NEET Exam Scam
NEET Exam Scam esakal
कोकण

NEET Exam Scam : 'नीट' घोटाळ्याची सिंधुदुर्गातही पाळेमुळे? 'हा' वादग्रस्त ठरलेला संशयित शिक्षक तब्बल 20 वर्षे होता जिल्ह्यात!

सकाळ डिजिटल टीम

याचा तपास करणाऱ्‍या एटीएसच्या (ATS) पथकाने लातूरमधील जिल्हा परिषदेच्या दोन उपशिक्षकांना रविवारी रात्री अटक केली.

सावंतवाडी : सिंधुदुर्गात तब्बल २० वर्षे सेवा बजावून वादग्रस्त ठरलेला शिक्षक संजय जाधव हा देशभर गाजत असलेल्या नीट परीक्षा घोटाळ्यातील (NEET Exam Scam) संशयित असल्याने दहशतवादविरोधी पथकाने त्याला लातूरमध्ये अटक केली. घोटाळ्याची व्याप्ती राज्यभर असल्याने एटीएस यात अडकलेल्या आणि बळी पडलेल्यांचा शोध घेणार आहे. जाधव याची सिंधुदुर्गातील दीर्घ कारकीर्द लक्षात घेता जिल्ह्यातही याची पाळेमुळे पोहोचली आहेत का, हे तपासले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

नीट परीक्षा घोटाळा सध्या देशभर गाजत आहे. याचे थेट लातूर कनेक्शन (Latur NEET Exam Connection) उघड झाले आहे. याचा तपास करणाऱ्‍या एटीएसच्या (ATS) पथकाने लातूरमधील जिल्हा परिषदेच्या दोन उपशिक्षकांना रविवारी रात्री अटक केली. संजय तुकाराम जाधव आणि जलील उमरखाँ पठाण अशी त्यांची नावे आहेत. याशिवाय इरान्ना मष्णाजी कोनगलवार व दिल्लीतील गंगाधर (पूर्ण नाव स्पष्ट नाही) यांच्यावरही गुन्हा दाखल आहे.

त्यांनी विद्यार्थी आणि पालकांना नीटमध्ये गुणवाढीचे आमीष दाखवून रक्कम स्‍वीकारल्याचे तपासात पुढे आले आहे. ही रक्कम कोणाकोणाकडून घेण्यात आली, कोणत्या स्वरूपात घेतली, ती पुढे कोणाला दिली. या माध्यमातून किती जणांची फसवणूक झाली. याचा तपास यंत्रणा करत आहेत. उपलब्ध माहितीनुसार नीट परीक्षा मॅनेज करण्यासाठी एका विद्यार्थ्याला पन्नास लाखांपर्यंतचा रेट लावण्यात आल्याचे समजते.

NEET Exam Scam

या प्रकरणात पकडलेल्यांपैकी मुख्य सूत्रधार असलेला संजय जाधव हा शिक्षक सिंधुदुर्गात तब्बल २० वर्षे कार्यरत होता. त्याची १० सप्टेंबर २००३ ला मांगेली देऊळवाडी (ता. दोडामार्ग) येथे शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती झाली होती. त्यानंतर सावंतवाडी पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मडुरे क्र.३ मध्ये त्याने दीर्घकाळ उपशिक्षक म्हणून काम केले. गेल्यावर्षी मोठ्या प्रमाणात आंतरजिल्हा बदल्या झाल्या. यात २ मे २०२३ ला त्याला सिंधुदुर्गातून कार्यमुक्त केले. तेथून तो टाकळी (ता. माढा) येथे शिक्षक म्हणून रुजू झाला. सिंधुदुर्गात असतानाही त्याची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती.

माढा येथे कार्यरत असला तरी तो लातूरमध्ये सक्रीय होता. तेथे नीटच्या विविध क्लासशी तो जोडला गेला होता. यातूनच नीट घोटाळ्यात त्याचे नाव समोर आले आहे. जाधव आणि पठाण यांच्या मोबाईलमधील गॅलरीत विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र आढळले आहे. पैशाच्या मोबदल्यात गुण वाढवून देतो असे सांगून प्रवेशपत्र आणि पैसे त्यांनी दुसरा संशयित इरन्ना कोनगलवार याच्या माध्यमातून दिल्लीतील गंगाधर या आरोपीकडे पाठवल्याचे तपासात समोर आले आहे. जाधव हा दीर्घकाळ सिंधुदुर्गात कार्यरत होता. यामुळे जिल्ह्यातील कोणी यात फसले गेले आहे का? याचीही चौकशी होणार असल्याचे समजते. आज या आरोपींना पोलिस कोठडी देण्यात आली. त्यामुळे पुढच्या तपासात बऱ्या‍याच धक्कादायक गोष्टी पुढे येण्याची शक्यता आहे.

बऱ्‍याच गोष्टी गुलदस्त्यात

संबंधित आरोपींनी विद्यार्थ्यांची प्रवेश प्रमाणपत्र (हॉलतिकीट) व परीक्षेसंबंधी इतर कागदपत्रे घेतली होती. ती त्यांनी का स्वीकारली, परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे गुण कोणत्या पद्धतीने ते वाढविणार होते, यात त्यांचे साथीदार कोण-कोण आहेत, त्यांचे रॅकेट कार्यरत आहे का, आरोपी कोणकोणत्या संस्थांपर्यंत पोहोचले आहेत, आदींचा तपास पोलिस करणार आहेत. त्यामुळे या प्रकरणातील आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Closed: सिंधुदुर्ग, ठाणे, नवी मुंबईतील शाळांना उद्या सुट्टी जाहीर; मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळं निर्णय

Rain Update: पुन्हा पावसाला सुरूवात; मुंबईसह राज्यासह या भागात 'रेड अलर्ट', हवामान विभागाने दिला सर्तकतेचा इशारा

मुलींच्या मोफत शिक्षणाचा जीआर निघाला! ईडब्ल्यूएस, ओबीसी व एसईबीसी प्रवर्गातील मुलींनाच १०० टक्के शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कमाफी

CNG -PNG Price: सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री; CNG-PNGच्या दरात होणार वाढ, जाणून घ्या नवे दर

Russia-Ukraine War: रशियाने कीवमध्ये मुलांच्या रुग्णालयावर डागलं क्षेपणास्त्र, 24 जणांचा मृत्यू; अनेक मृतदेह गाडले, बचावकार्य सुरू

SCROLL FOR NEXT