कासव sakal
कोकण

रत्नागिरी : कासव जन्मदराला तापमानवाढीचा ताप

अभ्यासाचा निष्कर्ष; ३३ अंशांपेक्षा वाढल्यास मादी पिल्ले अधिक, तापमान संतुलनाचे आव्हान

राजेश कळंबटे

रत्नागिरी: वाढत्या तापमानाचा परिणाम कोकणातील सागरी कासवांच्या जन्मदरावर होत असल्याचे संशोधनातून पुढे आहे. वाढत्या तापमानामुळे पिल्ले कमी संख्येने मिळतात. ती अशक्त असल्यामुळे त्यांच्या हालचालीही मंद असतात. काही अंड्यांमध्ये पिल्ले मृत पावलेली असतात. घरट्याच्या आतील तापमान ३३ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक झाले तर मादी पिल्लांची संख्या वाढत असल्याचाही निष्कर्ष काढण्यात आला आहे. कासव संवर्धनात पिल्लांचा जन्मदर वाढविण्यासाठी तापमान संतुलनाचे आव्हान कासवमित्रांपुढे निर्माण झाले आहे.

कोकण किनारपट्टीवर दरवर्षी ‘ऑलिव्ह रिडले’ प्रजातीच्या माद्या अंडी घालतात. नोव्हेंबर ते मार्च दरम्यान वीण होते. पूर्वी नोव्हेंबर ते डिसेंबर या थंडीच्या महिन्यात सागरी कासवांची घरटी सापडत होती. गेल्या काही वर्षांमध्ये ही घरटी उन्हाळी महिन्यांमध्ये दिसू लागली आहेत. या बदलांबरोबरच कासवांच्या विणीवर तापमानाचा होणारा परिणाम तपासण्यासाठी अभ्यास प्रकल्प वन विभागाच्या ‘मँग्रोव्ह फाउंडेशन’च्या माध्यमातून हाती घेण्यात आला. भारतीय वन्यजीव संस्थानचे वरिष्ठ संशोधक डॉ. के. शिवाकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ’पीएच.डी. स्कॉलर’ सुमेधा कोरगावकर यांनी अभ्यास केला. तीन वर्षे केलेल्या अहवालातून कासवांचा विणीवर तापमान बदलाचा गंभीर परिणाम होत असल्याचे पुढे आले आहेत. यासाठी दिवआगर, केळशी, आंजर्ले, कोळथरे, दाभोळ, गावखडी, माडबन (जि. रत्नागिरी), वायंगणी (जि. सिंधुदुर्ग) हे किनारे निवडण्यात आले होते.

कासवांच्या पिल्लांचे लिंग विकसित होण्यासाठी घरट्यातील तापमान महत्त्वाचे असते. साधारणपणे २९.५ अंश सेल्सिअस तापमानामुळे अंड्यांमध्ये समानरित्या नर आणि मादीचे लिंग विकसित होते. ३३ अंश सेल्सिअस पर्यंतचे तापमान अंड्यांच्या विकासाकरिता सुरक्षितही असते. संशोधनासाठी वापरलेल्या ’डेटा लॉगर’मुळे कासवांच्या घरट्यातील तापमान ३६ ते ३७ अंश सेल्सिअसपर्यंत वाढत असल्याची

जन्मदर वाढल्याचे निरीक्षण नोंदले

बऱ्‍याचवेळा लाटांच्या पाण्याबरोबर वाहून येणाऱ्‍या गाळाचे कण वाळूमध्ये मिसळतात आणि घरट्यातील आद्रर्ता, अधिक तापमानामुळे ते दगडासारखी कडक होतात. त्यात कासवांची पिल्ले अडकून मृत पावतात. हे निष्कर्ष पुढे आल्यानंतर त्यावर उपाययोजना करण्यासाठी कासवं अंडी घालून गेल्यानंतर ती सुरुच्या वनामध्ये किंवा घरट्यातील तापमान संतूलित राहील, अशा ठिकाणी स्थलांतरित केली तर पिल्लांचा जन्मदर वाढू शकतो. गावखडीत कासवमित्र प्रदीप डिंगणकर यांनी केलेल्या प्रयोगामुळे जन्मदर वाढल्याचे निरीक्षण नोंदले आहे.

लाल मुंग्याचा त्रास

घरट्यामधील वाढते तापमान आणि आर्द्रता ’डोरिलस ओरिएंटलिस’ मुंग्यांसाठी पोषक असते. या मुंग्या कासवांच्या पिल्लांना आणि परिपक्व अंड्यांना खातात, असे कोळथरे आणि वायंगणी (वेंगुर्ला) येथील घरट्यांच्या तपासणीतून पुढे आले. मुंग्यांचे हल्ले कमी करण्यासाठी कडुलिंबाच्या बियांची पावडर घरट्यांच्या बाजूने खोदून पेरण्यात आल्या. त्यामुळे मुंग्यांचा प्रभाव कमी झाला आणि घरट्यांचे रक्षण झाले

रत्नागिरी कासवांच्या घरट्यातील तापमानाची नोंद घेताना संशोधक सुमेधा कोरगावकर.

कासवांच्या विणीवर तापमान वाढीचा परिणाम लक्षात आला असून अभ्यासात सुचविलेल्या उपायांची अंमलबजावणीसाठी आवश्यक निकष तयार केले जातील. तसेच संबंधितांना प्रशिक्षणही दिले जाईल. तर ’डेटा लॉगर’चा वापर करून घरट्यांमधील तापमानाचे बदल समजून घेणे आणि जन्मदर वाढवण्याकरिता दीर्घकालीन डेटा संकलित करण्याची योजना आखणार आहे.

विरेंद्र तिवारी, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, कांदळवन कक्ष

कासव संवर्धनासाठीच्या संशोधानामुळे उपाययोजना करणे शक्य होईल. तापमान वाढीमुळे पिल्लांच्या जन्मावर होत असल्याचे लक्षात आल्याने कासवमित्र स्वतःहून त्यांची काळजी घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे उमेदवार विनोद शेलार आघाडीवर

Vikhe Patil Won Shirdi Assembly Election 2024 final result live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे भाजपकडून असलेले उमेदवार हेमंत रासने यांची विजयाच्या दिशेने घौडदौड

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT