Russia Ukraine War difficult for Indian students to return home Sakal
कोकण

पाच दिवस भीतीच्या छायेखाली तळघरात

दिवसभर स्फोटांचे प्रचंड आवाज; सावंतवाडीतील विद्यार्थी अडकले युक्रेनमध्ये

रूपेश हिराप

सावंतवाडी : रशिया-युक्रेन युद्धात युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करीत असतानाच युक्रेनच्या खाकिंव्ह शहरातील ७० ते ७५ भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परतणे अवघड बनले आहे. रशियाच्या सीमेवरच असलेल्या या शहरावर मोठ्या प्रमाणात बॉम्ब हल्ले सुरू असल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. सावंतवाडीतील नेत्रन जायबा धुरी या विद्यार्थ्याशी ‘सकाळ’ने संपर्क साधला असता, गेले पाच दिवस आम्ही तळघरात राहत असून, स्फोटांचा प्रचंड आवाज दिवसभर कानात पडत आहे. आम्ही सर्व भीतीच्या छायेखाली असल्याचे त्याने सांगितले.

युक्रेन देश सोडून लगतच्या पोलंड देशात जायचे झाल्यास तब्बल अकराशे किलोमीटरचा प्रवास करावा लागणार आहे. त्यात हल्ले सुरू असताना धोका पत्कारायचा कसा, असा प्रश्न आमच्यासमोर आहे. त्यामुळे भारत सरकारने आमच्या बाबतीत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी नेत्रनच्या पालकांसह त्याच्या सोबत असलेल्या इतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे. युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्याची सर्वाधिक झळ खाकिंव्ह शहराला बसली आहे. खाकिव्ह येथे सावंतवाडी येथील नेत्रन हा ‘खाकिंव्ह झू वेटनरी युनिव्हर्सिटी’मध्ये पशुवैद्यकीय शिक्षणाच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. तो ८ डिसेंबरला सावंतवाडीतून युक्रेनला गेला होता. महाविद्यालयीन प्रवेशाबाबत त्याचे तिथे काम होते. ते झाल्यानंतर तो पुन्हा भारतात येणार होता; पण तत्पूर्वीच रशियाने युक्रेनवर हल्ला केला आणि जाण्या-येण्याचे सर्वच मार्ग बंद झाले. त्यामुळे तो तेथेच अडकून पडला.

नेत्रनशी साधलेल्या संपर्कातून त्याने तेथील वस्तुस्थिती सांगितली. तो म्हणाला, ‘‘युक्रेनमधील खाकिव्ह हे शहर रशियाच्या सीमेलगत असल्याने रशियन सैनिकांनी सर्वाधिक हल्ले खाकिंव्हवरच केले आहेत. आजही हल्ले सुरूच आहेत. त्यामुळे येथील सर्व यंत्रणा ठप्प झाली असून, एटीएम सेवा, बॅंक व्यवहारही बंद आहेत.

येथील पोलिसांकडून आम्हाला मी रहात असलेल्या हॉस्टेलनजीक असलेल्या एका मेसच्या तळघरात आसरा दिला आहे. असे असले तरी सततचे बॉम्ब हल्ले, मोठमोठे आवाज आणि सर्वत्र पसरलेले धुराचे लोट यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. मेसचे जेवण आणि आणि इतर व्यवस्था तळघरातच करण्यात आली आहे. रात्र होताच लाईट बंद करून काळोखात राहावे लागते. बाहेर पडणे कठिण झाले आहे. माझ्यासोबत भारतातील सत्तर ते पंचाहत्तर विद्यार्थी आहेत. आम्ही सुरक्षित असलो तरी भारत सरकारने लवकरात लवकर आम्हाला येथून घेऊन जाण्याबाबत निर्णय घ्यावा.’’

आणखी दोघे युक्रेनमध्ये अडकले

नेत्रनप्रमाणेच सावंतवाडीतील सोमेश टक्केकर व शुभम घावरे हे दोन जण युक्रेनच्या वेगवेगळ्या शहरांत अडकून पडले होते. यातील सोमेश हा सावंतवाडीत परतला, तर शुभम हा रोमानियात पोचला. तेथून तो विमानाने उद्या भारतात येण्याची शक्यता आहे; परंतु नेत्रनचे भारतात परतण्याचे सर्वच दरवाजे बंद झाल्याने चिंतेचे वातावरण आहे.

नेत्रन याच्याशी संपर्क साधणेही आता कठीण झाले आहे. मेसमध्ये आल्यावर वायफायवर त्याच्याशी बोलणे होते. आज सकाळी तो आणि त्याच्यासोबतचे काही मित्र खाकिंव्ह रेल्वेस्थानकावर पायी निघाले आहेत. रेल्वेने ते लिव्ह या शहरात जाणार असून, तेथून पोलंड, रोमानिया, हंगेरी आदी देशांत जाणे सोपे होईल. भारत सरकारने यासाठी प्रयत्न करावेत. तेथील घडणाऱ्या घटना पाहून जीव टांगणीला लागला आहे.’’

- सुमेधा धुरी, पालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: आदित्य ठाकरे आघाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT