कोकण

Shivaji Maharaj Statue: सरकारने महाराष्ट्राची माफी मागावी, मंत्र्यांनी राजीनामा द्यावा ; आमदार बंटी पाटीलांची मागणी

सकाळ वृत्तसेवा

सकाळ वृत्तसेवा

Latest Maharashtra News: राजकोट किल्ला येथील शिवाजी महाराजांचा पुतळा बनविणाऱ्यांना नौदलापर्यंत कोणी पोहोचवले, याचा खुलासा होणे गरजेचे आहे. शासनाने स्वतःचे पाप लपवण्यासाठी दुसऱ्यावर खापर फोडण्याचे काम केले आहे.

या उलट शासनाने झालेली चूक मान्य करणे गरजेचे आहे. या सगळ्याला विद्यमान महायुतीचे शासन जबाबदार असून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. किंबहुना सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, असे मत काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी येथे व्यक्त केले.

राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी आमदार सतेज पाटील यांनी भेट देत पाहणी केली. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, साईनाथ चव्हाण, विकास सावंत, अरविंद मोंडकर, बाळू अंधारी, विभावरी सुकी, विलास गावडे, देवानंद लुडबे, पल्लवी खानोलकर, आफरीन करोल, अक्षता खटावकर, सुंदर वल्ली, ममता तळगावकर, प्राची माणगावकर, अमृता मोंडकर, विजय प्रभू, तरबेज शेख, श्री. जैतापकर, नागेश मोरये, जेम्स फर्नांडिस, बाबा मेंडीस, लक्ष्मीकांत परुळेकर, गणेश पाडगावकर, समीर वंजारी यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, ‘‘महाराष्ट्राच्या दृष्टीने घडलेली ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. ही घटना घडल्यानंतर राज्यभरातून, देशभरातून शिवप्रेमींचा प्रचंड असा संताप उमटला आहे. फादर ऑफ नेव्ही म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखले जाते. पण, आज त्यांच्या पुतळ्याची अवस्था बघितल्यानंतर दुःख प्रचंड आहे, संताप आहे, राग आहे. योग्य ती खबरदारी घेतली गेली नाही हे सर्व प्रक्रिया बघल्यानंतर लक्षात येतं. योग्य ती काळजी न घेतल्यानेच हा पुतळा कोसळला.

फक्त उद्घाटनाची घाई अनुभव नसलेल्या व्यक्तीला हे काम देण्यात आले. अगदी कमी वेळामध्ये हे काम पूर्ण करून उद्घाटन करायचे आहे . फक्त इव्हेंट करायचा आहे. याबाबत छत्रपती शिवाजी महाराजांबाबतही हे सरकार वागते हे दुर्दैव आहे.’’

ते पुढे म्हणाले, ‘‘देशामध्ये आपल्या नौदलाचा एक वेगळा इतिहास आहे. आयएनएस विक्रांतसारख्या बोटी बनवण्याची ख्याती असलेले नौदल आहे. या नौदल विभागावर याचे खापर फोडणे म्हणजे नौदलचा अपमान केल्यासारखे आहे. नौदलाने निविदा काढल्यानंतर त्याला किती लोकांनी प्रतिसाद दिला. त्या व्यक्तीला कोणी नेमलं? कारण नौदल हे यापेक्षाही चांगले काम करू शकते.

पण, त्या व्यक्तीला काम द्या, असे नौदलला कोणी सांगितले, हे या ठिकाणी महत्त्वाचे आहे. कुठल्याही शास्त्रामध्ये न बसणारे नियोजन या पुतळ्याच्या बाबतीत केले गेले. अगदी राम-सुतारांपासून दिग्गज या देशांमध्ये आहेत. ज्यांनी अनेक भव्य दिव्य अशा वास्तू या देशांमध्ये उभ्या केल्या आहेत. अशा व्यक्तिमत्त्वांना का बोलावले गेले नाही, असे अनेक प्रश्न पडले आहेत.’’

पाटील म्हणाले, ‘‘शासनाने स्वतःचे पाप लपवण्यासाठी दुसऱ्यावर खापर फोडण्याचे काम केले आहे. या उलट शासनाने ही चूक झाली आहे की मान्य करणे गरजेचे आहे. कारण नौदलाला एक इतिहास आहे. इतकी वर्ष नौदलाच्या माध्यमातून या देशाचे संरक्षण केले जात आहे. त्यांना बदनाम करण्याचे काम कृपा करून राज्य शासनाने करू नये अशी आमची अपेक्षा आहे. त्या व्यक्तीला कोणी त्यांच्यापर्यंत पोहोचवले याचा खुलासा होणे गरजेचे आहे. या सगळ्याला विद्यमान महायुतीचे शासनच जबाबदार आहे. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे किंबहुना सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचे पाप या राज्यकर्त्यांनी केले आहे.’’

सर्व नियम पाळून पुतळा उभारावा

काँग्रेस म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी पुन्हा उभा राहावा. सर्व नियमांचे पालन करून उभारावा, अशी आमची मागणी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा असेल की हा पूर्णाकृती पुतळा हा महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच व्हावा. त्यामुळे भविष्यकाळातील जबाबदारी महाविकास आघाडी म्हणून आमच्यावर असेल. छत्रपती शिवरायांचा पुतळा समुद्रालाही सामोरा जाईल, अशा पद्धतीचा पुतळा उभारला जाईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Politics : भाजप, काँग्रेस हे पक्ष बिहारचे खरे गुन्हेगार... प्रशांत किशोर यांचा घणाघात; नितीश कुमारांवरही साधला निशाणा

Musheer Khan: गंभीर अपघातानंतर भारतीय क्रिकेटर मुशीर खानने वडिलांसह पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; जाणून घ्या काय म्हणाला

Assembly Elections: ठाकरे गट उमेदवारांची यादी कधी जाहीर करणार? बड्या नेत्याने दिवसच सांगितला! काय म्हणाले?

Latest Maharashtra News Updates: पुतळा उभारण्यातही तुम्ही पैसे खाल्ले आहेत - ठाकरे

नागरिकांना सतर्कतेचे आवाहन! सायबर गुन्हेगारांचे फसवणुकीचे ‘हे’ 10 फंडे; सोशल मीडियावरील बंद असलेले खाते डिलीट करण्याचाही सल्ला

SCROLL FOR NEXT