पुणे पिंपरी चिंचवड येथील चौघेजण पर्यटनाकरिता गोव्याला आले होते. या चौघांमध्ये लोरे येथील पेडणेकर यांचाही त्या चौघांमध्ये समावेश होता.
वैभववाडी : लोरे येथील शिवगंगा नदीपात्रात बुडालेल्या भुषण नाईक या तरूणाचा मृतदेह एका नदीतील शेरणीच्या झाडात अडकलेल्या आढळुन आला. (konkan update) आज (३१) दुपारी दीड वाजता आपत्ती पथक आणि स्थानिक ग्रामस्थांच्या निर्दशनास आले. गेले चार दिवस प्रशासन आणि स्थानिक नदीपात्रात त्याचा शोध घेत होते. (crime case)
पुणे पिंपरी चिंचवड येथील चौघेजण पर्यटनाकरिता (goa tourism) गोव्याला आले होते. या चौघांमध्ये लोरे येथील पेडणेकर यांचाही त्या चौघांमध्ये समावेश होता. गोव्यातुन लोरे आल्यानंतर सायकांळी ५ वाजण्याच्या सुमारास चौघेही शिवगंगा नदीच्या (shivganga river) पात्रातील कोळदा कोंडीत पोहण्यासाठी गेले होते. यावेळी भुषण नाईक हा डोहात बुडाला. वाहुन जाताना त्याला सहकाऱ्यांनी पाहिले होते. परंतु त्यांना पोहता येत नसल्याने वाचवु शकले नाहीत. मागील चार दिवस आपत्ती व्यवस्थापनाची पथके भुषणचा शोध घेत होती. (police action)
सुरूवातीला सह्याद्री जीवरक्षक पथकाने शोध घेतला. त्यांना यश न आल्याने स्कुबा पथकाला पाचारण करण्यात आले. त्यांनाही शोध घेण्यात अपयश आल्याने आपत्ती विभागाने बोटीसह पथक बोलविले. हे पथक काल सायकांळी ४ वाजता शिवगंगा नदीवर पोहोचले. सुमारे अडीच तास त्यांनी शोध घेतला. काळोख झाल्याने शोध मोहीम थांबविण्यात आली. दरम्यान आज सकाळपासुन पथक आणि स्थानिकांनी पुन्हा शोध मोहीम सुरू केली.
यावेळी पाण्यातुन जात असताना लोरे आणि गडमठ हद्दीच्या सीमेवर पथकातील काहीना कुजलेला वास आला. संथ पाण्यात बोट थांबवुन ही बाब स्थानिकांना सांगितली. त्यानंतर सरपंच विलास नावळे, अनिल नराम, पोलिस पाटील सहदेव मोहीते, यांच्यासह मालवण आपत्ती पथकाचे वैभव खोबरेकर, चैतन्य मुळेकर, देवेंद्र मराळ, सचिन गोवेकर, दिपक ढोलम हे जिथे कुजकट वास येत होता तेथे पोहोचले. एका शेरणीच्या झाडात काहीतरी अडकलेले दिसुन आले. जवळ जाऊन पाहिल्यावर तो भुषणचा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. मृतदेह पाण्यातुन बाहेर काढण्याची प्रकिया सध्या सुरू आहे. परंतु गेल्या चार दिवसांपासुन सुरू असलेल्या शोध मोहीमेला यश आल्याने प्रशासनाने सुटकेचा श्वास टाकला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.