revenue department  sakal
कोकण

सिंधुदुर्ग : महसूल विभागात जनसेवेची संधी

मालवणात महसूल दिनी अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव

सकाळ वृत्तसेवा

मालवण : शासकीय सेवा बजावत असताना जनतेची सेवा करण्याची मोठी संधी असलेला विभाग म्हणजे महसूल. जनतेच्या मोठ्या अपेक्षा या विभागाकडून असतात. त्या पूर्ण करण्याची नैतिक जबाबदारी या विभागात काम करणाऱ्या आपल्या सर्वांची आहे. यापुढेही प्रत्येकाने आपली जबाबदारी पूर्ण करून मालवण तालुका सर्व क्षेत्रात अग्रेसर ठेवावा, असे प्रतिपादन तहसीलदार अजय पाटणे यांनी केले.

येथील तहसील कार्यालयात तहसीलदार पाटणे यांच्या प्रमुख उपस्थितीत महसूल दिन साजरा करण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार आनंद मालवणकर, नायब तहसीलदार गंगाराम कोकरे यांच्यासह तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल, पोलिसपाटील उपस्थित होते. यावेळी तालुकास्तरावर सर्वोत्तम काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा प्रातिनिधिक स्वरुपात विशेष सत्कार करण्यात आला. यात महसूल नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, महसूल अव्वल कारकून आर. पी. मोंडकर, मसुरे मंडळ अधिकारी एस. आर. चव्हाण, महसूल सहाय्यक गणेश कुबल, कट्टा तलाठी नीलम नारकर, देवली कोतवाल हरी देऊलकर, पोलिसपाटील विठ्ठल बावकर यांना तहसीलदार पाटणे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

तसेच तालुक्यातील महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांनाही प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. एस. आर. चव्हाण, नीलम नारकर, हरी देऊलकर यांना तालुकास्तरावरील सर्वोत्तम कामगिरीबत जिल्हास्तरावरही सन्मानित करण्यात येत असल्याचे तहसीलदार पाटणे यांनी सांगितले. यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात उपस्थितांनी विचार मांडले.

महसूल विभागांतर्गत अनेक विभाग येतात. सर्वसामान्य जनतेसह सर्व स्तरातील जनतेची कामे या विभागांशी निगडीत असतात. प्राधान्याने सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची मोठी संधी महसूल विभागात काम करताना आपल्याला मिळते, हे आपले भाग्यच आहे. सोबत शासनस्तरावरील अनेक योजना राबविणे, त्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविणे, आपत्ती काळात सेवा बजावणे, निवडणूक काळात जबाबदारीपूर्वक काम करणे हे सर्वच महसूल विभागांतर्गत येते. तालुक्याचा गेल्या काही वर्षांचा विचार करता

कमी कर्मचारी संख्या असतानाही प्रत्येकजण अधिकची जबाबदारी घेऊन चांगले काम करत आहे. कोरोना काळात, तोक्ते वादळातही सर्वांनी चांगले काम केले, असे कौतुकोद्गार तहसीलदार पाटणे यांनी व्यक्त काढले.

यंदा एक कोटी ६१ लाखांचा महसूल

तालुक्यात दरवर्षी महसूल उत्पन्न हे वाढतेच राहिले. या महसुली वर्षातही जमीन महसूल एक कोटी ५९ हजार, तर गौण खनिज दंड स्वरूपात सुमारे २४ वाहनांवर कारवाई करून ६० लाख ७८ हजार वसूल करण्यात आला. असा एकूण एक कोटी ६१ लाख ३७ हजारांचा महसूल गोळा झाला आहे, अशी माहिती महसूल विभागातर्फे देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT