Success story Retired officers Yashwant Bobade and Ujjwala Bobde esakal
कोकण

Success Story : सेवानिवृत्त दाम्पत्यानं 70 एकरात कातळावर फुलवली 'ड्रॅगन फ्रूट'ची बाग; राजापुरात पहिलाच प्रयोग, तब्बल 3 लाखांचं उत्पन्न

राजापूर तालुक्यातील हा पहिलाच प्रयोग आहे.

राजेंद्र बाईत

संपूर्ण लागवडीला पाणीपुरवठ्यासाठी ठिबक सिंचन योजना राबवली आहे. त्यामुळे झाडांना योग्यवेळी पाणीपुरवठा होतो.

Dragon Fruit Farming : सेवानिवृत्त अन्न व औषध प्रशासन अधिकारी यशवंत बोबडे (Yashwant Bobade) आणि मुंबई महानगर पालिकेतील सेवानिवृत्त अधिकारी उज्ज्वला बोबडे (Ujjwala Bobade) या दाम्पत्याने पडीक कातळ परिसराचा खुबीने उपयोग करत ड्रॅगन फ्रूटची (Dragon Fruit Farming) लागवड केली आहे. राजापूर तालुक्यातील हा पहिलाच प्रयोग आहे.

कोकणातील तांबड्या मातीमध्ये कमीत कमी जागेत आणि खर्चामध्ये जादा उत्पन्न मिळवून देणारी ड्रॅगन फ्रूटची शेती फुलली आहे. सुमारे ७० एकर क्षेत्रांमध्ये त्यांनी ड्रॅगन फ्रूटच्या जोडीने आंबा, जांभूळ, काजू, नारळ, अननस, चिकू यांच्या फळबागाही फुलवल्या आहेत. हे स्वप्न मुलगा उत्कर्ष यांनी पाहिले होते. शेतामध्ये राबून शारीरिक तंदुरुस्तीसोबतच फळबाग लागवडीतून आर्थिक उत्पन्नाचा शाश्‍वत स्रोत त्यांनी निर्माण केला आहे.

अशी केली लागवड

कातळाचा खुबीने उपयोग करत रोपांच्या लागवडीसाठी सुमारे अडीच फूट उंचीच्या दगडी बांधावर सुमारे सहा फूट उंचीचे सिमेंटचे खांब उभे करण्यात आले आहेत. त्या खांबावर लोखंडी रिंग करण्यात आली आहे. त्यानंतर, सरी पद्धतीने ही लागवड करण्यात आली असून, दोन सरींमध्ये दहा बाय आठ असे अंतर ठेवले आहे. त्यामध्ये लागवड करण्यासाठी सांगोला, पंढरपूर येथून रोपे आणली असून, एक एकरामध्ये १६०० रोपांची लागवड केली.

Success story Retired officers Yashwant Bobade and Ujjwala Bobde

सोलर अन् ठिबक सिंचन

संपूर्ण लागवडीला पाणीपुरवठ्यासाठी ठिबक सिंचन योजना राबवली आहे. त्यामुळे झाडांना योग्यवेळी पाणीपुरवठा होतो आणि मनुष्यबळावरील खर्चाची बचत होत आहे. पाण्यासाठी कातळावर सुमारे १४ फूट खोल विहीर खोदली असून, काही फुटांच्या अंतरावर मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. विहिरीतील पाणी खेचणारा पंप कार्यान्वित राहण्यासाठी बागेमध्ये सोलरपॅनल बसवली आहेत, ज्यामुळे विजेवर होणाऱ्या खर्चाची बचत झाली आहे.

खतनिर्मिती बागेतच

फळझाडांसाठी लागणारे कंपोस्ट खत बाजारपेठेतून विकत आणण्याऐवजी बागेतच तयार केले जाते. पालापाचोळा आणि अन्य काही पदार्थांचा उपयोग करत ४० दिवसांमध्ये खतनिर्मिती केली जाते, असे बोबडे सांगतात. खतनिर्मितीच्या युनिटमध्ये ५० किलोच्या दीडशे बॅगा खतनिर्मिती एकाचवेळी करणे शक्य होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या बागेमध्ये वेगळी अन्‌ वैशिष्ट्यपूर्ण खतनिर्मिती होते.

Success story Retired officers Yashwant Bobade and Ujjwala Bobde

बाग व्यवस्थापन अन्‌ मार्केटिंगही

फळबागेची निगा राखणे, देखरेख ठेवणे, खत-पाण्याचे नियोजन करणे, कामगारांकडून फळकाढणी करून घेणे, अशी फळबागेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी उतारवयातही तरुणांना लाजवेल, असा उत्साहवर्धक वावर असलेल्या बोबडे दाम्पत्याकडून चोखपणे पार पाडली जाते. बागेमधील मालासाठी मार्केट शोधणे आणि त्याची विक्री करणे ही जबाबदारी मुलगा मेहुलसह सुना निकिता आणि सिमरन, नात वेरूनिका या सांभाळतात. हापूस आंबा, काजूची मुंबई बाजारपेठेमध्ये विक्री, तर ड्रॅगन फ्रूटची जळगाव, लातूर आदी भागांसह मागणीप्रमाणे विक्री करण्यात येणार आहे.

रोपांची राखली जाते निगा

ड्रॅगन फ्रूटच्या रोपांच्या फांद्यांच्या टोकाचा भाग कुजल्यास वाढीवर परिणाम होतो. त्यामुळे रोपांचे नियमित निरीक्षण करून कुजलेला भाग छाटण्यात येतो; जेणेकरून रोपांचे नुकसान होत नाही वा वाढ थांबणे किंवा रोप कुजून मरण्याचा धोका टळतो. रोपांचे वा फळांचे वन्यप्राणी किंवा माकडांपासून नुकसान होत नाही. रोपांच्या लागवडीनंतर सर्वसाधारणपणे वर्षभराच्या कालावधीत उत्पन्न सुरू होते. मात्र, बोबडे दाम्पत्याने केलेल्या लागवडीतील रोपांना सुमारे आठ महिन्यांत फळधारणा झाली. एक एकर क्षेत्रामध्ये झालेल्या लागवडीतून सुमारे तीन लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असल्याचे बोबडे यांनी सांगितले. या प्रयोगामुळे कोकणच्या कृषी क्षेत्राला भविष्यात नवा आयाम मिळेल.

Success story Retired officers Yashwant Bobade and Ujjwala Bobde

पॉलिहाऊसने काळीमिरी रोपे

ड्रॅगन फ्रूटबरोबरच हापूस, वेंगुर्ला-७ आणि वेंगुर्ला-४ या प्रजातीचे काजू अशा उत्पन्न देणाऱ्‍या प्रमुख फळझाडांसह चिकूची दीडशे, अननसची तीनशे, नारळाची तीनशे, रातांबेची आठशे, वावडिंगची तीनशे अशी लागवड केली आहे. याबरोबरच शिवण तीनशे, खैर एक हजार, काळी मिरी आदींचीही लागवड केली आहे. तीन गुंठे क्षेत्रामध्ये त्यांनी काळी मिरीची लागवड केली आहे. विशिष्ट आकाराच्या सिमेंटच्या कुंड्या एकावर एक रचून त्यात कौशल्याने रोपे लावली आहेत.

1500 रोपांची लागवड

सुमारे १५०० रोपांची लागवड केली आहे. वाढत्या तापमानाचा रोपांवर प्रतिकूल परिणाम होऊ नये, म्हणून शेडनेट उभारले आहे. त्यामध्ये सुमारे २०० किलो काळी मिरीचे उत्पादन झाले. दहा गुंठे क्षेत्रामध्ये बंदिस्त पॉलिहाऊसची उभारणी केली असून, त्या पॉलिहाऊसचा काळी मिरी रोपांच्या निर्मितीसाठी उपयोग होतो. केवळ फळझाडांच्या लागवडीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून न राहता त्यांनी पॉलिहाऊसच्या माध्यमातून रोपनिर्मिती करत त्याद्वारे उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण केला आहे.

Success story Retired officers Yashwant Bobade and Ujjwala Bobde

अशी आहेत वैशिष्ट्ये

  • एक एकर क्षेत्रात ३ लाखांचे उत्पन्न

  • निवृत्तीनंतर बोबडे जोडप्याची धडपड

  • चिकू, अननस, नारळ, रातांबे, वावडिंग,

  • शिवण, खैर, काळी मिरीचीही लागवड

  • पॉलिहाऊसच्या माध्यमातून रोपनिर्मिती

  • एकावेळी ५० किलोच्या १५० बॅगा खतनिर्मिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT