कोकण

रत्नागिरी तालुक्यात नियोजन; चार गावांत दररोज सरसकट चाचण्या

प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज चार गावांमधील लोकांची सरसकट चाचणीचे नियोजनf

सकाळ डिजिटल टीम

रत्नागिरी : दिवसाला शंभरहून अधिक कोरोनाबाधित सापडत (covid -19 positive) असल्याने पॉझिटिव्हिटी दरही अधिक आहे. रत्नागिरी तालुका हॉटस्पॉट (corona hotpost) बनला असून, नियंत्रण ठेवण्यासाठी कडक पाऊले ऊचलावी लागणार आहेत. त्यासाठी तालुका आरोग्य विभागाने चाचण्या वाढविण्यासाठी आठ प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज चार गावांमधील लोकांची सरसकट चाचणीचे नियोजन केले आहे.

जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर (positivity rate) खाली आला असताना रत्नागिरी तालुक्याचा दर ११.२८ टक्के आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण असतानाही चाचण्यांचे योग्य नियोजन होत नसल्याचे दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत मिश्रा यांनी सरसकट चाचण्या करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी प्रत्येक तालुक्याला नियोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सर्वाधिक बाधित सापडणाऱ्‍या चिपळूण, संगमेश्‍वर तालुक्यांनी चाचण्यांची संख्या वाढविली; परंतु रत्नागिरी तालुका मागे पडला आहे.

सध्या तालुक्यात १ हजार ४३४ बाधित उपचाराखाली आहेत. यामध्ये ग्रामीण भागातील ९१३ जणं असून ५२३ शहरातील आहे. हातखंबा प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या परिसरातील गावातून आलेले सर्वाधिक ३४९ बाधित उपचार घेत आहेत. त्यापाठोपाठ चांदेराई आणि पावस केंद्रांचा क्रमांक लागतो. शहरी भागात झाडगाव परिसरातील २१० तर कोकणनगरमधील ३१४ बाधित उपचार घेत आहेत.

तालुक्यात आतापर्यंत १३ हजार ५४४ एकूण बाधित सापडले होते. यामध्ये ४ हजार ५७१ शहरामधील तर ८ हजार ९७३ ग्रामीण भागातील आहेत. आतापर्यंत ११ हजार ६३९ जणं कोरोनामुक्त झाले. कोरोनाचे अधिक बाधित सापडल्यामुळे २ हजार ९१९ ठिकाणी कोरोना प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केली होती. सध्या त्यातील ४५९ ठिकाणी प्रतिबंधित नियम लागू आहेत. कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांपैकी ८१ हजार ५२९ जणांच्या तपासण्यात करण्यात आल्या आहेत. सामाजिक न्याय भवनात ८७ तर बीएड् कॉलेजमध्ये १०१ जण उपचार घेत आहेत.

आरोग्य केंद्र उपचाराखालील बाधित

  • चांदेराई १४७

  • हातखंबा ३४९

  • जाकादेवी ४५

  • खानू ४९

  • कोतवडे ८२

  • मालगुंड ५९

  • पावस 152

  • वाटद 28

"रत्नागिरी तालुक्यात चाचण्या वाढविण्यासाठी नियोजन केले असून तसे पत्र प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला दिले आहे. त्यानुसार कार्यवाही सुरू झाली आहे."

- डॉ. महेंद्र गावडे, जिल्हा आरोग्य अधिकारी.

एक नजर..

  • आतापर्यंत बाधित सापडलेः १३ हजार ५४४

  • शहरामधील बाधित ः ४ हजार ५७१

  • ग्रामीण भागातील बाधितः ८ हजार ९७३

  • आतापर्यंत कोरोनामुक्तः ११ हजार ६३९

  • कोरोना प्रतिबंधित क्षेत्रः २ हजार ९१९

  • संपर्कात आलेल्यांपैकी तपासण्याः ८१ हजार ५२९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT