कोकण

पर्यटकांनो! यंदा ऑनलाईन अनुभवा आंबोलीचं पाऊस पर्यटन

आंबोली आणि जवळपासची सर्व पर्यटनस्थळे लोकांना ऑनलाईन दाखवणार

रुपेश हिराप

सावंतवाडी : कोरोना महामारी आणि लॉकडाउनमुळे गतवर्षी आंबोलीचे वर्षा पर्यटन पूर्णतः कोलमडले होते. यावर्षीही वर्षा पर्यटनावर कोरोनाचे संकट घोंगावत आहे; परंतु तेथीलच निर्णय राऊत या युवकाने आंबोली आणि जवळपासची सर्व पर्यटनस्थळे लोकांना ऑनलाईन दाखवण्याची नामी शक्कल लढवली आहे. ‘आंबोली टूरिझम लाईव्ह’ या वेब पोर्टलद्वारे तो आंबोलीचे वर्षा पर्यटन जगाच्या नकाशावर पोहोचवणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे थंड हवेचे ठिकाण म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. आंबोली घाट मार्ग महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक यांना एकत्रित जोडणारा ऐतिहासिक असा राज्यमार्ग आहे. आंबोली हे पर्यटनस्थळ काही वर्षांपूर्वी फक्त वर्षा पर्यटनासाठी राज्यात ओळखले जायचे. पावसाळ्यात तीन महिने येथे वर्षा पर्यटन चालायचे. येथील स्थानिकांचे पर्यटन हेच रोजगाराचे साधन आहे; परंतु आंबोलीत मुख्य धबधबा, कावळेसाद पॉइंट, महादेवगड पॉइंट, हिरण्यकेशी तीर्थक्षेत्र, नांगरतास धबधबा, सनसेट पॉइंट, शिरगावकर पॉइंट, राघवेश्वर पॉइंट एवढेच ''साईटसिंग'' करण्यासाठी पर्याय होते; मात्र निर्णय राऊतने या युवकाने आंबोली परिसरातील पर्यटनवाढीसाठीपान तसेच एका क्लिकवर आंबोली परिसराचे महत्त्व सर्वदूर नेण्यासाठी नि:शुल्क ‘आंबोली टुरिझमची’ निर्मिती करत आंबोलीला जागतिक पातळीवर नेण्याचे काम केले होते.

वर्षाच्या १२ महिने पर्यटनासाठी अभ्यासपूर्वक येथे विविध योजना तथा संकल्पना राबवल्या. यात सर्व प्रथम साहसी पर्यटनाचा पाया त्याने रोवला. साहसी पर्यटन ॲक्टिव्हिटिज, इको टुरिझम, व्हिलेज टुरिझम, कृषी पर्यटन (ॲग्रो टुरिझम), साईटसिन, पर्यटन माहिती केंद्र, टेंट कॅम्पिंग, योगा, मेडिटेशन, पंचकर्मा, बाराही महिने नेचर कॅम्प, बर्ड - बटरफ्लॉय वॉचिंग, जंगल सफारी, नाईट सफर, जंगल ट्रेक, ॲनिमल वॉचिंग, नेचर ट्रेक, पठार ट्रेक, रॉक ट्रेक ( बेसिक व हार्ड ), बायोडाव्हर्सिटी कॅम्प, स्टडी / रिसर्च कॅम्प, टेंट कॅम्पिंग, जंगल टेंट, लेक साईट टेंट, जंगलातील व शेतातील जंगल माची (निगराणी माळा), कॅम्प फायर, फोटोग्राफी कॅम्प, बैलगाडी सफर, घोडागाडी सफर (चित्रि), जीप सफर, ट्रॅक्टर सफर, मातीच्या घरातील अनुभव, मालवणी घरगुती चुलीवरचे जेवण. त्यासोबत गाईड सर्व्हिस, हॉटेल बुकिंग, घरगुती जेवण, होम स्टे, कार सर्व्हिस आणि आंबोली टू अदर प्लेस टूर व अदर प्लेस टू आंबोली तसेच हिडेन प्लेस आंबोली - चौकुळ - गेळे - कुंभवडे - खडपडे परिसरातील पर्यटनस्थळे एक्सप्लोर करणे, कॉर्पोरेट नेचर कॉन्फरन्स, इव्हेंटस व् आदी उपक्रम त्याने राबविले; मात्र गेली दोन वर्ष दरडी कोसळण्याचे वाढते प्रमाण कोसळणारा घाट रस्ता आणि त्यात कोरोनाचे संकट यामुळे आंबोली टुरिझम आणि आंबोलीचे वर्षा पर्यटन पुर्णतः कोलमडले होते. परिणामतः येथील स्थानिकांचा रोजगार हिरावला गेला होता; मात्र या वर्षीचे आंबोलीचे वर्षापर्यटन आंबोली टुरिझम लाईव्ह दाखविण्याचे काम निर्णय राऊत करणार आहे.

टूरिझम पोर्टलवर हे पाहता येणार

  • आंबोलीतील नयनरम्य निसर्ग

  • मनमोहक घनदाट धुके

  • पावसाळ्यातील फेसळणारा मुख्य धबधबा

  • हिरण्यकेशी तीर्थक्षेत्र (नदी उगम), महादेवगड पॉइंट

  • आंबोली घाट, कावळेसाद पॉइंट

  • चौकुळ व्हिलेज (पठारे), बाबा धबधबा (कुंभवडे)

  • हिडेन पॉइंट हेही दाखविण्यात येणार

  • रात्रीच्या अंधारातील आंबोलीचे विश्व

  • रात्रीच्या किर्रर्र अंधारातील जीवांचा आवाज

  • काही पर्यटनस्थळे नियोजनानुसार प्रक्षेपित होणार

‘आंबोली टूरिझम’ होणार सुसज्ज

''आंबोली टूरिझम''चे पोर्टल लवकरच अद्ययावत होणार असून इंग्लिश भाषेसह मराठी व हिंदी भाषेतही उपलब्ध होणार आहे. आंबोलीची अधिकृत सविस्तर माहिती, जैविविधता आणि त्यातील विशेष नोंदी, पर्यटन, फूड्स, कोकण प्रॉडक्ट्स, आवश्यक सेवा, कृषि, हेल्प लाईन आदी सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत.

"आंबोली परिसरातील आजवर प्रसिद्धीस न आलेल्या अनेक बाबीसुद्धा पोर्टलवर पाहायला मिळतील. आंबोली, चौकुळ तथा गेळे परिसरातील मूळ स्थानिक संस्कृती, कलागुण, आपत्कालीन प्रशिक्षण, नेचर प्रोग्राम्स, जीवनशैली, मेडिटेशन हेही पाहायला मिळेल. ‘आंबोली टूरिझम’कडून आंबोली पर्यटन लाईव्ह पाहण्यासाठी ५ महिन्यांत सुमारे १ लाखांहून जास्त पर्यटकांनी नोंदणी केली आहे. जुलैपासून ‘आंबोली टूरिझम’ पाहता येणार आहे."

- निर्णय राऊत, आंबोली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT