एक कार्यक्रम आटोपून आपल्या गाडीकडे परतताना बापूसाहेब महाराज. sakal
कोकण

सिंधुदुर्ग : बापूसाहेबांच्या लोकाभिमुख कारभाराचा प्रारंभ

बापूसाहेब महाराजांनी पहिली दोन वर्षे गावोगाव जावून लोकांशी संवाद साधला.

- शिवप्रसाद देसाई

बापूसाहेबांच्या लोकाभिमुख कारभाराचा प्रारंभ

जवळपास शतकभरापर्यंत ब्रिटिशांकडे असलेला कारभार जनतेचा राजा म्हणून प्रजाजनांच्या आधीच अपेक्षा निर्माण करणाऱ्या बापूसाहेब महाराजांकडे आला होता. यामुळे अपेक्षांचे मोठे ओझे त्यांच्यावर होते. यातच ब्रिटिशांनी राज्याधिकार देताना ‘हा कारभार सुस्थितीत आणि भरभराटीत आपल्या हाती देत आहोत’ असा शेरा मारला होता. यामुळे कारभार आणखी चांगला, लोकाभिमुख करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर होते.

वास्तविक ब्रिटिश काळात संस्थानामध्ये अनेक प्रश्‍न होते. महायुद्धामुळे महागाई भडकली होती. अधुनमधून दुष्काळाचेही सावट असायचे. मलेरीया व इतर आजाराच्या जीवघेण्या साथीचा हल्ला परतवण्यासाठी होणारे प्रयत्न मर्यादीत होते. कारभार हाती घेतल्यानंतर लोकांचे नेमके प्रश्‍न काय आहेत हे समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे होते. यामुळे बापूसाहेब महाराजांनी पहिली दोन वर्षे गावोगाव जावून लोकांशी संवाद साधला. पुढेही हा शिरस्ता कायम ठेवत वर्षातून एकवेळ ते संस्थानचा दौरा काढायचे. या दौऱ्याचा हेतू सत्ता किंवा ऐश्‍वर्याचे प्रदर्शन असा नसायचा. राजांसोबत पोलिस संरक्षणाचा फार्सही नसे. जिथे गाडी जाईल तिथपर्यंत गाडीने, पुढे घोड्यावरून व अगदीच अडचणीची वाट असेल तर ते पायी दौरा करायचे. बरोबर अधिकारी मंडळी असायची. काहीवेळा अधिकारी अडचणीच्या वाटेवर जायला सबबी सांगायचे. अशावेळी महाराज त्यांना तेथेच ठेवून स्थानिकांसोबत एकटेच पुढे जायचे. या दौऱ्यात ते लोकांशी संवाद साधायचे. त्यांच्या अडचणी समजून घेत. त्याबरोबरच त्यांच्या प्रश्‍नांवर उत्तर शोधण्यासाठी कोणत्या योजना आखायच्या हेही ठरवत.

गावात गेल्यानंतर वडीलधाऱ्यांशी आदराने वागण्याचा त्यांचा गुण अनेकांना भूरळ पडायचा. याबाबत एक किस्सा सांगितला जातो. ते असेच एका गावात दौऱ्यावर गेले होते. राजशिष्टाचाराने लोकांनी महाराजांचे आसन उंच ठिकाणी खूर्ची ठेवून सजवले होते. शंभर वर्षांनी प्रथमच त्यांचा राजा गावात येत होता.यामुळे उत्सवाचे वातावरण होते. बाकी सर्व लोक समोर जमिनीवर बसणार होते. यात बरेचजण वयस्क, महाराजांपेक्षा वयाने मोठे होते. महाराजांनी थाट पाहिला आणि विचारले की, ‘तुम्ही सगळेजण खाली बसणार का?’ यावर लोकांनी ‘होय’, असे उत्तर दिले. यावर महाराजांनी ‘आपलीही बैठक खालीच घाला.

आपल्यासारखी वडीलधारी माणसे खाली बसून मी वर बसण्यापेक्षा मला तुमच्यासोबतच बसायला आवडेल.’ राजाज्ञा झाल्यामुळे बैठका मांडल्या गेल्या आणि महाराजांनी खाली बसूनच लोकांशी संवाद साधला. हा किस्सा कुडाळ तालुक्यातील आवळेगाव किंवा पांग्रड परिसरात घडल्याचे सांगितले जाते. वडिलधाऱ्यांचा ते नेहमीच आदर करायचे. याबरोबरच कर्तव्यदक्षतेत ते कधीच कमी पडले नाहीत. याबाबतचा एक किस्सा सांगितला जातो. एकदा काही पाहुणेमंडळींसोबत महाराज शिरोडा येथे समुद्र स्नानासाठी गेले होते. एका नव्या कोऱ्या शेवरलेट गाडीतून महाराज व त्यांचे पाहुणे तर दुसऱ्या गाडीतून संस्थानातील अधिकारी लक्ष्मणराव भोसले-तिरोडकर व इतर अधिकारी शिरोड्यात पोहोचले. गाड्या किनाऱ्यावर उभ्या करून सर्व मंडळी किनाऱ्याकडे गेली. गाडीवर लक्ष ठेवण्याचे काम गाव फौजदारावर सोपवण्यात आले. उशिर होणार असल्याने फौजदार कुठेतरी बाजूला निघुन गेले.

त्या काळात मोटार फार कमी जणांकडे असायची. यामुळे मोटारीबाबत कमालीचे कौतुक आणि उत्कंठा होती. याचभागात काही मुले खेळत होती. फौजदार बाजूला गेला हे बघून ती मुले गाडीजवळ आली. त्यातील एकाने शेवरलेट गाडीवर ओरखडे ओढले. काही वेळाने फौजदार तेथे आला. तेवढ्यातच महाराज व पाहुणे मंडळीही तेथे पोहोचली. महाराजांनी ओरखडे बघीतले. फौजदाराला बोलवून ते दाखवले आणि हे काय तुम्ही कुठे होता? असा प्रश्‍न केला. फौजदार गांगरला. महाराज म्हणाले, ‘माझ्या सारख्याच्या आज्ञेची अवहेलना करून गाडीकडे दुर्लक्ष केले. मग तुम्ही गोरगरिबांचे काय करीत असाल?’ महाराजांच्या या प्रश्‍नांने फौजदार घाबरला. महाराजांनी नोकराकरवी ते ओरखडे पूसून सर्वजण सावंतवाडीकडे निघाले. फौजदार वयस्क होते. गाडी काही अंतरावर गेल्यानंतर त्यांनी ती थांबवली. लक्ष्मणराव भोसले-तिरोडकर यांना बोलावून सांगितले की, फौजदार वयस्क आहेत. त्यांना सांगा की घाबरू नका यापुढे कर्तव्यदक्षतेने वागत जा.’

अनाथांचा नाथ

दौऱ्यादरम्यान एखाद्या गावात अनाथ मुले असली तर ग्रामस्थ त्यांना महाराजांच्या स्वाधीन करत. महाराज या मुलांना वाड्यात आणून त्यांचे पालनपोषण करायचे. त्यांना कामधंदा लावायचे. अगदी त्यांचे लग्नकार्यही स्वतः हजर राहून थाटात लावून देत. अशा लग्नामध्ये नवरीचे अलंकार महाराज स्वतः बनवून घेत.

आदर देणारा राजा

प्रजाजन, सर्वसामान्यांना महाराज कायम आदरच द्यायचे. आपल्यापेक्षा मोठ्यांना ते नेहमी आदराने हाक मारायचे. राजा असूनही माणसे जपण्याचा गुण वाखण्यासारखा होता. याबाबतही एक किस्सा आवर्जुन सांगावासा वाटतो. महायुद्धावरून परतल्यानंतर महाराजांना मार्गदर्शक म्हणून सरदार जयसिंगराव राणे काम करायचे. महाराजांचे राज्यारोहण, विवाह आदी मुख्य समारंभात तयारीमध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. वडीलकीच्या नात्याने ते महाराजांनाही सूचनाही देत. अशावेळी महाराज ‘मी विचार करून ठरवतो’ असे उत्तर द्यायचे. कधीही त्यांचा विरोध करून ते अवमान करायचे नाहीत. एखाद्या व्यक्तीशी एकदा ओळख झाली की, महाराज त्याला कायम चटकन ओळखायचे. यामुळेच संस्थानात होणारे दौरे त्यांना गावोगावचे चित्र ओळखून लोकाभिमुख धोरण ठरवण्यात खूप उपयोगी ठरायचे.

राज्याधिकार मिळाल्यानंतर बापूसाहेब महाराजांनी लोकाभिमुख कारभार हाकण्याच्या दृष्टीने पावले उचलली. यासाठी ते लोकांमध्ये जावून त्यांचे प्रश्‍न समजून घ्यायचे. कारभार हातात घेतल्यानंतर पहिली दोन वर्षे त्यांनी संस्थानातील सर्व गावे फिरून पाहणी केली. लोकांचे प्रश्‍न ऐकून त्यावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने निर्णय घ्यायला सुरूवात केली. नंतरही ते वर्षातून एकदा पूर्ण संस्थानचा दौरा करायचे. लोकांमध्ये जावून त्यांचे मन समजून घेऊन कारभार हाकणारा राजा, अशी ओळख त्यांनी अल्पावधीत तयार केली.प्रजाजन, सर्वसामान्यांना महाराज कायम आदरच द्यायचे. आपल्यापेक्षा मोठ्यांना ते नेहमी आदराने हाक मारायचे. राजा असूनही माणसे जपण्याचा गुण वाखण्यासारखा होता. याबाबतही एक किस्सा आवर्जुन सांगावासा वाटतो. महायुद्धावरून परतल्यानंतर महाराजांना मार्गदर्शक म्हणून सरदार जयसिंगराव राणे काम करायचे. महाराजांचे राज्यारोहण, विवाह आदी मुख्य समारंभात तयारीमध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. वडीलकीच्या नात्याने ते महाराजांनाही सूचनाही देत. अशावेळी महाराज ‘मी विचार करून ठरवतो’ असे उत्तर द्यायचे. कधीही त्यांचा विरोध करून ते अवमान करायचे नाहीत. एखाद्या व्यक्तीशी एकदा ओळख झाली की, महाराज त्याला कायम चटकन ओळखायचे. यामुळेच संस्थानात होणारे दौरे त्यांना गावोगावचे चित्र ओळखून लोकाभिमुख धोरण ठरवण्यात खूप उपयोगी ठरायचे.

राज्याधिकार मिळाल्यानंतर बापूसाहेब महाराजांनी लोकाभिमुख कारभार हाकण्याच्या दृष्टीने पावले उचलली. यासाठी ते लोकांमध्ये जावून त्यांचे प्रश्‍न समजून घ्यायचे. कारभार हातात घेतल्यानंतर पहिली दोन वर्षे त्यांनी संस्थानातील सर्व गावे फिरून पाहणी केली. लोकांचे प्रश्‍न ऐकून त्यावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने निर्णय घ्यायला सुरूवात केली. नंतरही ते वर्षातून एकदा पूर्ण संस्थानचा दौरा करायचे. लोकांमध्ये जावून त्यांचे मन समजून घेऊन कारभार हाकणारा राजा, अशी ओळख त्यांनी अल्पावधीत तयार केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंचा फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: दक्षिण कराडमध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT