अनंत गीते  sakal
कोकण

राजकारणात पुन्हा सक्रिय होणार; कुणबी मेळाव्यात गीतेंची मोठी घोषणा

मुझफ्फर खान

चिपळूण: शिवसेना नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी पुन्हा राजकारणात सक्रिय होण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. मी सध्या खासदार नाही . मात्र , असे असले तरी मी राजकारणाला विराम दिलेला नसल्याचे ते म्हणाले.

गीते कुणबी हितवर्धिनी सेवा संघ , दापोलीच्या मुंबईतील शिवसेना भवन दादर येथे झालेल्या मेळाव्यात बोलत होते. आपण स्वतः कुणबी हितवर्धीनीचे सभासद झालो असल्याचे सांगत त्यांनी जास्तीत जास्त सभासद नोंदणी करण्याची संस्थाचालकांना सूचना व आवाहन केले.रायगड लोकसभा मतदासंघात झालेल्या पराभवानंतर काही दिवस शांत असलेले गीते यांनी आपण पुन्हा सक्रिय झाल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. दापोली, खेड, मंडणगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला. कोकणात रत्नागिरी जिल्हयात दापोली येथे कुणबी भवन उभारणीसाठी आपण सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही कुणबी समाजाचे ज्येष्ठ नेते अनंत गिते यांनी दिली आहे.

आमदार योगेश कदम संवाद साधताना म्हटले की , रामदास कदम आणि अनंत गीते यांच्या सहकार्याने कुणबी समाजाच्या स्वाभिमानासाठी दापोलीत कुणबी भवन उभारण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असून, कुणी कितीही आडवे गेले तरी आपण कुणबी भवन उभारूनच दाखवू असा विश्वास त्यांनी उपस्थितांना दिला. या मेळाव्यास संस्थाअध्यक्ष उन्मेश राजे , संस्था सचिव सुनिल पवार, जिल्हा परिषद सदस्य अनंत करबेले , कुणबी समाजोन्नती संघाचे दापोली तालुका प्रतिनिधी आणि दापोली तालूका मुंबई शिवसेनेचे सचिव नरेश घरटकर, कुणबी समाजोन्नती संघ शाखा दापोली मुंबईचे माजी अध्यक्ष आणि दापोली तालूका कुणबी पतपेढीचे माजी अध्यक्ष रमेश काटकर, शिवसेना दापोली तालुका मुंबई संघटक चंद्रकांत शिगवण, तालूका उपसंघटक विजय ठोंबरे, माजी उपसभापती अनंत बांद्रे , उपतालुका प्रमुख गुणाजी गावणुक आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

बॉक्सर इमाने खलीफ पुरूष असल्याचा वैद्यकिय रिपोर्ट समोर येताच Harbhajan Singh ची 'गोल्ड मेडल' परत करण्याची मागणी

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

SCROLL FOR NEXT