Soil erosion bhagvantgadh konkan sindhudurg 
कोकण

गंभीर...नदीने रस्ताच केला गिळंकृत

सकाळ वृत्तसेवा

आचरा (सिंधुदुर्ग) - चिंदर भगवंतगड ते भगवंतगड तरी असा भगवंतगड किल्याकडून जाणारा रस्ता संरक्षक भिंत नसल्याने नदीच्या प्रवाहाच्या माऱ्यामुळे कोसळून सुमारे 300 मीटरचा रस्ता नदीने गिळंकृत केला आहे. त्यामुळे या रस्त्याने होणारी वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच रस्त्यालगतची माडबागायतही धोक्‍यात आली आहे. भागवंतगड तरीला जोडणारा जवळचा मार्ग बंद झाल्याने ग्रामस्थांना पर्यायी पूर्ण गावाला वळसा घालून येणाऱ्या रस्त्याचा वापर करावा लागणार आहे. 

किल्ल्याच्या जवळून जाणारा भगवंतगड रस्ता नदीने केला गिळंकृत केल्याची घटना घडली. सुदैवाने यावेळी या रस्त्यावर वाहतूक नसल्याने मोठा अनर्थ टळला. रस्त्यालगत असणारे काही माड यावेळी पाण्यात कोसळले. फेब्रुवारी महिन्यात या ठिकाचा भाग पाण्यात कोसळला होता. त्यावेळी रिक्षा जाईल एवढाच रास्ता शिल्लक होता. याबाबत ग्रामस्थांनी संबंधित विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला होता; पण अद्याप कोणतीही लक्ष न दिल्याने पुन्हा धूप होऊन आता मात्र पाउलवाटेसारखाच रस्ता शिल्लक आहे.

रात्रीच्यावेळी अनोळखी वाहन या रस्त्याने आल्यास ते सरळ कालावल खाडीपात्रात कोसळून मोठा अपघात होण्याची शक्‍यता आहे. संबंधित विभागाने तातडीने दखल घेण्याची मागणी होत आहे. सुमारे 300 मीटर भागाची धूप थांबवण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्‍यक असून ऐन पावसाच्या तोंडावर जर उपाययोजना झाली नाही उरलेली माड बागायत धोक्‍यात येणार आहे. शिवाय वस्तीलाही धोका निर्माण होणार आहे. या भागासाठी तातडीने संरक्षक भिंत उभारावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT