Shiv sena Leader Anand Gite Advised to Activist stay with shiv sena party chiplun  sakal
कोकण

चिपळूण : अनंत गीते अॅक्शन मोडमध्ये

माझ्या मतदार संघात शिवसेनेसाठी वातावरण चांगले आहे. जे बंडखोरी करतील त्यांना कार्यकर्ते त्यांची जागा दाखवतील.

मुझफ्फर खाना

चिपळूण : शिवसेना नेते अनंत गीते शिवसेनेच्या अडचणीच्या काळात पक्षासाठी धाऊन आले आहेत. शनिवारी सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीला न जाता गीते लोटे (ता. खेड) येथे आले. उत्तर रत्नागिरी भागातील कार्यकर्त्यांची बैठक घेतली. कार्यकर्त्यांची मते आजमावून घेत त्यांना पक्षाबरोबरच राहण्याचा सल्ला दिला. गीते अॅकशन मोडवर आल्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही आनंद आहे. अनंत गीते यांचा मागील लोकसभा निवडणुकीत रायगड लोकसभा मतदार संघात पराभव झाला. राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंकडून पराभव पत्करल्यानंतर गीते हे सक्रिय राजकारणापासून दूर होते . त्यातच त्यांचा मुंबईतील शिवसेना भवन आणि पक्षप्रमुख उध्दव ठाकरेचे निवासस्थान असलेल्या ' मातोश्री शीदेखील संपर्क तुटलेला होता.

मध्यंतरी श्रीवर्धन येथील मेळाव्यात त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केल्याने त्यांना सभा, मेळावे बैठकांपासून ते अगदी नुकत्याच राबवण्यात आलेल्या शिवसंपर्क अभियानातही दूर ठेवण्यात आले होते. त्यांनी रायगड, रत्नागिरी येथील राजकीय कार्यक्रम टाळले होते. ते सामाजिक संस्थांच्या कार्यक्रमाला आले तरी राजकीय विषय टाळून बोलत होतो. कोकणातून जे काही शिवसेना नेते आहेत त्यामध्ये गीते हे ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जातात. रत्नागिरी आणि रायगड अशा दोन्ही मतदार संघातून तब्बल सहावेळा लोकसभेला निवडून गेलेले आहेत. मात्र मागील लोकसभा निवडणूकीत पराभूत झाल्यानंतर ते काहीसे अलिप्त राहिले. दरम्यान, सध्या शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकवल्यानंतर शिवसेनेत मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. शिवसेनेकडून डॅमेज कंट्रोलची मोहीम हाती घेण्यात आली आहे.मुंबईत यासंदर्भात गेले पाच दिवस बैठकांचे सत्र सुरू असतानाही गीते मात्र यापासून दूर होते त्यांच्या मतदार संघातील महाडचे आमदार भरत गोगावले.

अलिबागचे आमदार महेंद्र दळवी व कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे, खेडचे योगेश कदम हे बंडखोर गटात सहभागी झाले आहेत. गीते शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीचे सदस्य आहेत. परंतू शनिवारच्या बैठकीकडे पाठ फिरवत त्यांनी रायगड लोकसभा मतदार संघात बैठकांचा सपाटा लावला. रत्नागिरी जिल्हयातील दापोली, खेड आणि मंडणगड तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक त्यांनी लोटे येथे घेतली. गीते अचानक सक्रीय झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे भरते आहे. पक्षातील प्रतिस्पर्धींनी बंडखोरी केल्यामुळे आता पुढचे मैदान आपल्यासाठी मोकळे आहे. हे गीतेंच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी बैठका सुरू केल्या आहेत. गीते सक्रीय झाल्यामुळे रायगडबरोबरच रत्नागिरी जिल्ड्यातही शिवसेनेंतर्गत राजकारण पुन्हा ढवळणार आहे त्यातच बंडखोर आमदार भविष्यात कोणत्याही पक्षाकडून उभे राहिल्यास त्यांना निवडणुकीत जागा दाखवणार असा इशाराही दिल्याने वातावरण अधिक तापणार आहे.

मी रायगड लोकसभा मतदार संघात शिवसेनेच्या समर्थनासाठी बैठका घेतल्या. त्यांची मते जाणून घेतली. कार्यकर्ते आणि मतदार पक्षाबरोबर आहेत. माझ्या मतदार संघात शिवसेनेसाठी वातावरण चांगले आहे. जे बंडखोरी करतील त्यांना कार्यकर्ते त्यांची जागा दाखवतील.

- अनंत गीते माजी खासदार तथा शिवसेना नेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: दहिसर मतदान केंद्रात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT