Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Muslim Community esakal
कोकण

उद्धव ठाकरेंच्या पाठीशी नवी ताकद; मुस्लिम मोहल्ल्यातून लोकसभेत शिवसेनेच्या उमेदवाराला सर्वाधिक मताधिक्य

सकाळ डिजिटल टीम

निवडणूक निकालानंतर मुस्लिम मतदार ठाकरेंच्या बाजूने ठामपणे उभे राहिल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

चिपळूण : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा (Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha) मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांचा पराभव झाला तरीही चिपळूण विधानसभा मतदारसंघातून राऊत यांना सुमारे १९ हजार मतांचे मताधिक्य मिळाले. या मतदारसंघांत मुस्लिम समाजाचे (Muslim Community) प्राबल्य आहे. भाजपवर नाराज असलेला हा समाज उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडे वळला आहे. मुस्लिम मोहल्ल्यातून ठाकरे गटाचे राऊत यांना सर्वाधिक मतदान झाल्याचे निवडणूक निकालानंतर आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

शिवसेनेचा (Shiv Sena) पारंपरिक नसलेला नवा मतदार ठाकरे गटाला मिळाल्याने उत्साहाचे वातावरण आहे. दुसरीकडे काँग्रेससह दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निकालाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. चिपळुणात महाविकास आघाडीचाच दणका पाहायला मिळाला.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून भाजपचे नारायण राणे (Narayan Rane) निवडून आले तरीही चिपळूण विधानसभा मतदारसंघात ठाकरेंसाठी मुस्लिम समाजाचे मतदार कैवारी ठरले आहेत. कारण, या वेळची लोकसभा निवडणूक ठाकरे शिवसेनेसाठी महत्त्वाची होती. पक्षफुटीनंतरची ही पहिली निवडणूक असल्यामुळे ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यातच यंदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुस्लिम समाजाच्या रूपाने नवा मतदार मिळाला आहे. त्यामुळे चिपळूण विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे राऊत यांना मताधिक्य मिळाल्याची चर्चा सुरू आहे.

निवडणूक निकालानंतर मुस्लिम मतदार ठाकरेंच्या बाजूने ठामपणे उभे राहिल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. शिवसेना एकेकाळी कट्टर हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळखला जायचा आणि त्यामुळे मुस्लिम समाज शिवसेनेपासून दोन हात लांबच पाहायला मिळायचा. आता शिवसेना दोन गटांत विभागली असून, ठाकरेंच्या शिवसेनेत हे समीकरण काहीसे बदलल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेला चिपळूण शहर आणि ग्रामीण भागातील मुस्लिम मतदारांनी भरभरून पाठिंबा दिल्याचे यंदाच्या निवडणुकीत पाहायला मिळाले.

मतदान केंद्र विनायक राऊत नारायण राणे

  • मालदोली ३६९ ३२

  • मजरे काशी १९२ ३६

  • कळंबस्ते ४१२ ४८

  • उक्ताड ४९५ ३०२

  • पेठमाप १ ५८० ११३

  • पेठमाप २ २४३ २१

  • पेठमाप ३ ५७१ १९

  • गोवळकोट १ ३४३ ७०

  • गोवळकोट २ ४३८ १३०

  • गोवळकोट ३ ५९१ १३

  • मुरादपूर ४०० २२

  • देसाई मोहल्ला ५७३ ६७

  • पागमोहल्ला ४२८ १४८

  • भाटकर मोहल्ला ४८७ १२२

  • बहादूरशेख १ ४०६ २२७

  • बहादूरशेख २ ३१० १७८

  • काविळतळी मोहल्ला ४९५ २३४

  • कालुस्ते १ ३८७ ७

  • कालुस्ते २ १९५ ३३

  • कोंढे १ ३५४ ३८

  • कोंढे ३५५ ९८

  • मिरजोळी ३८२ ८८

  • खेर्डी मोहल्ला ५०९ ११२

  • पिंपळी बु. ६२३ १५४

  • कान्हे २७६ ७५

  • कुंभार्ली मोहल्ला ३६६ १५५

  • अलोरे मोहल्ला ४१९ १३४

  • सावर्डे मोहल्ला १ ४१८ २६१

  • सावर्डे मोहल्ला २ ४८८ १३७

  • पोफळी सय्यदवाडी ५२० ६९

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT