लांजा - विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ करून तिला आत्महत्येस भाग पाडल्याच्या संशयातून अखेर लांजा पोलिसांनी पती, सासू-सासरे, दिर व जावू अशा नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला..
आत्महत्ये प्रकरणी पोलिसांनी सुरूवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र मयत महिलेच्या भावाने केलेल्या तक्रारीनंतर आता तिचा पती हरीश पुरूषोत्तम पटेल याच्यासह पटेल कुटुंबातील 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लांजा पोलिस वसाहती नजीक रवी भाई पटेल यांच्या घरी राहणाऱ्या प्रीती हरेश पटेल (वय 34) या विवाहितेने कुटुंबातून विभक्त राहण्यास देत नाहीत या रागातून ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना 31 जानेवारी रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास लांजा शहरात घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली होती. सारेकाही आलबेल असल्याचे वाटत असतानाच प्रीती हरेश पटेल यांचा भाऊ महेश धर्माची चव्हाण (31 राहणार श्री गजानन स्वामी अशोक नगर शिरशी तालुका शिरशी, जिल्हा उत्तर कान्हा, राज्य कर्नाटक )यांनी लांजा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याने या प्रकरणाला वेगळी दिशा मिळाली आहे.
महेश धर्माची चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पार्वती ऊर्फ प्रीती हरीश पटेल हिला पती, सासू-सासरे, दिर व जावू यांच्याकडून शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. तसेच अनेक वर्षे स्वतंत्र संसार करण्यास परवानगी देतो असे सांगूनसुद्धा स्वतंत्र संसार करू दिला दिला नव्हता तसेच तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. महेश चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार लांजा पोलिसांनी हरीश पुरूषोत्तम पटेल, पुरुषोत्तम पटेल, विनोद पुरुषोत्तम पटेल, अशोक पुरुषोत्तम पटेल, राजेश पुरुषोत्तम पटेल याच्यासह नऊ जणांविरोधात लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक उपनिरीक्षक श्वेता पाटील या करीत आहेत
संपादन - धनाजी सुर्वे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.