The revised squad land will now hit the citizens kokan marathi news 
कोकण

सुधारित दस्ताचा नागरिकांना आता बसणार फटका..

सकाळ वृत्तसेवा

गुहागर (रत्नागिरी) : नोव्हेंबर २०१७ मध्ये अकृषिक जमिनीच्या सुधारित दरांची अधिसूचना प्रसिद्ध झाली. या अधिसूचनेत नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतीत पूर्वलक्षी प्रभावाने दर लागू करण्याचे नमूद होते. मात्र, नगरपंचायतीमधील नागरिकांनी पूर्वीच्या व्यवस्थेप्रमाणे दस्त भरला असल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. 

गुहागर नगरपंचायतीची स्थापना १३ एप्रिल २०१२ ला झाली. तेव्हापासून मार्च २०१९ या आर्थिक वर्षापर्यंत महसूल विभाग निवासी अकृषिक एक गुंठा जमिनीसाठी ८० रुपये दस्त वसूल करत होता. हा दर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी असल्याने त्यामध्ये जिल्हा परिषदेचा सात टक्के व पंचायत समितीचा एक टक्का सेस समाविष्ट होता. नोव्हेंबर २०१७ मध्ये आलेल्या अधिसूचनेत नागरी क्षेत्रातील अकृषिक जमिनीच्या सुधारित दर प्रसिद्ध झाले.

एक गुंठा जमिनीसाठी ४० रुपये दस्त

त्याप्रमाणे गुहागर नगरपंचायतीमधील निवासी अकृषिक एक गुंठा जमिनीसाठी ४० रुपये दस्त होतो. पूर्वलक्षी प्रभावाने या अधिसूचनेचे क्रियान्वयन केले तर एक गुंठा निवासी अकृषिक नागरिकाला ४० रुपयांनी गुणले तर सहा वर्षे म्हणजे २४० रुपये दस्त भरावा लागणार आहे. मात्र, वास्तवात या गुहागरमधील नागरिकांनी २०१२-१३, १३-१४, १४-१५, १५-१६, १६-१७, १७-१८ या सहा वर्षांचा ८० रुपयांप्रमाणे ४८० रुपये इतका दस्त दिला आहे. म्हणजेच २४० रुपये अधिकचे भरले आहेत. तरीही पुन्हा सहा वर्षांचा अधिकचा दस्त का भरायचा, 
असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. हा प्रश्न केवळ गुहागर नगरपंचायतीपुरता मर्यादित नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, देवरूख, लांजा या नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतीमधील नागरिकांनाही हा प्रश्न भेडसावू शकतो. 


नागरिकांच्या प्रश्नाला वाचा फोडणार

गुहागर तालुका पत्रकार संघाने या विषयात लक्ष घातले आहे. आम्ही तहसीलदारांजवळ याबाबत चर्चा करणार आहोत. तेथे न्याय न मिळाल्यास गुहागर तालुका पत्रकार संघ यासंदर्भात प्रांत, जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून नागरिकांच्या प्रश्नाला वाचा फोडेल.

-मयुरेश पाटणकर, अध्यक्ष, गुहागर तालुका पत्रकार संघ

हेही वाचा-  कोल्हापूरातील या 4 मार्गाना मिळाला जिल्हाचा दर्जा...

दस्त न भरण्याचा निर्णय

आम्ही मुळातच जास्तीचा दस्त भरला असल्याने शासनाने तो आमच्या खात्यावर अनामत म्हणून जमा केला पाहिजे. याउलट दरवर्षी अधिक दस्त भरूनही सहा वर्षांचा दस्त शासन आमच्याकडून वसूल करते, हे चुकीचे आहे. त्यामुळे आम्ही दस्तच न भरण्याचा निर्णय घेतला आहे. 
-अतुल फडके, गुहागर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: '...तर उद्धव येतोच कसा आडवा?', भोंग्यांवरून राज ठाकरेंनी सुनावलं, नेमकं काय म्हणाले?

Biotech IPO : 'ही' बायोटेक कंपनी आणणार 600 कोटीचा आयपीओ,अधिक जाणून घेऊयात...

Fact Check : इस्लामिक झेंडे फडकवत निघालेली बाईक रॅली अकोल्यातील काॅंग्रेस उमेदवाराच्या प्रचाराची नाही, व्हायरल दावा खोटा

'मुश्रीफ खूप प्रामाणिक नेता, त्यांना कोणतेही लेबल लावू नका'; शरद पवारांना उद्देशून काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?

Aditya Thackeray : महाविकास आघाडी जिंकली नाही तर गुजरात जिंकेल; आदित्य ठाकरेंचा घणाघात

SCROLL FOR NEXT