वेंगुर्ले - तालुक्यातील शिरोडा समोरील भागात एलईडीद्वारे पर्सनेटच्या वापरातून मासेमारी करणारा ट्रॉलर्स मत्स्य विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडला. ही कारवाई आज पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. ट्रॉलर्सवर तांडेल व खलाशी असे एकूण २९ कामगार असून पकडण्यात आलेल्या मासळीचा लिलाव 2 लाख 83 हजार रुपये एवढा झाला आहे.
याप्रकरणी उद्या (ता.१३) ही बोट प्रथम देवगड बंदरात हलविण्यात येईल आणि त्यानंतर मालवण येथील सहाय्यक मस्य आयुक्तांकडे कारवाईसाठी हे प्रकरण सादर करण्यात येणार असल्याची माहिती वेंगुर्लेचे परवाना अधिकारी चिन्मय जोशी यांनी दिली. वेंगुर्ले तालुक्यातील समुद्रात मोठ्या प्रमाणात एलईडी लाईटव्दारे पर्सनेट नौका मासमारी करत असल्याच्या मच्छिमारांच्या तक्रारीनुसार शासनाच्या शितल या गस्ती नौकेव्दारे वेंगुर्लेचे मत्स्यखात्याचे परवाना अधिकारी जोशी यांनी मालवणचे अंमलबाजावणी अधिकारी विकास अधिकारी विजय देवकर, सागरी सुरक्षा रक्षक राजेश कुबल, हर्षद टाक्कर (दोन्ही वेंगुर्ले), शुभंम राऊळ, दिवाकर जुवाटकर (दोन्ही मालवण) तसेच शितल गस्ती नौकेचे तांडेल संजय चिंदरकर व श्री. पाटील, कर्मचारी श्री. पडवळ, श्री. पेडणेकर व राजपुत या पथकासमवेत शनिवारी (ता.११) रात्रीपासून वेंगुर्लेच्या समुद्रात शितल गस्ती नौकेव्दारे गस्त सुरू केली.
पहाटे 4.30 वाजण्याचा सुमारांस गोवा राज्यातील ट्रॉलर्स (क्रमांक सी-लॉर्ड-आय.एन.डी जी.ए.-01-एम.एम.- 962) हा एल.ई.टी. लाईटच्या वापरातून पर्सनेटव्दारे मासेमारी करत असताना रंगेहाथ सापडला. या ट्रॉलर्सला वेंगुर्लेत बंदरात आणण्यात आले. त्यावर खडकातील सापडलेली कोकर, तुमरस, कळवी यांसह विविध प्रकारच्या मासळीचा लिलाव करण्यांत आला. या लिलावाची किंमत 2 लाख 83 हजार रुपये एवढी झाली आहे. या प्रकरणी उद्या मालवण येथील सहाय्यक मत्स्यआयुक्त यांच्या कोर्टात हे प्रकरण महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमच्या सुधारित 23 नोव्हेंबर 2021 नुसार करण्यांत आलेल्या मासेमारी कायद्यानुसार सादर करण्यांत येणार असल्याची माहिती वेंगुर्लेचे अंमलबजावणी अधिकारी जोशी यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.