राजापूर : कोरोनानंतरची बेरोजगारीची स्थिती भयानक आहे. कोकणच्या अनेक पिढ्या रोजगारासाठी मुंबईसारख्या मोठ्या शहरात स्थलांतरित झाल्या होत्या. सध्या त्यापैकी अनेक कोकणात परतले आहेत. परतणाऱ्या नव्या पिढ्या तुमचे काळ्या दगडावरचे नकार स्वीकारायच्या मनःस्थितीत नाहीत. त्यातून कोकणच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासह बेरोजगारी दूर करणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणारे खासदार, आमदारांसारखे काळे दगड कोकणच्या समुद्राच्या तळाशी कायमचे फेकतील. ‘तुम्हाला रिफायनरी नको असेल तर, जनतेला शिवसेना नको आहे, हे लक्षात ठेवा’, असा इशारा भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिला.
जनता महाजन आंदोलन करेल
लॉकडाउनच्या काळामध्ये रिफायनरी प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. राज्याचे शिक्षणमंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी रिफायनरी प्रकल्पाबाबत नुकतेच विधान केले. त्याचा माजी आमदार जठार यांनी खरपूस शब्दामध्ये समाचार घेतला. जठार म्हणाले की, राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पामध्ये कोकणचा आर्थिक कायापालट करण्याची क्षमता आहे. तसेच, राजापुरात रिफायनरी प्रकल्प व्हावा, म्हणून येथील जनता मुख्यमंत्र्यांना साकडे घालत आहे. स्वेच्छेने आठ हजार एकरपेक्षा अधिक जमीन प्रकल्पासाठी देत आहे. तुमचा नकार जर असाच कायम राहिला तर लवकरच कोकणी जनता महाजनआंदोलन उभे करेल, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.
हेही वाचा- ब्रेकिंग - रत्नागिरीत आणखी ६६ जणांना कोरोनाची लागण तर कोरोनाने प्रसिद्ध वैद्य डॉक्टरांचा मृत्यू... -
ईगोपायी नाकारत जनतेला भिकारी ठेवायचे...
प्रमोद जठार म्हणाले, की वैयक्तिक इगोच्या राजकारणातून रिफायनरीला नाकारण्याचा प्रयत्न मंत्री सामंत आणि खासदार राऊत यांनी करू नये. पुढाऱ्यांनी श्रीमंतीचे अन् ऐशाआरामाचे जीवन जगायचे आणि येथील तरुणांना रोजगार देणारे प्रकल्प स्वतःच्या ईगोपायी नाकारत जनतेला भिकारी ठेवायचे, हे उद्योग आता जनता अजिबात सहन करणार नाही.
संपादन - अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.