suicide attend by a one person in kherdi ratnagiri 
कोकण

मुले आणि पत्नी माहेरी निघून गेली, व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणाने उचलले धक्कादायक पाऊल

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण (रत्नागिरी) : खोलीतून प्रचंड दुर्गंधी येत असल्याने चाळमालकाने खोलीचे दार मागच्या बाजूने तोडले. मात्र, त्यांना समोर पंख्याला लटकलेला आणि पूर्ण सडलेला मृतदेह आढळून आला. ही घटना खेर्डी-मिरगल चाळीमागे घडली असून याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा तरुण भाडेकरू म्हणून या ठिकाणी राहात होता. 

याबाबत हकीकत अशी की, मूळचा गुढे येथे राहणारा अमोल महादेव रहाटे (वय ३८) खेर्डी येथे भाड्याने राहात होता. त्याची पत्नी आणि मुले माहेरी निघून गेले आहेत. काही वर्षे त्याची आई आणि तो या ठिकाणी राहात आहेत. वर्षभरापूर्वी त्याच्या आईचे निधन झाल्याने तो एकटाच होता. त्यामुळे व्यसनाच्या आहारी गेला होता. काही दिवस तो आजारी होता. त्याला कामथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून तो घरी आला.

त्यानंतर त्याने ओढणीच्या साह्याने गळफास घेत जीवन संपवले. मात्र, याची कल्पना कोणालाच नव्हती. चाळीत दुर्गंधी सुटल्यामुळे वास कोठून येतो, म्हणून शोध घेतला असता रहाटे याच्या खोलीतून येत असल्याचे समजले. मात्र, दरवाजे बंद असल्याने मागच्या बाजूने दार उघडण्यात आले. त्यावेळी पंख्याला लटकलेला मृतदेह आढळून आला.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: चंद्रचूड साहेब न्याय देण्याऐवजी टिप्पणीकार झाले होते; उद्धव ठाकरेंनी माजी सरन्यायाधीशांवर व्यक्त केली नाराजी

"आम्ही धनगर समाजाचा मुख्यमंत्री करून न्याय दिला, मात्र महाराष्ट्रात धनगरांना साधं आरक्षण दिलं जात नाही"

Israel PM Netanyahu: इस्रायली पंतप्रधानांच्या घरावर बॉम्ब हल्ला; संरक्षण मंत्री म्हणाले, आता हद्द झाली...

Latest Maharashtra News Updates : राजनाथ सिंह यांनी हायपरसॉनिक क्षेपणास्त्राच्या यशस्वी उड्डाण चाचणीबद्दल सशस्त्र दल आणि उद्योगाचे अभिनंदन केले

Uric Acid Home Remedies: युरिक अ‍ॅसिडची समस्या असल्यास सकाळी रिकाम्यापोटी 'ही' गोष्ट पाण्यात उकळून प्यावी, मिळेल आराम

SCROLL FOR NEXT