कोकण

रत्नागिरी जिल्ह्याला मिळणार 44 कोटी 29 लाख रुपयांचा निधी

आपतग्रस्तांच्या बँक खात्यात जमा होणार रक्कम

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : ढगफुटीमुळे निर्माण झालेल्या पुर परिस्थितीत नुकसान झालेल्यांना राज्य शासनाने वाढीव मदत जाहीर करत दिलासा दिला. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याला 44 कोटी 29 लाख रुपयांचा निधी मिळणार आहे. त्यात खासगी मालमत्ता व दुकानदारांसाठी सर्वाधिक 25 कोटी 55 लाखाची तरतूद केली आहे. ही मदत आपद्ग्रस्तांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाणार आहे.

जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यात पूरस्थिती आणि दरडी कोसळण्याचे प्रकार घडले. यामध्ये मोठ्या प्रमाणात मालमत्तांचे नुकसान झाले. रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात ही स्थिती होती. याचा सर्वाधिक फटका चिपळूण शहराला बसलेला होता. जिल्हा प्रशासनाकडून झालेल्या पंचनाम्यानुसार आठशे कोटीचे नुकसान नोंदले गेले होते. त्यापैकी वैयक्तिक नुकसान 32 कोटी 52 लाख, सार्वजनिक मालमत्तेचे 293 कोटी 12 लाख , दुकाने व मालमत्तांचे 450 कोटी 7 लाख, शेतीचे 8 कोटी 48 लाखाचे तर मत्स्य व्यावसायाचे 16 लाख 80 हजाराचे नुकसान झाले होते.

या पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घोषणा केली होती. आपद्ग्रस्तांनासाठी तत्काळ पाच हजार रुपयांचे वाटपही करण्यात आले होते. सुमारे पावणे दोन कोटी रुपयो वितरीत केले गेले. आपद्ग्रस्तांनासाठी राष्ट्रीय आपत्ती नियंत्रण व्यवस्थापनच्या निकषापेक्षाही जादाची मदत देण्यासाठी राज्य शासनाकडून निधी तरतूद केली जाणार होती. त्यानुसार नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यासाठी 44 कोटी 29 लाख 17 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. राज्यासाठी 554 कोटी 87 लाख रुपये निधी जाहीर झाला आहे.

पूर येऊन दोन महिने झाले तरीही आपद्ग्रस्तांना भरपाई मिळालेली नव्हती. त्यामुळे नागरिकांमध्ये तिव्र नाराजी व्यक्त केली जात होती. चिपळूणातील व्यापार्‍यांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता. मात्र याबाबतचा शासन निर्णय 16 सप्टेंबरला काढण्यात आल्यामुळे येत्या काही दिवसात आपद्ग्रस्तांना थेट बँक खात्यात मदतीची रक्कम जमा होणार आहे.

दरम्यान, एसडीआरएफच्या जुन्या निकषानुसार 14 कोटी रुपयांची मदत मिळणार होती; परंतु राज्य शासनाने नुकसानीची स्थिती लक्षात घेऊन वाढीव मदत देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे 36 कोटी 81 लाख अधिकची तरतूद करण्यात आली आहे.

  1. कपडे, घरगुती भांडी किंवा वस्तूंसाठी = 4 कोटी 68 लाख 57 हजार

  2. मृत जनावरे = 2 कोटी 90 लाख 88 हजार

  3. कच्ची, पक्की घरे व झोपड्या, गोठे = 7 कोटी 64 लाख 72 हजार

  4. शेत जमीनीचे नुकसान = 2 कोटी 36 लाख

  5. मत्स्य व्यावसायीक = 2 लाख 23 हजार

  6. कारागिरांचे नुकसान = 14 लाख 1 हजार

  7. दुकानदार = 25 कोटी 55 लाख 56 हजार

  8. टपरीधारक = 96 लाख 60 हजार

  9. कुक्कुटपालन = 60 हजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

SCROLL FOR NEXT