Narayan Rane esakal
कोकण

जेवढी दडपशाही कराल, तेवढे कार्यकर्ते पेटून उठतील

रुपेश हिराप

सावंतवाडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या संकल्पनेनुसार केंद्रीय मंत्री नारायण राणे (Minister Narayan Rane) यांची सुरु असलेली जन आशीर्वाद यात्रा (BJP Jan Ashirwad Yatra 2021) हा पूर्वनियोजित दौरा आहे. त्यामुळे राजकीय दबावातून पोलिस (Police) प्रशासनाकडून सुरु असलेली दडपशाही लोकशाहीला धरुन नाही. कितीही दडपशाहीचा प्रयत्न केला तरीही हा दौरा यशस्वी होणारच, शिवाय प्रशासन जेवढी दडपशाही करेल तेवढे कार्यकर्ते पेटून उठून काम करतील, असा विश्वास भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली (BJP District President Rajan Teli) व्यक्त केला.

जन आशीर्वाद यात्रा दुसऱ्या टप्प्यात सिंधुदुर्गात दाखल होणार आहे.

येथील पालिकेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा प्रवक्ते संजू परब, शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, महिला शहराध्यक्षा मोहिनी मडगावकर, पालिका सभापती सुधीर आडिवरेकर, नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, नगरसेविका दीपाली भालेकर, समृद्धी विरनोडकर, उत्कर्षा सासोलकर, केतन आजगांवकर, परिक्षित मांजरेकर, दिलीप भालेकर, अमित परब, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.

श्री. तेली म्हणाले, ``जन आशीर्वाद यात्रेचा दौरा पूर्वनियोजित असताना व कोणत्याही प्रकारची निवडणूक आचारसंहिता नसताना पोलीस प्रशासनाकडून ग्रामपंचायत, तसेच पंचायत समितीला नोटिसा बजावून गावागावात उभे करण्यात आलेले फ्लेक्स बोर्ड व कटआउट हटविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. अशाप्रकारे प्रशासनाने नोटीस बजावणे हे कायदेशीर नसून रत्नागिरीप्रमाणेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री याच्या पाठीशी असतील, असा संशय घेण्यास वाव आहे. जन आशीर्वाद यात्रा दुसऱ्या टप्प्यात सिंधुदुर्गात दाखल होणार आहे. सिंधुदुर्ग हे राणे यांचे होमपीच आहे. येथील सर्व सत्ताकेंद्रे भाजपच्या ताब्यात आहेत. त्यामुळे या जिल्ह्यात मोठ्या धुमधडाक्यात व जल्लोषात एखाद्या महोत्सवाप्रमाणे हा दौरा होणार आहे. सर्वसामान्य जनतेबरोबरच दशावतार, वारकरी संप्रदाय व अन्य लोककला कलावंत उत्स्फूर्तपणे या दौर्‍यात सहभागी होणार आहेत. खारेपाटणपासून ते गोव्यापर्यंत गुढ्या, तोरणे व झेंडे उभारण्यात आले असून आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. कार्यकर्ते स्वतःहून त्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. पंतप्रधान मोदींच्या विविध योजनांचे लाभार्थी या दौऱ्यात राणे यांच्या माध्यमातून मोदींना आशीर्वाद देण्यासाठी सहभागी होणार आहेत.``

Rajan Teli

ते पुढे म्हणाले, ``केंद्रीय मंत्री राणे यांच्या सुक्ष्म लघु व मध्यम उद्योग खात्याच्या माध्यमातून येथील युवक-युवतींना उद्योग व्यवसायातून रोजगार निर्मिती करण्यासाठी या दौऱ्याच्या माध्यमातून माहिती देण्यात येणार आहे. येथील बेरोजगार युवकांशी संवाद साधण्यात येणार आहे. भेटीगाठी होणार आहेत. त्यामुळे जनताच उस्फूर्तपणे या दौर्‍यात सहभागी होणार असून प्रशासनाने कितीही दबाव आणून लोकशाही करण्याचा प्रयत्न केला तरीही यात्रा न भूतो न भविष्यती अशी होईल.`` कोण तरी सांगतो म्हणून प्रशासनाने दबावाखाली येऊन काम करू नये. अशा प्रकारच्या नोटीसा काढून कार्यकर्त्यांना उचकावणे योग्य नाही. सावंतवाडी पोलीस निरीक्षक गटविकास अधिकाऱ्यांना भेटले. ग्रामपंचायतींना नोटिसा देण्यात येत आहेत. हे काय चालले आहे. किमान जनतेला व न्यायालयाला तरी घाबरा. आमच्याकडेही सत्ताकेंद्र आहेत. तुम्हाला २९ तारखेनंतर सहकार्य लागणारच आहे. प्रशासन जेवढी दडपशाही करेल, तेवढे कार्यकर्ते पेटून उठून काम करतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICSE, ISC Exam Schedule: दहावी, बारावी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर; 'असं' डाऊनलोड करा

IPL 2025 Mega Auction Live Streaming: अर्जुन तेंडुलकर आता मुंबई इंडियन्सला नकोसा झाला, ३० लाखांतही कोणी बोली नाही लावली

Koregaon Bhima News : कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर उद्या अंतिम युक्तिवाद

Porsche Car Accident : आरोपींच्या विरोधात आरोप निश्चित करण्याचा अर्ज दाखल

Vaibhav Suryavanshi IPL Auction: नावातच 'वैभव'! १३ व्या वर्षी सूर्यवंशी झाला करोडपती; द्रविडच्या मार्गदर्शनाखाली RR कडून खेळणार

SCROLL FOR NEXT