रस्त्यावरील खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी  sakal
कोकण

Ratnagiri : शासनाचा उपक्रम ; ॲप वर फोटो टाका, ७२ तासांत खड्डेमुक्त व्हा!

बांधकाम विभागाकडून लवकरच नागरिकांना मिळणार दिलासा

राजेश नागरे

रत्नागिरी : रस्त्यावरील खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी नागरिकांना बांधकाम विभागाकडे सतत मारावे लागणारे हेलपाटे आता बंद होणार आहेत. राज्य शासनाने त्यासाठी पीसीआरएस (पॉटहोल कम्प्लेन्ट रिड्रेसल सिस्टिम) हे अॅप विकसित केले आहे. या अॅपवर खड्ड्याचा फोटो टाकल्यानंतर ७२ तासांत बांधकाम विभागाकडून दखल घेतली जाईल आणि दुरुस्तीसाठी पावले उचलण्यात येतील. याला रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम विभागाने दुजोरा दिला असून या अॅपवर काम सुरू असल्याचे सांगितले.

जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, अंतर्गत रस्ते यांची मोठ्या पावसात वाताहात होते आणि सर्वसामान्य नागरिकांना वर्षभर त्या खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागतो. याबाबत बांधकाम विभाग, नगरपालिका किंवा ग्रामपंचायतीकडे तक्रार करावी लागते. त्याची तत्काळ दखल घेतली गेल्याची उदाहरणे कमीच आहेत. नादुरुस्त रस्त्यांचा सर्वांत जास्त त्रास सर्वसामान्य नागरिकांना होतो.

नागरिकांच्या वाढत्या तक्रारी आणि त्यांना होणाऱ्या त्रासाचा विचार करून शासनाने याबाबत महत्वाचे पाऊल टाकले आहे. नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते मिळावेत, दळणवळण सोपे व्हावे यासाठी पीसीआरएस (पॉटहोल कम्प्लेन्ट रिड्रेसल सिस्टिम) हे अॅप तयार केले आहे. या अॅपवर खड्ड्याचा फोटो टाकला की, बांधकाम विभागाकडून ७२ तासांत याची दखल घेऊन ते खड्डे बुजवले जाणार आहेत.

नागरिकांसाठी शासनाने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. राज्य शासनाच्या खड्डेमुक्त योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी शासनाने हे अॅप विकसित केले आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर हे अॅप सुरू आहे. लवकरच सर्व नागरिकांना वापरासाठी खुले होणार असल्याचे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.

पीसीआरएस अॅप

स्मार्टफोनचा वापर करून प्ले स्टोअर्सद्वारे पीसीआरएस अॅप डाऊनलोड करता येईल. ही प्रक्रिया अतिशय सुलभ असून, अॅप ओपन करून सेटिंग करावी. त्यानंतर फोटो अपलोड केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून यंत्रणेला सूचना दिल्या जातील.

खड्डेमुक्त रस्ते या शासनाच्या धोरणानुसार शासनाने नागरिकांसाठी पीसीआरएस हे अॅप तयार केले आहे. अजून ते प्राथमिक स्टेजवर असून लवकरच ते सर्वांसाठी खुले केले जाणार आहे.

- जनक धोत्रेकर,सार्वजनिक बांधकाम विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saud Shakeel खेळला म्हणून पाकिस्तान पुढे जाऊ शकला; इंग्लंडविरुद्ध घेतली आघाडी

Beed Assembly Election 2024 : तर उमेदवार मीच असायला हवे , आमदार प्रकाश सोळंकेंनीच मागितली पक्षाकडे उमेदवारी

भीक मागून १ लाख इन्कम! भारतातल्या 'या' शहरात भिकाऱ्यांची नोकरदारापेक्षा जास्त कमाई, सरकारने लावला डोक्याला हात

Aditya Thackeray: आदित्य ठाकरेंविरोधात एकनाथ शिंदे उतरवणार 'हा' तगडा उमेदवार; राहुल गांधींशी होते साथीदार

Stock Marketमध्ये पैसे बुडाले, वडिलांच्या भीतीने आईसह दोन मुलांचं धक्कादायक कृत्य, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT