खरोखरच ही निवडणूक शिवसेना व भाजपची विजयासाठी कसोटी घेणारी ठरणार आहे.
कुडाळ : येथील नगरपंचायत निवडणूक रंगतदार ठरणार आहे. दुपारपर्यंत कोणत्याही पक्षाने उमेदवार जाहीर न केल्यामुळे बंडखोरी होणार काही दिग्गज उमेदवार बऱ्याच वर्षांनी निवडणूकीला सामोरे जात आहेत. महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्ष एकरूप होण्याच्या आशा यावेळी तरी मावळल्या आहेत. शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक काँग्रेसचा झेंडा हाती घेऊन निवडणूक रिंगणात उतरले आहेत. खरोखरच ही निवडणूक शिवसेना व भाजपची विजयासाठी कसोटी घेणारी ठरणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात लक्षवेधी ठरणाऱ्या कुडाळ नगरपंचायतीसाठी उमेदवार शेवटचे दोन दिवस असतानासुद्धा जाहीर केले नाहीत. त्यामुळे अर्ज दाखल करणारे आम्ही निवडणूक रिंगणात आहेत की नाही हे काहीच त्यांना माहिती नाही. तरीसुद्धा काहीजणांनी अंधारात न राहता अर्ज दाखल करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे इच्छुकांची धाकधूक वाढली असून पक्षाला बंडखोरीची किड लागण्याची शक्यता आहे. उमेदवारी भरण्यापूर्वी पक्षांकडून उमेदवार जाहीर होतील व बंडखोरी टाळण्यासाठी कसरत करावी लागणार हे निश्चितच म्हणावे लागेल.
कुडाळ नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आज दुपारपर्यंत एकाही प्रमुख राजकीय पक्षाने अधिकृत उमेदवारांच्या नावाची घोषणा केली नाही. आज शेवटचे उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस असल्याने या दिवशी सर्वच पक्ष आपले उमेदवार जाहीर करतील. कुडाळ नगरपंचायतीसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी युती झाली आहे. काँग्रेस आणि भाजप स्वबळावर लढणार आहेत. सर्वच पक्षांनी निवडणुकीची व्युहरचना आखली आहे.
महाविकास आघाडी होण्यासाठी शिवसेनेकडून काँग्रेसशी मनधरणी केली जात आहे; मात्र अद्याप यश नाही. सर्वच पक्षांनी प्रभागनिहाय प्रबळ उमेदवाराचा शोध घेत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचा सोपस्कार पार पडला आहे. शिवसेना व भाजप या दोन्ही पक्षात इच्छुकांची मोठी भाऊगर्दी झाली आहे. प्रत्येक प्रभागात इच्छुकांची संख्या वाढली आहे. त्या-त्या पक्षातील सर्वच प्रमुख कार्यकर्त्यांनी उमेदवारीची मागणी केल्याने पक्षश्रेष्ठींपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. जवळपास सर्वच पक्षांनी आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी तयार केली आहे.
१ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. उमेदवारी दाखल करण्याकरिता लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव केली जात आहे. नगरपंचायतीच्या १७ जागांपैकी आरक्षित जागेतून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र देणे अनिवार्य आहे. त्यामुळे उमेदवार त्यादृष्टीने जोरदार हालचाली करत आहेत. लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती इच्छुक उमेदवारांना बैठक घेऊन दिली आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत आघाडी करुन निवडणूक लढवत आहेत. भाजपला बाजूला करण्यासाठी कंबर कसली आहे. तर भाजप सातत्य राखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणार आहे. काँग्रेस स्वतंत्रपणे लढत आहे. याचा फायदा भाजप कितपत उठवतो हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
काँग्रेसच्या या पवित्र्यामुळे शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडीत चिंता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीचे सचिव संघटक व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर हे कुडाळ नगरपंचायत रिंगणात उतरले आहेत. श्री. कुडाळकर शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिवसेना राष्ट्रवादीची आघाडी झाली असून १४ जागा शिवसेनेला तर चार जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्या आहेत. माजी सभापती सुनील भोगटेसुद्धा निवडणूक रिंगणात आहेत. श्री. कुडाळकर कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये प्रभाग १२ हिंदू कॉलनी या प्रभागातून राष्ट्रवादी लढत आहेत. त्यांच्या समोर तेवढ्याच ताकदीच्या भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष व विद्यमान नगरसेविका संध्या तेरसे रिंगणात आहेत. कसाल जिल्हा परिषदमधून निवडून आल्यानंतर कुडाळकर जिल्हा परिषद अध्यक्ष झाले होते.
भोगटेंची बंडखोरी धोक्याची घंटा
शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक गणेश भोगटे यांनी बंडाचे निशाण फडकवले आहे. गणेश भोगटे हे प्रभाग १४ कुंभारवाडी मधून काँग्रेसमधून उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. शिवसेनेने त्यांना विश्वासात घेतले नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. ते उमेदवारी अर्ज दाखल करणार हे निश्चित झाले आहे. भोगटे यांची बंडखोरी शिवसेनेसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. त्यांनी आपल्या केळबाई मतदारसंघात काँग्रेसची महिला उमेदवार देत हा शिवसेनेसाठी धक्का दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.