राजापूर (रत्नागिरी) : चार जनावरे गाडीत भरून गाडी वेगात जैतापूर मार्गाने निघण्याच्या तयारीत असतानाच दोन टीमनी गाडी अडवली. मागे काय आहे, असे विचारल्यावर चालक राजेश पाटणकर आणि गुलाब इम्तियाज निशानदार यानी उडवाउडवीची उत्तरे दिली.
हौद्यात डांबून भरलेली, घाबरलेली व गाडीचे हूक लागून पायातून रक्त येणारे चार बैल आढळले. जागरुक ग्रामस्थांनी सापळा रचून पकडले, अन् गुरांच्या तस्करीचा भांडाफोड झाला. तालुक्यातील नाटे येथून बेकायदा गुरे वाहतूक करणाऱ्या तिघांना जागरुक ग्रामस्थांनी सापळा रचून पकडले. या प्रकरणी नाटे पोलिसांनी तिघांना जेरबंद केले असून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. गेले अनेक दिवस नाटे, आडिवरे, जैतापूर, देवाचे गोठणे, धाउलवल्ली या भागात गुरांची तस्करी करणारे इसम फिरत असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली होती.
शुक्रवारी हे इसम नाटे येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यावर त्यांना पकडण्यासाठी ग्रामस्थांनी सापळा रचला. ग्रामस्थांचे तीन गट करून तीन ठिकाणी पहारा देण्यास सुरवात केली. पहाटे चार वाजेपर्यंत काहीच हालचाल दिसत नव्हती. पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान गयाळ कोकरी भागामध्ये संतोष कुवेस्कर यांच्या गोठ्यात धावपळ दिसू लागली. सतत लाईट चालू-बंद करणे, काही इशारे आणि इकडून-तिकडे पळापळ दिसून आली.
दरम्यान, एक काळ्या रंगाच्या प्लास्टिक कागदाने संपूर्ण झाकलेली, समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असलेली गाडी सतत त्या स्पॉटवरून वेग सावकाश करून जाताना दिसत होती. गाडीने संतोष कुवेस्कर यांच्या घराजवळील असणाऱ्या गोठ्याकडे वळण घेतले व गाडी लावली. पहिल्या टीममधील लोकांनी दुसऱ्या आणि तिसऱ्या टीमला कल्पना दिली. त्यातील एका टीमने नाटे पोलिसांना माहिती देताच, सर्व तयारीनिशी पोलिस निघाले. या प्रकरणी गुरे तस्करांविरोधात गुन्हा दाखल केला.
महिन्यातील तिसरी घटना, धडक कारवाईचे कौतुक तालुक्यात महिनाभरातील ही तिसरी गुरे तस्करीची घटना असून नाटे ग्रामस्थांनी मिळून केलेल्या धडक कारवाईचे कौतुक होत आहे. या मोहिमेत संजय बांदकर, मिलिंद शहाणे, सुनील पाध्ये, कपिल रानडे, अनिल पिलके, महेश सातुर्डेकर सामील झाले.
चार गुरे पुन्हा बांधली गोठ्यात
चार जनावरे गाडीत भरून गाडी वेगात जैतापूर मार्गाने निघण्याच्या तयारीत असतानाच दोन टीमनी गाडी अडवली. मागे काय आहे, असे विचारल्यावर चालक राजेश पाटणकर आणि गुलाब इम्तियाज निशानदार यानी उडवाउडवीची उत्तरे दिली. हौद्यात डांबून भरलेली, घाबरलेली आणि गाडीचे हूक लागून पायातून रक्त येणारे चार बैल आढळले. पोलिसांनी चालक राजेश पाटणकर आणि निशानदार तसेच संतोष कुवेसकर यांना ताब्यात घेतले. टेम्पोतील चार गुरे पुन्हा संतोष कुवेसकर यांच्या गोठ्यात बांधण्यात आली.
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.