Sand Mafia
Sand Mafia esakal
कोकण

महिला उपजिल्हाधिकाऱ्यावर रत्नागिरीत वाळू माफियांचा हल्ला; कराटे चॅम्पियन असलेल्या महिलेचा किक मारत धाडसाने प्रतिकार

सकाळ डिजिटल टीम

रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी (Women Deputy Collector) हर्षलता धनराज गेडाम (वय ४९, रा. रेमंड रेस्टहाऊस, मुरुगवाडा) यांनी याबाबत तक्रार दिली आहे.

रत्नागिरी : मॉर्निंग वॉकला गेलेल्या रोजगार हमी योजनेच्या (Rojgar Hami Yojana) उपजिल्हाधिकाऱ्यांवर वाळू माफियांनी हल्ला केला. कराटे चॅम्पियन (Karate Champion) असलेल्या महिला अधिकाऱ्यांनी किक मारत दोन्ही हल्लेखोरांना आडवे करत हल्ला परतवून लावला. त्यांच्या या धाडसाने वाळू माफियादेखील अवाक्‌ झाले. तेथे मोठ्या प्रमाणात वाळूमाफियांचे समर्थक गोळा होऊ लागल्याने त्यांना गुंगारा देत जीव वाचवला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात संशयित दोघा वाळूमाफियांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी (Women Deputy Collector) हर्षलता धनराज गेडाम (वय ४९, रा. रेमंड रेस्टहाऊस, मुरुगवाडा) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी : श्रीमती हर्षलता गेडाम शहरातील मुरुगवाडा पांढरासमुद्र येथे सकाळी सव्वासात वाजता वॉकला गेल्या. तेथे फिरत असताना पांढरा समुद्र बीच व परिसराचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करत होत्या. तेव्हा पांढरासमुद्र येथील वाळू भरून २ पांढऱ्या रंगाची वाहने जाताना दिसली व लाल रंगाचा ट्रक उभा होता.

गेडाम या त्यांच्या वाहनांचे चित्रीकरण करत असल्याचा संशय आल्याने एका संशयिताने गेडाम यांना विचारले की, तुम्ही आमच्या वाहनांचे चित्रीकरण केले आहे का, गेडाम यांनी नाही असे सांगितले. त्यानंतर गेडाम या विश्रामगृहाकडे जात असताना त्यांच्या मागून आणखी एक वाहन वाळू भरून आले. त्यावरील २ अनोळखी व्यक्तींनी गेडाम यांना तुम्ही आमच्या वाहनांचे फोटो व चित्रीकरण केले आहे. तुमचा मोबाईल आमच्याकडे द्या, असे म्हणाले.

गेडाम या त्यांच्या वाहनांचे चित्रीकरण करत असल्याचा संशय आल्याने एका संशयिताने गेडाम यांना विचारले की, तुम्ही आमच्या वाहनांचे चित्रीकरण केले आहे का, गेडाम यांनी नाही असे सांगितले. त्यानंतर गेडाम या विश्रामगृहाकडे जात असताना त्यांच्या मागून आणखी एक वाहन वाळू भरून आले. त्यावरील २ अनोळखी व्यक्तींनी गेडाम यांना तुम्ही आमच्या वाहनांचे फोटो व चित्रीकरण केले आहे. तुमचा मोबाईल आमच्याकडे द्या, असे म्हणाले.

एक जण गेडाम यांच्याकडे सरसावला असता गेडाम यांनी त्याच्या चेहऱ्यावर उजव्या पायाने कराटे किक मारली. दुसरी व्यक्ती फावड्याने मारण्यासाठी अंगावर धावून आला. तेव्हा गेडाम यांनी स्वतःचा बचाव करत त्याला कराटे किक मारली. त्यांनी दोन अनोळखींनी आपल्यावर प्राणघातक हल्ला केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून दोन संशयितांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती गेडाम यांनी दिली.

यंत्रणेची डोळेझाक

या घटनेमुळे पोलिस, महसूल यंत्रणेची वाळूमाफियांकडे डोळेझाक झाल्याचे अधोरेखित होत आहे. शहरातच सुरू असलेल्या या वाळू चोरीला यंत्रणा लगाम घालू शकलेली नाही. यंत्रणा दुर्लक्ष करीत असल्यामुळे वाळूमाफियांना कायद्याचा धाक उरलेला नाही. त्यामुळे असे भ्याड हल्ले होत आहेत. भविष्यात हे आणखी धोकादायक होऊ शकते. त्यामुळे शासकीय यंत्रणांनी डोळ्यांवरची पट्टी काढण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

रोजगार हमी योजनेच्या महिला उपजिल्हाधिकाऱ्यांवर दोघांनी प्राणघातक हल्ला केल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. पोलिस याबाबत संबंधितांवर कारवाई करतील.

-राजाराम म्हात्रे, तहसीलदार, रत्नागिरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jammu Kashmir Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील हल्ल्यात अकोल्याचा जवान शहीद; गावावर शोककळा, चार दहशतवाद्यांचा खात्मा

Pangong Lake: पूर्व लडाखमधील पँगॉन्ग तलावाजवळ चीन काय खोदत आहे? सॅटेलाइट फोटोंमधून धक्कादायक खुलासे

बीडला बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलीस उपनिरीक्षकांच्या गाडीला कारने उडवले; पोलीस जागीच ठार, एकजण गंभीर जखमी

Maharashtra Live News Updates : वरळी हिट अँड रन प्रकरणाची माहिती घेण्यासाठी अदित्य ठाकरे पोलीस स्टेशनमध्ये

INDW vs SAW: भारताच्या महिलांसमोर मालिका वाचवण्याचे आव्हान; दुसऱ्या T20 मध्ये आज दक्षिण आफ्रिकेशी लढत

SCROLL FOR NEXT