Shiv Sena Krishna Dighe was stabbed with scissors and beaten pali raigad sakal
कोकण

रायगड : शिवसेना विभाग प्रमुख कृष्णा दिघे यांना कैचीने भोसकून हाताबुक्यांने मारहाण

जागे संदर्भात दिघे व फाळे यांच्यात वाद

अमित गवळे : सकाळ वृत्तसेवा

पाली : सुधागड तालुक्यातील वावळोली येथे मंगळवारी (ता.14) सायंकाळी पालीतील ओसवाल प्लाझात राहणारे शिवसेना विभाग प्रमुख कृष्णा दिघे (वय 50) यांना वावळोली येथील फाळे पितापुत्राने हाताबुक्क्याने मारहाण करून पुत्राने कैचीने भोसकून जखमी केले आहे. याबाबत पोलीस प्राथमिक माहिती अहवालातून (एफआरआय) मिळालेली सविस्तर माहिती अशी की कृष्णा दिघे यांच्या वावळोली येथील जागेला लागून संजय फाळे यांची जागा आहे. या जागे संदर्भात दिघे व फाळे यांच्यात वाद सुरू आहेत. या जागेत संजय फाळे टपरी बांधण्याचे काम करत होते. यावेळी दिघे यांनी त्यांना या वादग्रस्त जागेत बांधकाम का करतो अशी विचारणा केली.

याचा राग येऊन संजय फाळे यांनी कृष्णा दिघे यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. त्याचवेळी फाळे यांच्या मुलाने कृष्णा दिघे यांच्या पाठीत कैची भोसकुन त्यांना पाईपवर ढकलले आणि दोघांनी दिघे यांना हाताबुक्क्याने मारहाण केली. जखमी कृष्णा दिघे त्यांच्या तावडीतून सुटून मोटारसायकलने पाली पोलीस स्थानकात तक्रात देण्यासाठी आले. तेथून त्यांना उपचारासाठी पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले.

तेथून अलिबाग येथे जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. फूफुसाला इजा व अंतर्गत रक्तस्त्राव झाला असल्याने दिघे यांना तेथून कोपरखैरणे येथे खाजगी रुग्णालयात नेण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्री. चव्हाण करत आहेत. मुख्य आरोपीला अजूनही अटक झाली नसल्याने दिघे कुटुंबियांना धोका आहे असे दिघे कुटुंबियांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Voilance : मुख्यमंत्री बिरेनसिंह यांचे पेटविले घर; मैतेई गटाकडून २४ तासांचा अल्टिमेटम

Kantara Chapter 1: तारीख ठरली! 'या' दिवशी जगभरात प्रदर्शित होणार 'कांतारा चॅप्टर १'; उरले किती दिवस?

Latest Maharashtra News Updates : पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी

Sharad Pawar यांच्यावर टीका का करत नाही? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'मी विचलित...'

Sovereign Gold Bond: सरकारी योजनेत गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट

SCROLL FOR NEXT