A Mere Watan Ke Logon Song Lata Mangeshkar esakal
कोकण

'ऐ मेरे वतन के लोगो..' चीन युद्धातील पराभवानंतर सैनिकांना समर्पित गाणं; लतादीदींच्या गाण्याचे 'हे' आहेत साक्षीदार

१९६२ चे चीन युद्ध (India vs China War) म्हणजे धोकेबाजीचा आणि त्यातून पदरी पाडलेल्या पराभवाचा इतिहास आहे.

अमित पंडित

गाणं संपताच पंतप्रधान नेहरू स्टेजवर आले तेव्हा त्यांचे डोळे पाण्याने भरले होते. स्टेजच्या मागेच जेमतेम १५ फुटांवरून हवालदार बेंदरकर यांनी हे दृश्य प्रत्यक्ष पाहिले.

साखरपा : एखाद्या गाण्याच्या पहिल्या गायनाचे प्रत्यक्ष साक्षीदार होणे हे भाग्यच म्हणायला हवे आणि त्यातून ते गाणे लता मंगेशकरांचे असेल तर त्या भाग्याचा हेवाही अधिक वाटणार, हे सांगायला नको. असेच एक भाग्यवान श्रोते म्हणजे निवृत्त सैनिक हवालदार सुधाकर बेंदरकर.

१९६२ चे चीन युद्ध (India vs China War) म्हणजे धोकेबाजीचा आणि त्यातून पदरी पाडलेल्या पराभवाचा इतिहास आहे. आजही ही जखम अनेकांना मानसिक त्रास देत असते. या पराभवानंतर भारतीय सैन्याचे (Indian Army) मनोबल खच्ची झाले होते. त्यांना उभारी आणण्यासाठी दिल्ली येथील नॅशनल स्टेडियममध्ये २६ जानेवारी १९६३ ला एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या ध्वनी संयोजनाची जबाबदारी सैन्याच्या कोअर ऑफ सिग्नल्स या डिव्हिजनला देण्यात आली होती. त्या डिव्हिजनचे सैनिक हवालदार सुधाकर बेंदरकर यांनी त्या कार्यक्रमाच्या आठवणी सांगितल्या. बेंदरकर म्हणाले, ‘त्या कार्यक्रमाला राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासह लता मंगेशकर उपस्थित होत्या. राष्ट्रगीत झाल्यानंतर लतादीदींनी ‘ऐ मेरे वतन के लोगों, हे गाणं प्रथम गायला सुरवात केली. सैनिकांना समर्पित असा अर्थ असलेल्या या गाण्याने नुकत्याच संपलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर श्रोत्यांच्या भावना हेलावून सोडल्या.

Retired constable Sudhakar Bendarkar

गाणं संपताच पंतप्रधान नेहरू स्टेजवर आले तेव्हा त्यांचे डोळे पाण्याने भरले होते. स्टेजच्या मागेच जेमतेम १५ फुटांवरून हवालदार बेंदरकर यांनी हे दृश्य प्रत्यक्ष पाहिले. स्टेजसमोर मैदानावर आलेल्या हजारो श्रोत्यांमध्ये शांतता पसरली होती. श्रोत्यांमधून हे हुंदक्यांचे आलेले आवाज स्पष्टपणे ऐकता येत होते. त्यामुळे भारावून जायला झाले होते.

दृष्‍टिक्षेपात...

  • १९६३ ला प्रथम गायले लता मंगेशकर यांनी गाणे

  • चीन युद्धातील पराभवानंतर सैनिकांना समर्पित गाणे

  • कार्यक्रमाचे ध्वनी संयोजन कोअर ऑफ सिग्नल्स डिव्हिजनकडे

  • अवघ्या दहा-पंधरा फुटांवरून बेंदरकर यांनी ऐकले गाणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT