Deepak Kesarkar esakal
कोकण

निवडणुका जवळ आल्या, की मतदारसंघात दिसणारे केसरकर आहेत कुठे? पूरस्थितीवरुन ठाकरे गटाचा सवाल

मंत्री केसरकर यांना कोणतेही सोयरसुतक नाही. केवळ यायचं आणि वेगवेगळ्या घोषणा करायच्या.

सकाळ डिजिटल टीम

आपल्या स्वार्थासाठी लोकांची दिशाभूल करणाऱ्या अशा नेत्याला येणाऱ्या काळात जनता नक्कीच जागा दाखवेल.

सावंतवाडी : निवडणुका जवळ आल्या, की सहा महिने मतदारसंघात दिसणारे मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) आज पूरपरिस्थितीमध्ये मतदारसंघातून ‘वॉन्टेड’ आहेत. त्यामुळे येथील जनतेला वालीच नसल्याने त्यांना प्रशासनावर अवलंबून राहावे लागत आहे, असे स्पष्ट मत रूपेश राऊळ यांनी व्यक्त केले.

मतदारसंघात राहणाऱ्या मतदारांना वेळ देणार, असे सांगणाऱ्या भाषा मंत्र्यांच्या गजाली येणाऱ्या निवडणुकीत जनतेने वेळेत बंद कराव्यात, अशी टीकाही येथे आयोजित पत्रकार परिषदेत ठाकरे शिवसेनेचे (Thackeray Shiv Sena) तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी केली.

आंबोली कबुलायतदार गावकर प्रश्न सुटला, अशी घोषणा केसरकर यांनी केली; मात्र प्रत्यक्षात त्यांचा सत्काराला स्थानिक ग्रामस्थ न आल्याने त्यांनी पुन्हा वनविभागाचा तिढा पुढे करत हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही, असे सांगून थंड दहशत दाखवण्याचा प्रयत्न केला, असे राऊळ म्हणाले.

राऊळ यांनी पत्रकार परिषद घेत मंत्री केसरकरांवर टीका केली. या वेळी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, आबा सावंत, राजू शेटकर, मेघश्याम काजरेकर, शिवदत्त घोकळे, गौरी करमळकर, निशिकांत पडते, मनोहर ठिक्कार आदी उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले, ‘‘मतदारसंघात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत; परंतु या ठिकाणी मंत्री असलेल्या आमदार केसरकर यांना कोणतेही सोयरसुतक नाही. केवळ यायचे आणि वेगवेगळ्या घोषणा करायच्या, एवढेच काम त्यांच्याकडून सुरू आहे. मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडला आहे. त्यामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे. यापूर्वी उन्हाळ्यातही पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला होता.

परंतु, मतदारसंघाकडे केसरकरांचा कानाडोळा आहे. ते केवळ विमानाने गोव्यात उतरतात. सावंतवाडीत येतात. आपण हे करणार ते करणार, मतदारसंघासाठी वेळ देणार, गावोगाव फिरणार असे सांगून लोकांना खोटी आश्वासने देतात आणि पुन्हा मुंबईत जाऊन बसतात; मात्र आता लोकांना त्यांची नस कळली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात येथील जनता त्यांना काही झाले तरी माफ करणार नाही.’’

ते पुढे म्हणाले, ‘‘याठिकाणी आंबोली कबुलायतदार गावकर प्रश्न सुटला, अशी घोषणा केसरकर यांनी केली; मात्र प्रत्यक्षात त्यांचा सत्कार स्थानिक ग्रामस्थांनी केला नसल्यामुळे त्यांनी पुन्हा वनविभागाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही, असे सांगून थंड दहशत दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आपल्या स्वार्थासाठी लोकांची दिशाभूल करणाऱ्या अशा नेत्याला येणाऱ्या काळात जनता नक्कीच जागा दाखवेल.’’

‘त्या’ प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी

कोलगाव येथे झालेल्या खोट्या ‘ॲट्रॉसिटी’ गुन्ह्यासंदर्भात श्री. राऊळ यांनी नाराजी व्यक्त केली. पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल केला असून खोलात जाऊन या प्रकरणाची चौकशी करावी व त्यानंतरच पुढील भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT