpur News : पश्‍चिमी प्रकोपामुळे (वेस्‍टर्न डिस्‍टर्बन्स) वेधशाळेने पुढील काही दिवस राज्‍यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. पोलादपूर तालुक्‍यासह शहरात मंगळवारी सकाळपासूनच पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. आंबा, काजू पिकाच्या मोहोर गळून पडल्‍याने बागायतदार चिंतेत आहेत.

तालुक्यातील काही गावांमध्ये धार्मिक कार्यक्रमांसह हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच लग्‍नसराईचा हंगाम असल्‍याने काही घरांसमोर मंडप टाकले आहेत. मात्र पावसामुळे सर्वांचीच त्रेधातिरपीट उडाली. शहरात दोन तासांहून अधिक वेळ पावसाने हजेरी लावल्‍याने बाजारपेठ परिसर चिखलमय झाला.

अचानक आलेल्‍या पावसामुळे बसस्‍थापनातही शुकशुकाट पाहायला मिळाला. पश्‍चिमेकडील प्रकोपामुळे देशासह राज्यातील वातावरणात पुन्हा एकदा बदलले आहे. अनेक भागात थंडीचा प्रभाव कमी झाला असून वातावरण ढगाळ झाले आहे. मंगळवारी पहाटेपासून तालुक्यातील अनेक भागात अवकाळीने जोरदार बरसात केली.

सध्या आंबा, काजूचे पीक चांगल्या प्रकारे भरून आले आहे, मात्र अवकाळीने फळावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. ऐन फुलोऱ्यावर आलेले आंबा, काजू पीक धोक्यात आले आहेत. ढगाळ वातावरणामुळे किडींचा प्रादुर्भावाचीही भीती वर्तवण्यात येत आहे.

आंबा पिकाला चांगल्या प्रकारे मोहोर आला होता, मात्र अवकाळी पावसामुळे मोहोर गळून पडण्याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे उत्‍पादनावर परिणाम होईल. तसेच ढगाळ वातावरणामुळे किडरोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची आंबा, काजूचा दर्जा खालावण्याची भीती आहे.

- ओंकार काळे, आंबा बागायतदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray : महाविकास आघाडी जिंकली नाही तर गुजरात जिंकेल; आदित्य ठाकरेंचा घणाघात

Curry Leaves Health Benefits: औषधी गुणधर्म असलेला कढीपत्ता 'या' गंभीर आजारांना ठेवतो दूर

Manipur Voilance : मुख्यमंत्री बिरेनसिंह यांचे पेटविले घर; मैतेई गटाकडून २४ तासांचा अल्टिमेटम

Kantara Chapter 1: तारीख ठरली! 'या' दिवशी जगभरात प्रदर्शित होणार 'कांतारा चॅप्टर १'; उरले किती दिवस?

Latest Maharashtra News Updates : मनसे पदाधिकाऱ्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT