Special parcel train to run on Konkan Railway route kokan marathi news
Special parcel train to run on Konkan Railway route kokan marathi news 
कोकण

ब्रेकिंग - कोकण रेल्वेच्या मार्गावर धावणार स्पेशल पार्सल ट्रेन...

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात सर्वसामान्य लोकांना जीवनावश्यक गोष्टीची कमतरता पडू नये म्हणून कोकण रेल्वेच्या मार्गावर स्पेशल पार्सल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . या पार्सल ट्रेनचा वापर कोकणातील आंबा देशाच्या अन्य भागात पाठवण्याकरिताही करता येणार आहे. 

कोकणरेल्वेच्या रत्नागिरी ,कणकवली ,मडगाव आणि उड्डपी या चार स्थानकांवर या  पार्सल ट्रेन मध्ये माल चढवता उतरवता येणार आहे . या पार्सल ट्रेनचा वापर कोकणातील आंबा देशाच्या अन्य भागात पाठवण्याकरिताही करता येणार असल्याने कोरोना मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत आंबा बागायतदारांना मोठा दिलासा मिळणार आहे . हि स्पेशल ट्रेन ओखा ते तिरुअनंतपुरम आणि पुन्हा ओखा या मार्गावर धावणार आहे.

राष्ट्रीय आपत्तीत कोकण रेल्वेचा महत्वपूर्ण निर्णय 

२० एप्रिल ला हि ट्रेन ओखा वरून रवाना होईल आणि २१ तारखेला  सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी रत्नागिरी ,१ वाजून ४० मिनिटांनी कणकवली ,४ वाजून ५० मिनिटांनी मडगाव ,तर ९ वाजून १० मिनिटांनी उड्डपी येथे पोहोचणार आहे . तर २४ एप्रिल ला हि ट्रेन तिरुअनंतपुरम येथून निघून १ वाजून २० मिनिटांनी उड्डपी ,६ वाजून १० मिनिटांनी मडगाव ,रात्री ८ वाजून ५० मिनिटांनी कणकवली ,तर ११ वाजून १० मिनिटांनी रत्नागिरी स्थानकात येणार आहे.व्यापारी ,उत्पादक आंबा बागायतदार या ट्रेन  मधून आपल्या मालाची ने आण करू शकतात.


कोकण रेल्वेच्या चारही स्थानकातील पार्सल कार्यालयात या करीता विशेष व्यवस्था करण्यात आली आहे . कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत कोकण रेल्वेने पहिल्या दिवसापासून महत्वाची भूमिका बजावली आहे . पार्सल ट्रेनच्या निमित्ताने कोकण रेल्वेने छोटे व्यावसायिक ,उद्योजक आणि बागायदाराना मदतीचा हात दिला आहे .

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs RSA T20 WC Final : टी 20 वर्ल्डकपच्या इतिहासात फायलनमध्ये यापूर्वी जे झालं नाही ते भारतानं करून दाखवलं

Ind vs Sa T20 WC Final Live Score : चोकर्स तर दक्षिण आफ्रिकाच! हार्दिक अन् सूर्यानं हरलेली मॅच दिली जिंकून

Zika Virus : झिकाचा धोका! आणखी सहा जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवले; 'अशी' घ्या काळजी

T20 World Cup 2024: टीका झाली, पण भिडू घाबरला नाय! फायनलमध्ये दुबेने दाखवली बॅटची ताकद

Virat Kohli : टी 20 वर्ल्डकपच्या फायनलचा किंग! विराटच्या संथ अर्धशतकानं पकडला वेग, रोहितचा विश्वास ठरवला सार्थ

SCROLL FOR NEXT