कोकण

शिवसेना-भाजपमधील संघर्ष विकोपाला! आरोप प्रत्यारोप गंभीर वळणावर

सकाळ वृत्तसेवा

दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना परत पाठवले; पण सायंकाळी दोन्ही पक्षाच्या अठरा पदाधिकारी कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल केले.

दोडामार्ग (सिंधुदुर्ग): विरोधी पक्षातील भाजपच्या स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या स्थानिक आमदार, पालकमंत्री आणि खासदार यांच्यावर टीका होत असल्याने तालुक्यात सातत्याने संघर्ष उफाळून येत आहे.

येथील गांधी चौकात रविवारी (ता.१८) दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. ती त्याच संघर्षाची परिणीती म्हणावी लागेल. अर्थात पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने कालचा राडा टळला असला तरी भविष्यातील संघर्षाची ती नांदी समजायला हरकत नाही.

गेले अनेक महिने तालुक्यातील जनता आणि भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते बांदा दोडामार्ग आणि दोडामार्ग तिलारी वीजघर या रस्त्यावरून शिवसेनेचे माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर, पालकमंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत.

सोशल मिडियावर त्यांच्याकडून होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर देतादेता संघर्ष वाढला आणि रविवारी सकाळी अकरा वाजता येथील चौकात आमने सामने येण्याची घोषणा झाली. दोन्हीकडून कार्यकर्ते, पदाधिकारी जमा झाले. आठवडा बाजार असल्याने बघ्यांची गर्दी झाली आणि मोठा जमावच जणू भिडणार अशी स्थिती झाली. पोलिस निरीक्षक रिझवाना नदाफ यांनी पूर्वकल्पना असल्याने हस्तक्षेप केला. दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना परत पाठवले; पण सायंकाळी दोन्ही पक्षाच्या अठरा पदाधिकारी कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल केले.

केसरकर पालकमंत्री तथा वित्त व गृहराज्यमंत्री असताना त्यांनी बांदा दोडामार्ग पर्ये रस्त्यासाठी निधी मंजूर केला. बांधकामने चार वेळा निविदा काढल्या; पण कुणीच निविदा न भरल्याने काम होऊ शकले नाही. मधल्या काळात रस्त्याची तात्पुरती दुरुस्तीही झाली. रस्त्याची कामे सुरु न होण्यास अधिकारी जबाबदार असल्याचा खुलासा केसरकर यांनी केला आणि विरोधी पक्षात असलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आरोपांच्या फैरी झाडण्याची संधी चालून आली. जिल्ह्यात विरोधी पक्ष म्हणून भाजप प्रबळ होतेच; पण खासदार नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रीपद मिळाल्याने पदाधिकारी कार्यकर्ते यांची ताकद वाढली. साहजिकच ते आणखी आक्रमक झाले आहेत.

खर तर गेल्या अनेक वर्षात आमदार केसरकर यांनी तालुक्यात अनेक विकासकामे केली आहेत. कोट्यवधीचा निधी त्यांनी तालुक्याला आणि नगरपंचायतीलाही दिला. मोर्ले ते पारगड, तेरवण ते तेरवण मेढे, मांगेली ते सडा (कर्नाटक), तळकट ते कुंभवडे, उसप-खोक्रल, तळेखोल उसप, वझरे-माटणे, पाळये-सोनावल असे कित्येक रस्ते आणि तिलारी घाट बांधकामकडे वर्ग करुन रस्त्याचे मजबुतीकरण करणे, विंधन विहिरी, सर्व शाळांना संगणक ही कामे श्री. केसरकर यांच्यामुळेच होत असल्याचे त्यांचे समर्थक सांगतात. अर्थात आमदार, खासदार, पालकमंत्री यांच्यावर टीका करणाऱ्यांना त्याबाबत माहिती नाही असे नाही; पण ते उघडपणे ते मान्य करणार नाहीत हेही तेवढेच खरे. दुसरीकडे शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी त्यांचे आमदार, खासदार, पालकमंत्री यांनी केलेल्या कामाची प्रसिद्धी करण्यात कमी पडले आहेत.

आमदार केसरकर यांच्यावर म्हणूनच तर आम्ही केलेल्या कामाचे श्रेय तुम्ही घ्या, ते घेतलात तर आम्ही सगळ्या निवडणुका जिंकू असे म्हणण्याची वेळ आली आहे. विरोधी पक्ष टीका करण्याची प्रत्येक संधी घेणार, ते त्यांचे कामच आहे. त्याला झालेल्या कामांची व्यापक प्रसिद्धी देवून शिवसेनेने प्रत्युत्तर द्यायला हवे. हमरीतुमरीवर येणे हे उत्तर नव्हे.

आम्ही जी टीका केली ती समाजाचे हित लक्षात घेवून केली. ती कुणी वैयक्तिक घेवू नये. आमदार केसरकर यांनी तालुक्यासाठी निधी आणला हेही मान्य आहे; पण त्याचा योग्य विनियोग व्हायला हवा ती जबाबदारी पण त्यांची होती. त्यांनी त्याचे खापर अधिकाऱ्यांवर फोडणे योग्य नाही. सामाजिक हित लक्षात घेवून पालकमंत्री, खासदार, आमदार यांनी रखडलेले रस्ते आणि आडाळी एमआयडीसी प्रकल्प पूर्ण करावे.

- एकनाथ नाडकर्णी, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष

आमदार दीपक केसरकर यांच्या काळात तालुक्यात कोट्यवधीची कामे झालीत. साठ वर्षात ज्या पायाभूत सुविधा तालुक्यात निर्माण झाल्या नव्हत्या, त्या आमदार केसरकर यांनी निर्माण केल्या; पण जी कामे झालीत त्याबद्दल बोलायचे नाही आणि न झालेल्या कामाबाबत घरात बसून टीका टिप्पणी करायची. आम्ही आणलेल्या कामाचे ठेके पण आपणच घ्यायचे असा एक कलमी कार्यक्रम विरोधकांचा सुरु आहे. शिवसेना आणि आमचे आमदार, खासदार पालकमंत्री जनतेसाठीच काम करतात. ते लोकांनाही माहीत आहे.``

- बाबूराव धुरी, तालुकाप्रमुख, शिवसेना-दोडामार्ग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंचा फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: दक्षिण कराडमध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT