Omicron variant Sakal media
कोकण

रत्नागिरी : परदेशातून आलेले ७२ जण गेले कोठे?

तेजस भागवत

रत्नागिरी : दुबई, ओमान, कुवेतसह अन्य देशांमधून आलेल्यांमध्ये आणखी ११० जणांची भर पडली आहे. परेदशातून रत्नागिरी जिल्ह्यात आलेल्यांची एकूण संख्या ९३५ वर पोचली आहे. ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सुरक्षेसाठी संबंधितांची आठ दिवसांनी पुन्हा आरटीपीसीआर तपासणी करण्यात येत असून अद्याप परदेशातून आलेल्यांपैकी एकहीजण पॉझिटिव्ह सापडलेला नाही. मात्र, ७२ प्रवाशांशी संपर्कच होत नाही, ही बाब चिंता वाढवणारी आहे.

ओमिक्रॉनचा भारतामध्ये शिरकाव झाल्यानंतर राज्य शासनाकडून सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परदेशामधून आलेल्यांची यादी विमानतळावरुन जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणेकडे पाठविण्यात आली होती. सोमवारी परदेशातून आलेल्या नागरिकांमध्ये ११० जणांची भर पडली असून आणखीन काही परदेशी लोकं गावाकडे परत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार प्राप्त यादीतील सर्वांशी संपर्क झाला आहे.

आठ दिवसांनी पुन्हा आरटीपीसीआर

नव्याने दाखल ११० पैकी ३२ जणांची आरटीपीसीआर चाचणी विमानतळावरच झाली असून त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत २६० जणांची चाचणी करण्यात आली आहे. त्यांच्यापैकी कुणालाही लक्षणे नसल्याने सध्या त्यांना घरीच राहण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यांच्यावर आठ दिवस आरोग्य यंत्रणेचे लक्ष राहणार आहे. आठ दिवसांनी पुन्हा आरटीपीसीआर चाचणी केली जाणार आहे.

संगमेश्वरातील १६ जण

परदेशातून आलेल्या ७२ प्रवाशांचा आरोग्य यंत्रणेशी संपर्क होतं नाही. त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. त्यात संगमेश्वर तालुक्यातील १६ जणांचा समावेश आहे.

सर्वाधिक चिपळूण तालुक्यातील

जिल्ह्यात आलेल्यांपैकी सर्वाधिक चिपळूण तालुक्यातील २३२ तर रत्नागिरी तालुक्यातील २०७ जण आहेत. दापोली १२८, खेड १८६, गुहागर १५, संगमेश्वर ५९, लांजा १८, राजापूर २७ तर जिल्ह्याबाहेरील २१ जण आहेत. यातील २० जण रत्नागिरी तालुक्यातील आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Election : 'MIM सर्व जाती-धर्माला सोबत घेऊन जाणारा पक्ष, सोलापुरातील 'या' मतदारसंघांत देणार उमेदवार'

IPL 2025 News : दिल्ली कॅपिटल्सने Saurav Ganguly ला संचालक पदावरून हटवले

Latest Maharashtra News Updates : संविधानाची रोज हत्या होते : संजय राऊत

Diwali Vatu Tips For Money: आर्थिक समस्यांने त्रस्त आहात? मग दिवाळीपूर्वीच करा 'ही' कामे, माता लक्ष्मीची कायम राहील कृपादृष्टी

Manoj Jarange Patil: हाच तो ट्रॅप! जरांगेंनी बोलावलेल्या बैठकीला एससी, एसटी, मुस्लिम समाजाचे नेते; ''आता कुठलाही पक्ष असू द्या..''

SCROLL FOR NEXT