Success Story Anil Pednekar esakal
कोकण

Success Story : 8 गुंठ्यात उभारला दिशादर्शक उद्योग; रोज 9000 अंड्यांचं उत्पादन, उच्चशिक्षित तरुणाचं धाडसी पाऊल

मुंबईहून आलेल्या तरुणाने एमबीएचे शिक्षण पूर्ण करून तब्बल आठ गुंठ्यांमध्ये लेयर पक्षांचा अंडी व्यवसाय सुरू केला आहे.

तुषार सावंत

एमबीए फायनान्सचे शिक्षण घेतल्यानंतर चिंचवली या मूळ गावी वडिलोपार्जित दीड एकर जमिनीमध्ये पोल्ट्री फार्म मंदार यांनी उभा केला आहे.

कणकवली : तालुक्यातील खारेपाटण जवळच्या चिंचवली गावामध्ये मुंबईहून आलेल्या तरुणाने एमबीएचे शिक्षण पूर्ण करून तब्बल आठ गुंठ्यांमध्ये लेयर पक्षांचा अंडी व्यवसाय सुरू केला आहे. गतवर्षी या व्यवसायाला सुरुवात झाली असून दररोज ९ हजार अंड्याची मागणी पूर्ण केली जात आहे. जिल्ह्यात जवळपास ८० हजार अंड्यांची आवश्यकता आहे.

आतापर्यंत ही गरज परजिल्ह्यातील व्यावसायिक पूर्ण करायचे. अशा स्थितीत मंदार यांनी चिंचवलीसारख्या गावात पत्कारलेला हा उद्योगाचा मार्ग धाडसी आणि मार्गदर्शक म्हणावा लागेल. मुंबई-गोवा महामार्गापासून काही अंतरावर खारेपाटणजवळ चिंचवली हे शेतीप्रधान गाव आहे. या गावांमध्ये ऊस शेतीबरोबर काजू, आंबा, भाजीपाला, भात शेती केली जाते. बारमाही पाण्याची सुविधा सुकनदीच्या प्रवाहामुळे आहे. त्यामुळे इथला शेतकरी सातत्याने धडपडत असतो.

अशाच एका प्रयोगशील शेतकरी असलेल्या अनिल पेडणेकर यांच्या पुतण्याने एक धाडसी व्यवसाय सुरू केला आहे. श्री. पेडणेकर यांचे बालपण ते पदवीपर्यंतचे शिक्षण मुंबईत झाले. त्यानंतर एमबीए अर्थात मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचे शिक्षण पूर्ण करून वडिलांच्या सेवानिवृत्तीनंतर मंदार यांनी बाजारपेठेचा अभ्यास केला. एमबीएचे शिक्षण हे फायनान्समध्ये असल्याने त्यांना व्यवसायाची आवड होतीच.

वडिलोपार्जित जमीन उपलब्ध असल्याने वडिलांच्या आणि काकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी घरापासून जवळच आठ गुंठे जमिनीत लेयर पक्षांचा पोल्ट्री व्यवसाय सुरू केला. गतवर्षी मार्चमध्ये हा पोल्ट्री व्यवसाय सुरू झाला. तब्बल ६० ते ६५ लाख रुपये खर्च करून भव्य अशी शेड त्यांनी उभारली आहे. सांगली जिल्ह्यातील आष्टा येथून लेयर पक्षी खरेदी करून त्यांचे पालन पोषण ते करत आहेत. अत्याधुनिक पद्धतीने त्यांनी हा कुक्कुटपालनाचा व्यवसाय उभा करत असताना स्वतःहून खाद्य करण्यात करण्याचाही प्रयोगही सुरू केला आहे. यासाठी परजिल्ह्यातून मका ते खरेदी करतात.

जिल्ह्यामध्ये जवळपास ८० हजार अंडी ही दररोज विकली जातात. जिल्ह्यात मात्र छोटेखानी पोल्ट्री व्यवसाय असल्याने केवळ पंधरा हजार अंडी रोजची उपलब्ध होतात. त्यामुळे उर्वरित अंड्यांची गरज ही परजिल्ह्यामधूनच पूर्ण होते. गेल्या सहा महिन्यांपासून मंदार पेडणेकर यांच्या पोल्ट्री व्यवसायातून दररोज ९ हजार अंडी उपलब्ध होत आहेत. कोकणातील वातावरण पोल्ट्री व्यवसायाला फारसे पोषक नसले तरी त्याचे नियोजन करून आपण या व्यवसायात धाडसी प्रयोग केला आणि तो यशस्वी होत असल्याचे मत ही मंदार यांनी व्यक्त केले.

पोल्ट्री व्यवसायातील दहा हजार लेयर पक्षांना दररोज एक टन खाद्याची आवश्यकता असते. हे खाद्य स्वतः पोल्ट्री व्यवसायाबरोबरच खाद्य निर्मितीचा प्रयोगही त्यांनी सुरू केला आहे. या व्यवसायात थोडेफार धोके असले तरी नियोजन पद्धतीने व्यवसाय केल्यास निश्चित यशस्वी होता येते. एक कोंबडी दीड वर्षांमध्ये साधारण तीनशे अंडी देत असतात. मार्केट रेट प्रमाणे साधारण एक अंडे सात ते आठ रुपयाला विकले जाते. होलसेल मार्केट व्यावसायिक दररोज पैसे देऊन ही अंडी खरेदी करतात. खर्च आणि उत्पन्नाचा मेळ योग्य पद्धतीने घातला जाऊ शकतो, असेही मत मंदार यांनी व्यक्त केले आहे.

मासिक दीड लाखांचे उत्पन्न

एमबीए फायनान्सचे शिक्षण घेतल्यानंतर चिंचवली या मूळ गावी वडिलोपार्जित दीड एकर जमिनीमध्ये पोल्ट्री फार्म मंदार यांनी उभा केला. आठ गुंठ्यामध्ये शेड उभारून दहा हजार कोंबडी असलेला लेयर पोल्ट्री उद्योग गावात सुरू केल्याचा वेगळा आनंद त्यांना आहे. वडिलांचे स्वप्न प्रत्यक्षात साकारत असतानाच वडिलांचे अचानक निधन झाले. त्यामुळे दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र, त्यातून सावरून हा व्यवसाय त्यांनी उभा केला आहे. या व्यवसायातून महिन्याला निव्वळ नफा एक ते दीड लाख रुपये मिळतो.

स्थानिकांना रोजगार

सध्या ही अंडी स्थानिक बाजारपेठेत विकली जातात. पोल्ट्री उद्योगामध्ये सहा कामगार काम करतात. कोंबड्यांसाठी लागणारे खाद्य स्वतःच बनवतात. मका, सोयाबीन पेंड, स्टोन ग्रीड तसेच मेडिसिनमध्ये विविध घटक मिक्स असतात. कच्चे खाद्य बाहेरून मागवले जाते. एप्रिलपासून सुरू झालेला हा लेअर पोल्ट्री उद्योग सध्या यशस्वीपणे सुरू आहे. गावातील तरुणांना रोजगार देखील उपलब्ध करून दिला आहे.

जिल्ह्यात बेरोजगारीचा आकडा फार मोठा आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या मुलांकडे जागा आहे; परंतु व्यवसाय निवडण्याची योग्य अशी माहिती नाही. व्यवसायामध्ये नव्या तरुणांनी सहभाग घेतला तर सर्वतोपरी सहकार्य करू शकतो. कुक्कुटपालन हा व्यवसाय निश्चितच आर्थिकदृष्ट्या कुटुंबाला सक्षम बनवणारा आहे. अंड्यासाठी कोकण हा ब्रँड तयार करून त्याचे मार्केटिंग केल्यास जिल्ह्यातील तरुणांना यात चांगली संधी मिळेल. गोवा, मुंबई या शहरात अंडी विक्रीला चांगला वाव आहे.

-मंदार पेडणेकर, व्यवसायिक, चिंचवली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT