सिंधुदुर्ग - मागील काही दिवसांपासून राज्याला पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीप्रमाणे कोकणसह राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची बॅटिंग सुरु आहे. दरम्यान, पावसाची जोर वाढला असल्याने पावसाळी पर्यटनासाठी नागरिकांची गडबड पहायला मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर आंबोलीत वर्षा पर्यटन काल रविवार सुट्टीच्या दिवशी हाऊसफुल झाले होते. मुसळधार पाऊस असूनही अनेक हौशी पर्यटकांनी येथे गर्दी केली होती. हजारो पर्यटक आंबोली वर्षा पर्यटनाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी आले होते. मात्र सिंधुदुर्ग पोलिसांच्या कमतरतेमुळे आंबोलीत तब्बल तीन ते चार तासांची वाहतूक कोंडी झाली.
जिल्हा पोलिस प्रशासनाने केवळ १० पोलिस आंबोलीत पाठवले होते. त्यातच आंबोली धबधब्याच्या ठीकाणी तरुणांच्या हुल्लडबजीमुळे पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागला हे पर्यटक रस्त्यातचं हुल्लड बाजी करत होते, त्यामुळे ट्राफिकची समस्या उद्भवली आहे. दरम्यान, पोलिसांनी तात्काळ मार्ग काढत वाहनांची गर्दी कमी केली. तरीही आंबोलीत पर्यटकांचा ओघ वाढताच असल्याचे चित्र आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.