वेंगुर्ले ( सिंधुदुर्ग ) - सिंधुदुर्ग पर्यटनाचा विस्तृत आराखडा तयार केला आहे. त्या अनुषंगाने विकासासाठी पाठपुरावा करणार आहे. यात चिपी विमानतळाचा पर्यटन वाढीला फायदा होईल, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी आज चिपी येथे केले.
चिपी विमानतळ लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी या खात्याचे मंत्री यांना मी सतत भेटत आहे. हे विमानतळ 31 जानेवारीपूर्वी येथील राज्य सरकारच्या सहकार्याने पूर्ण होणार असल्याचा त्यांनी शब्द दिला आहे. मी या अगोदरच अलाईन्स एअरतर्फे या विमानतळाचा "उडान' या योजनेमध्ये अंतर्भाव केला आहे. यादृष्टीने पर्यटनाचा एक विस्तृत आराखडा मी तयार केला असून तो अमलात आणून पर्यटन कस वाढेल, ज्यामुळे चिपी एअरपोर्टला याचा फायदा होईल आणि यामुळे पर्यटक येतील. पर्यटक व एअरपोर्ट अस जे नात आहे त्या नात्याला अनुसरून मी पुढील काळात काम करणार आहे, असेही ते म्हणाले.
श्री. प्रभू यांनी मानव साधन विकास संस्थेच्या अध्यक्षा उमा प्रभू यांच्यासमवेत आज येथील चिपी विमानतळला भेट देऊन आयआरबी कंपनीचे अधिकारी अमर पाटील यांच्याकडून कामाचा आढावा घेतला. यावेळी तालुका भारतीय जनता पक्षाच्यावतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
भाजप जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, माजी सभापती निलेश सामंत, लुपिन फाउंडेशनचे व्यवस्थापक योगेश प्रभू, म्हापण माजी सरपंच गुरुनाथ मडवळ, उपसरपंच कुशेवाडा निलेश सामंत, परुळेबाजार सरपंच श्वेता चव्हाण, मच्छीमार नेते दादा केळुसकर, युवा मोर्चाचे प्रसाद पाटकर, माजी सरपंच प्रदीप प्रभू, प्रकाश राणे, बाळू प्रभू, गुरुप्रसाद चव्हाण, संजोग परब, रुपेश राणे, संजय परब, धनश्री चव्हाण, सुनील चव्हाण, गौरव आरोलकर, जयेश सामंत आदी उपस्थित होते.
श्री. प्रभू पुढे म्हणाले, ""विमानतळ पूर्णत्वाला जावं म्हणून केंद्र व राज्य सरकार या दोघांच्याही परवानगीची गरज असते. केंद्र सरकारच्या सर्व परवानग्या सुदैवाने मी केंद्रीय मंत्री असताना दिल्या होत्या. कंपनीला काही अडचणी असतील तर राज्य सरकार, मुख्यमंत्री यांच्याशी बोलून याचे निवारण करण्यात येईल.''
दरम्यान दाभोली नाका येथे नगराध्यक्ष राजन गिरप यांनी प्रभु यांचे स्वागत केले. पुढील दौऱ्यामध्ये वेंगुर्ले नगरपरिषदेस भेटीचे निमंत्रण दिले. नगरसेवक प्रशांत आपटे, धर्मराज कांबळी, श्रेया मयेकर, साक्षी पेडणेकर, शितल आंगचेकर, पुनम जाधव, बाळा सावंत, साईप्रसाद नाईक, युवा मोर्चा शहर अध्यक्ष प्रणव वायंगणकर आदी उपस्थित होते. यानंतर त्यांनी आरवली येथे श्री देव वेतोबाचे दर्शन घेतले. विश्वस्त मंडळाच्या वतीने अध्यक्ष श्री. राय यांच्या हस्ते सुरेश प्रभू व सौ. उमा प्रभू यांच्या शाल व पुष्पगुच्छ देईन सन्मान करण्यात आला. मयूर आरोलकर उपस्थित होते.
मालवणकडून येणाऱ्यांसाठी...
यावेळी मालवणवरून येणाऱ्या लोकांना विमानतळावर येताना फिरून यावे लागते. यासाठी त्याबाजूने अजून एक प्रवेशद्वार करण्यात यावे, अशी सूचना करत याचा प्रस्ताव तयार करा, तो मी मंजूर करून घेईन, असेही श्री. प्रभू यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.