रत्नागिरी - लंडनस्थित भोसले एंटरप्रायझेस आणि ग्लोबल कोकण यांच्या प्रयत्नातून रत्नागिरी हापूसची 21 डझनची पहिली कन्साईनमेंट लंडनमध्ये दाखल झाली. मुहूर्ताच्या पहिल्या डझनला 51 पौंड म्हणजेच भारतीय चलनानुसार 5 हजार रुपये विक्रमी दर मिळाला.
यंदाचा आंबा हंगाम प्रतिकूल असला तरीही रत्नागिरीचा हापूस जास्तीत जास्त निर्यात होणेसाठी संजय यादवराव यांच्या ग्लोबल कोकण संस्थेने पावले उचलली आहेत. या संस्थेतर्फे राजापूर तालुक्यातील तीन बागायतदारांकडील आंबा मुंबईतील निर्यातदाराकडे पाठविण्यात आला. वाशी येथील पणन मंडळाच्या पॅक हाऊसमध्ये त्यावर प्रक्रिया करण्यात आली.
मुंबईतून हवाईमार्गे 21 डझन हापूसचे बॉक्स लंडनकडे रवाना झाले. लंडनमधील भोसले एंटरप्रायझेसचे तेजस भोसले यांच्याकडे 21 फेब्रुवारीला हापूस पोचला. तेजस हे लंडनमध्ये राहत असून, गेली अनेक वर्षे हापूसची विक्री करत आहेत. गतवर्षीही त्यांनी हापूस निर्यात केला. बागायतदारांनी योग्य व्यवस्थापन केल्याने आंबा बाजारात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सध्या वाशी मार्केटमध्ये गतवर्षीपेक्षा कमी पेट्या जात आहेत. वातावरणामुळे यंदाचा हंगाम अडचणीत आहे. या प्रतिकूल परिस्थितीत रत्नागिरीचा हापूस निर्यात झाला आहे.
पहिल्या एक डझनच्या पेटीला 51 पौंड, तर अन्य 20 डझनला प्रत्येकी 30 पौंड दर मिळाला. पौंडला भारतीय चलनानुसार सध्या 101 रुपये मिळतात. यापूर्वी जास्तीत जास्त 18 ते 20 पौंड डझनला मिळत होते.
यंदा प्रथमच फेब्रुवारी महिन्यात हापूस निर्यात झाला. भविष्यात जास्तीत जास्त आंबा मार्केटमध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकर आंबा आल्यामुळे विक्रमी दर मिळाला.
- तेजस भोसले, भोसले एंटरप्रायझेस युके
रत्नागिरीतून थेट युरोपला
हापूसला युरोपमधील बाजारपेठ मिळवून देतानाच बागायतदाराला चांगला दरही आम्ही मिळवून देणार आहोत. हापूस निर्यातीचा पहिला मान राजापूर तालुक्याला मिळाला आहे. 15 मार्चनंतर आणखी हापूस पाठविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रथम प्रक्रियेसाठी वाशीतील पणन निर्यात केंद्राचा वापर केला. भविष्यात रत्नागिरीतील आंबा निर्यात केंद्रातून उष्णजल प्रक्रिया करून थेट हापूस निर्यात करणार आहोत, असे संजय यादवराव यांनी सांगितले.
निर्यातदार उत्पादक
राजापूर तालुक्यातील बागायतदारांना थेट शेतातून निर्यात करण्याची संधी मिळाली. पडवे गावातील बाबू अवसरे, कुंभवडे गावातील पंढरीनाथ आंबेरकर आणि वाडा तिवरे गावातील जयवंत वेल्ये निर्यातदार बागायतदार ठरले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.