मंडणगड - उन्हाळ्यात घटणाऱ्या जलस्रोतांचे बळकटीकरण व्हावे याकरिता कुंबळे ग्रामपंचायतीने भारजा नदीपात्रात लोकसहभागातून बंधारा बांधण्यात आला आहे. सुमारे ७० फूट लांब व ३ फूट उंच असा बंधारा बांधण्यात आला आहे.
नदीपात्रात वाढत चाललेली जलवनस्पती व गाळाने भरत असलेल्या पात्रामुळे मुबलक पाऊस पडूनही नदीमध्ये पाणी साठून राहत नाही. यामुळे गावातील विहिरी व कूपनलिकांच्या पाण्याची पातळी मार्चअखेर कमी होऊ लागते. यावर उपाय म्हणून नदीपात्रात पाणी असतानाच बंधारे बांधल्यास फायदा होऊ शकतो.
याच संकल्पनेतून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मार्गदर्शनाने व ग्रामपंचायतीने बौद्धवाडी व दळवीवाडीमधील ग्रामस्थ आणि हुतात्मा भोईटे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने श्रमदानातून दोन बंधारे बांधले. विशेष म्हणजे गावची नळपाणी योजनेची विहीर असलेल्या ठिकाणीच हे दोन्ही बंधारे बांधले गेले आहेत. त्यामुळे भविष्यकाळात गावच्या नळपाणी योजनेच्या विहिरीतील पाण्याची पातळी कमी होण्याचा धोका कमी झाला आहे. या वेळी सरपंच किशोर दळवी, भोईटे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. घाणेकर, ग्रामसेवक श्री. बुध उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.