Katal Shilp Konkan esakal
कोकण

कोकणातील कातळशिल्प 'राज्य संरक्षित'; शासनाकडून मोठी घोषणा, 175 गावांत 2 हजारांहून अधिक कातळखोद चित्रांची नोंद

उक्षी येथील कातळशिल्प (Katal Shilp) राज्य संरक्षित म्हणून घोषित करण्यात आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

उक्षी येथील कातळ खोदचित्राला राज्य शासनाने (Maharashtra Government) राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे.

रत्नागिरी : उक्षी येथील कातळशिल्प (Katal Shilp) राज्य संरक्षित म्हणून घोषित करण्यात आले आहे. यापूर्वी बारसू येथील कातळशिल्प समूह क्र. २, चवे, देवीहसोळ आणि कशेळी ही कातळ शिल्प राज्य संरक्षित स्मारके म्हणून घोषित करण्यात आली आहे. युनेस्कोच्या प्रस्तावित यादीत कातळशिल्प समाविष्ट होत असताना शासनाने राज्य संरक्षित स्मारकाची घोषणा केल्यामुळे त्यांना पाठबळ मिळणार आहे.

उक्षी येथील कातळ खोदचित्राला राज्य शासनाने (Maharashtra Government) राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. याबाबतची अधिसूचना मंगळवार (ता. ३०) जारी झाली आहे. कोकणातील प्रागैतिहासिक व विशेषत्त्वाने मध्याश्मयुगीन मानवाने निर्माण केलेली कलाकृती म्हणून उक्षी येथील कातळशिल्पाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. उक्षी हे मध्याश्मयुगीन काळातील असून या कातळशिल्पावर हत्ती दाखविण्यात आला आहे.

संरक्षित करण्यात आलेल्या कातळशिल्पासह सभोवताली आसलेल्या ६६०.४० चौरस मीटर जागा संरक्षित करण्यात येणार आहे. कोकणात अश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण अधोरेखित करणारी कातळ खोदचित्रे आहेत. कोकणात आढळून येत असलेली कातळशिल्प ही जांभ्या दगडांनी युक्त उघड्या कातळ सड्याच्या पृष्ठभागावर कोरलेली आहेत.

ही शिल्प एका विशिष्ट जागेत न आढळता समुद्रकिनाऱ्यालगत सुमारे ३०० किलोमीटर अंतरावर विविध ठिकाणी आढळून येतात. गेल्या १३ वर्षांपासून रत्नागिरीत सुधीर तथा भाई रिसबूड, धनंजय मराठे आणि डॉ. प्रा. सुरेंद्र ठाकुरदेसाई यांच्या टीमने कातळशिल्प शोध, संशोधनाला सुरुवात केली. आतापर्यंत कोकणात १७५ गावांत २ हजारांहून अधिक कातळखोद चित्रे नोंद झाली आहेत. त्यातील १७ गावांतून राज्य संरक्षित स्मारक होण्याकरिता प्रस्ताव शासनाकडे पाठवले आहेत. हा दर्जा देण्याकरिता प्रक्रिया सुरू झाली आहे.

१२ ठिकाणांबाबत काम सुरू

जिल्ह्यातील आतापर्यंत चार कातळशिल्पांना राज्य संरक्षित स्मारके म्हणून घोषित करण्यात आले आहे अजून १२ ठिकाणांना दर्जा मिळण्याची प्रक्रिया होणार आहे. त्याबाबतचे काम सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Reliance And Diseny: अखेर झाली घोषणा! रिलायन्स-डिझ्ने आले एकत्र; 70,352 कोटींचं जॉईन्ट व्हेंचर; नीता अंबानींवर अध्यपदाची जबाबदारी

Sports Bulletin 14th November: एकाच मॅचमध्ये दोघांची त्रिशतकं, गोव्याचा ऐतिहासिक विजय ते चॅम्पियन्स ट्रॉफी अपडेट्स

बुरखा घातल्याने 'मोदीं'च्या सभेत प्रवेश नाकारला; मुस्लीम महिलांनी घेतली आक्रमक भूमिका, शिवाजी पार्कवर काय घडलं?

Lok Poll Survey: मविआला स्पष्ट बहुमत! महायुतीच्या पारड्यात ‘इतक्या’ जागा; लोकपोलचा निवडणूकपूर्व सर्व्हे काय सांगतोय?

Narendra Modi: पंतप्रधान पदासाठी नावाची घोषणा; मोदींनी सांगितली, रायगडावरची 'ती' खास आठवण

SCROLL FOR NEXT