कोकण

स्वाभिमानचा वातावरण निर्मितीवर भर

अमोल टेंबकर

सावंतवाडी - लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतानाच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून उमेदवारी घोषित करण्यात आलेल्या नीलेश राणे यांच्यासाठीचा प्रचार सुरू झाला आहे. इतर पक्षांच्या तुलनेत स्वाभिमानने सिंधुदुर्गात प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, वातावरण निर्मिती बरोबरच निलेश राणेंची छबी असलेले फलक झळकू लागले आहेत. 

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सिंधूदुर्ग-रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यातील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी डॉ. निलेश राणे यांच्या उमेदवारीला एकमताने पाठिंबा दिला आहे. 2009 मध्ये श्री राणे कॉंग्रेसच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आले होते. 2014 मध्ये मात्र शिवसेनेच्या विनायक राऊत यांचा विजय झाला. आता पुन्हा एकदा लोकसभेचे पडघम वाजू लागले आहेत.

एकमताने महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून निलेश राणे यांच्या नावाला हिरवा कंदील देण्यात आला आहे. उमेदवाराचे नाव स्पष्ट झाल्याने स्वाभिमानने मोर्चे बांधणीत आघाडी घेतली आहे. निलेश राणे यांनी पाच वर्षाच्या खासदारकीच्या काळात केलेले काम मतदारांपर्यंत पोहोचवले जात आहे. त्यांनी जिल्ह्यात विकासाचे प्रकल्प आणले होते. मोठ्या प्रमाणात निधी आणला होता.

झाराप-पत्रादेवी महामार्गाचे चौपदरीकरण, जिल्ह्यात काही महत्त्वाच्या रेल्वेंना थांबा मिळवून दिल्याचा प्रचार आतापासूनच सुरू झाला आहे. जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात राणे यांचे फलक झळकत आहेत. इतर पक्षांनी मात्र अद्याप प्रचार सुरू केलेला नाही. स्वाभिमानकडून आमदार नितेश राणे यांचे जिल्हाभर दौरे सुरू असून वातावरण निर्मितीसाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kangana Ranaut: महाराष्ट्राचा निकाल लागताच कंगनानं उद्धव ठाकरेंना दैत्य संबोधलं! म्हटलं...

IPL 2025 Mega Auction LIVE Streaming: पहिला दिवस संपला! स्टार खेळाडूंनी भाव खाल्ला; अनेक खेळाडू झाले मालामाल

Nilesh Rane : आमदार होताच निलेश राणेंची धमकी, म्हणाले, ...तर त्याचा जागेवरच बंदोबस्त करु

IND vs AUS 1st Test: ४ बाद, १७ धावा! टीम इंडियाचा दरारा; ऑस्ट्रेलियात मोडला ११३ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम

Latest Maharashtra News Updates : हेमंत रासने यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

SCROLL FOR NEXT