चिपळूणच्या नदीतील गाळ काढला sakal
कोकण

चिपळूणच्या नदीतील गाळ काढला; पण जागेआभावी ढीग काठावरच!

कामाची गती मंदावली भरावासाठी जागेचा प्रश्न कायम

नागेश पाटील -सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : शहरातील शिव नदीतील गाळ काढण्याचे काम सुरू असून, काढलेला गाळ हा नदीकिनाऱ्यावरच राहिला आहे. पावसाळ्यापूर्वीच काठावरच गाळ उचलायला हवा. मात्र, सध्या गाळ टाकण्यासाठी पुरेशी शासकीय जागा शिल्लक राहिलेली नाही. परिणामी, शिव नदीतील गाळ काढण्याचे काम काहीसे मंदावले आहे. शासनाने खासगी वापरासाठी गाळ देण्याचे धोरण स्वीकारले असले तरी त्याबाबत शासन निर्णयात संदिग्धता आहे. त्यामुळे काढलेला गाळ टाकायचा तरी कोठे, असा प्रश्न चिपळूण शहराची पुरापासून मुक्तता होण्यासाठी चिपळूण बचाव समितीच्या माध्यमातून शहरवासीयांनी मोठे आंदोलन छेडले.

याचा परिपाक म्हणून जलसंपदा विभागाची राज्यातील सर्वाधिक मोठी यंत्रणा चिपळुणात गाळ काढण्याच्या कामी लागली. नाम फाउंडेशन आणि जलसंपदाच्या यांत्रिकी विभागाकडून आतापर्यंत सुमारे साडेचार लाख घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. यामध्ये नाम फाउंडेशनकडून सुमारे पावणेदोन लाख घनमीटर गाळ काढण्यात आला. नाम फाउंडेशनकडून तीन पोकलेन शिवनदीतील तर उक्ताड येथे एक पोकलेन गाळ काढण्यासाठी कार्यरत आहे. शिवनदीतील काढलेला बहुतांशी गाळ हा नदीकिनारीच ठेवण्यात आला आहे. काढलेल्या गाळाची वाहतूक होण्यासाठी लोकसहभागाचे आवाहन केले होते; मात्र त्यास मोठा प्रतिसाद लाभलेला नाही. त्यातच शहरातील बहुतांश शासकीय कार्यालयाच्या जागा गाळाच्या भरावाने व्यापलेल्या आहेत.

काही दिवसांपूर्वीच नदीतील गाळ हा खासगी, तसेच शेतीच्या कामास वापरण्याची मान्यता शासनाकडून देण्यात दिली होती; मात्र याबाबतचे सर्वाधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. आदेशात संदिग्धता असल्याने अद्यापही खासगी लोकांना गाळ नेण्यास मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे सध्या शिवनदीतील गाळ काढण्याचे काम सुरू असून, काढलेला गाळ हा काठावरच ठेवण्यात येत आहे.

पावसाळ्यापूर्वीच हा गाळ उचलण्याचे नियोजनदेखील आहे; मात्र एप्रिल, मे महिन्यात पाऊस झाल्यास काढलेला गाळ नदीत जाण्याची शक्यता आहे. शिवनदीतील गाळाची वाहतूक करण्यासाठी डंपरची आवश्यकता आहे. शिवनदीत दररोज सरासरी दीड हजार घनमीटर गाळ काढला जातो; मात्र गेल्या वेळेचा काढलेला गाळ टाकायचा तरी कोठे, याचा निर्णय त्वरित होत नसल्याने गाळ काढण्याची गती मंदावली आहे. दुसरीकडे कोयनेत नियमित वीजनिर्मिती सुरू असल्याने वाशिष्ठीला कायम पाणी असते. त्यामुळे आता गाळ काढण्याच्या कामावर परिणाम होत आहे.

पावसाळ्यापूर्वीच शिवनदी गाळमुक्त करण्यासाठी नाम फाउंडेशनचे प्रयत्न सुरू आहेत; मात्र काढलेला गाळ टाकण्यासाठी जागाच शिल्लक राहिलेल्या नाहीत. गाळ टाकण्यासाठीची जागा उपलब्ध करून देण्याची मागणी आम्ही प्रशासनाकडे केली आहे. प्रशासनाने लवकरात लवकरत जागा उपलब्ध करून द्याव्यात.

- महेंद्र कासेकर, समन्वयक, चिपळूण

गाळ इतरत्र हलवा जिल्हाधिकारी

दरम्यान, चिपळूण शहरात पुन्हा पुराचे संकट येऊ नये यासाठी खास बाब म्हणून वाशिष्ठी आणि शिव नदीतील गाळ उपसण्याचे काम ५२ टक्के पूर्ण झाले आहे. शिव नदीच्या किनाऱ्यावर उपसलेला गाळ तातडीने पूरबाधित क्षेत्राबाहेर टाकावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिले. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यात गाळ उपशाच्या कामाला गती देण्याचीही सूचना त्यांनी केली. गाळ उपसताना तोडलेली झाडेही इतरत्र नेण्यात यावी. तसेच, गाळ मागणी अर्जांना मंजुरी देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आशिष शेलार आघाडीवर

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT