Sindhudurg District Bank sakal
कोकण

जिल्हा बँक निवडणुकीसाठी सावंतवाडीत यंत्रणा सज्ज

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी येथील तहसीलदार कार्यालयामध्ये स्वतंत्र मतदान कक्ष उभारण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेसाठी (Sindhudurg District Bank Election) होणार्या मतदानाकरीता सावंतवाडीत मतदान यंत्रणा सज्ज झाली असून तहसिलदार कार्यालयातील मतदान केंद्रावर बैलेट पेपर द्वारे शिक्का मारून मतदान (Voting) होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी येथील तहसीलदार कार्यालयामध्ये स्वतंत्र मतदान कक्ष उभारण्यात आला आहे. जिल्हा बँकेची ही निवडणूक बॅलेट पेपरवर शिक्का मारून होणार असून सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तालुक्यातून २१२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून याकरिता चार पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी एकूण सहा कर्मचारी मतदान केंद्रावर तैनात करण्यात आले आहेत. मतदाराव्यतिरिक्त कोणालाच आतमध्ये प्रवेश देण्यात येणार नाही.

सावंतवाडी तालुक्यातून विकास संस्थेतून गुरुनाथ पेडणेकर विरोधात विद्याधर परब हे आपले भवितव्य आजमावत आहेत. पतसंस्था मतदारसंघांमध्ये भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली विरोधात सुशांत नाईक,पणन संस्थेमधून अतुल काळसेकर विरोधात सुरेश दळवी, मजूर व औद्योगिक संस्थेमधून गजानन गावडे विरोधात बाबा आंगणे, दुग्ध मच्छीमार संस्थेमधून महेश सारंग विरोधात एम के गावडे, गृहबांधणी संदीप उर्फ बाबा परब विरोधात विनोद मर्गज, वैयक्तिक व इतर मतदारसंघांमधून समीर सावंत विरोधात विकास सावंत निवडणूक लढवित आहेत.

महिला प्रतिनिधी मतदारसंघांमध्ये अस्मिता बांदेकर व प्रज्ञा ढवळ याच्या विरोधात अनारोजीन लोबो आणि अनिता राणे आपले भवितव्य आजमावत आहेत .अनुसूचित जाती जमाती या मतदारसंघात सुरेश चौकेकर यांच्याविरोधात आत्माराम ओटवणेकर तर इतर मागासवर्गीय मतदारसंघांमध्ये रवींद्र मडगावकर यांच्याविरोधात मनीष पारकर हे रिंगणात उतरले आहेत. भटक्या विमुक्त जाती जमाती मतदारसंघांमध्ये गुलाबराव चव्हाण यांच्या विरोधात मेघश्याम धुरी आपले भवितव्य आजमावत आहेत. एका मतदाराला एक अधिक पाच असा एकूण सहा मतांचा अधिकार राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT