पनवेल - दोन दशकांहून अधिक काळ रखडलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात संतापाची भावना आहे. सत्तांतरानंतरही रस्ता मार्गी लावण्यात अपयश आल्याने आगामी लोकसभा, तसेच विधानसभा निवडणुकांमध्ये ‘नो रोड, नो वोट’ चा नवा ट्रेन्ड समाजमाध्यमांवर व्हायरल करत सत्ताधाऱ्यांना इशारा दिला आहे.
पळस्पेपासून ते गोव्यापर्यंत राष्ट्रीय महामार्गाला सुरुवात होते. आतापर्यंत हा महामार्ग उभारण्यावर अडीच हजार कोटीं खर्च करण्यात आले आहे. मात्र, पळस्पे ते कासूपर्यंत रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने स्थानिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
दरवर्षी पावसाळा सुरू झाला की, कोकणात जाणाऱ्या मार्गावर खड्ड्यांमुळे अपघातांत वाढले आहेत. गणेशोत्सवामुळे काही दिवसांवर आल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांचा विषय आता पुन्हा चर्चेत आला आहे. रस्ता वाहतुकीस सुरक्षित नसल्याने प्रवाशांच्या भावनांचा उद्रेक झाला आहे.
‘या’ आमदारांवर रोष
मुंबई - गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे संतप्त चाकरमान्यांनी यंदा मतदान करणार नसल्याचा इशारा दिला आहे. ज्या लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघातून हा रस्ता जातो, त्यांना निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे.
यात खासदार श्रीरंग बारणे, विनायक राऊत, सुनील तटकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार प्रशांत ठाकूर, महेंद्र थोरवे, महेश बालदी, रवी पाटील, महेंद्र दळवी, आदिती तटकरे, दीपक केसरकर, भरत गोगावले, मंत्री उदय सामंत, नीलेश राणे आणि अनिकेत तटकरे, जयंत पाटील यांचा समावेश आहे.
खोट्या आश्वासनांमुळे प्रवाशांचा संताप
1) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे भूसंपादन २००९ पासून केले गेले. त्यानंतर २०११ ला प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. २००९ पर्यंत केंद्र सरकारने ९७४ कोटी खर्चाचा अंदाज बांधला होता. मात्र, २०११ पर्यंत हा खर्च २२०० कोटी रुपयांच्या घरात पोहोचला.
2) आतापर्यंत ३,५०० अपघात झाले असून ३५० जणांचा मृत्यू तर हजारो लोकांना अपंगत्व आले आहे. हा रस्ता पूर्ण होत नसल्याने अखेर २०२३ ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पळस्पे ते कासूदरम्यान काँक्रिटीकरणाचा नारळ फोडून गुळगुळीत रस्ते होतील, असे कोकणवासीयांना आश्वासन दिले.
3) कमीत कमी पाच किलोमीटर रस्ता होईल आणि रोजच्या रस्त्याचे अपडेट ड्रोनद्वारे व्हिडीओ करून संकेतस्थळावर दाखवण्यात येईल, पण हा ड्रोन कोकणवासीयांना हवेत उडताना दिसलाच नाही, पण आप्तेष्टांच्या झालेल्या अपघातांमुळे संतापाची भावना आहे.
4) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर मंत्र्यांनी दौरे करण्यापेक्षा खड्ड्यांना दोषी असणारे महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदारांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. त्यानंतर खड्डे पडण्यास बंद होऊन सर्वसामान्यांना दिलासा मिळेल.
- संतोष ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.